Thursday, December 29, 2022

‌ "समाज रत्न‌" : अक्कीसागर साहेब

 ‌"समाज रत्न‌" : अक्कीसागर साहेब 


जिवन जगत असताना अनेक सहवास मिळतं असतात, असाच एक सहवास जिवनात आला. ज्यांची मातृभूमी कर्नाटक, जन्मभुमी मध्यप्रदेश, कर्मभूमी महाराष्ट्र लाभली असून, आपलं समाज रूण परत फेड करण्यासाठी देशपातळीवर काम करण्याचा योग आला आणि सर्व राज्यांत कार्यकर्त्यांचा जथ्था निर्माण केलेले, फुले विचार धारेवर चालणारे, संघर्षमय जीवनातून वंचित, उपेक्षिताच्या न्याय हक्कासाठी पर्याय निर्माण करणारे,मनमिळाऊबुध्दिवान व्यक्तीमत्व असलेले असे ते स्नेही मित्र सिदप्पा अक्कीसागर होय.

जिवनात असेही योगायोग येतात ते इतिहास घडवून जातात, मी नौकरी करीत असताना मला मान्यवर कांशीरामजीच्या बहुजन चळवळीचा संबंध आला. त्या निमित्ताने मी त्यांच्या बहुजन डे कार्यक्रमासाठी १५ मार्च १९९४ला मुंबई येथे गेलो होतो. तेथे यशवंत सेनेचे सरसेनापती महादेवजी जानकर साहेब यांचा संबंध आला. त्यामुळे पुढे याच चळवळीत काम करणारे सिध्दपा अक्कीसागर यांचा जवळून संबंध आला आणि एकत्रच काम करण्याचा योग आला.

सिदप्पा अक्कीसागर यांचे वडिल लक्ष्मणराव याचं मुळ गाव चंदरगी तालुका रामदुर्ग,जिल्हा बेळगाव असुन त्यांची फौजी खात्यांत नौकरी असल्यामुळे मध्यप्रदेशात जबलपुर येथे राहाण्याचा योगायोग आला होता. येथेच सिदप्पा अक्कीसागर यांचा जन्म झाला. पुढे लक्ष्मणराव अक्कीसागर यांची महाराष्ट्रात पुणे येथे बदली झाली. त्यामुळे सिदप्पाचे शिक्षण पुणे येथेच झाले. सिदप्पाचे पदवी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मुंबई येथे रिझर्वबॅकेंत नौकरीला लागले.पुढे त्यांना कांशीरामजीच्या बहुजन चळवळीचा सहवास लाभला आणि बहुजन चळवळीमुळे समाज रूण परत फेड करण्याची जाणीव झाली, त्यामुळे त्यांना समाज कार्य करण्याची ओढ लागली आणि समाज कार्याला सुरुवात केले. त्यानी जेथे नौकरी करत होते त्या रिझर्व्ह बँकेत अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती साठी स्वंतत्र कार्यालय देण्यात आले होते, परंतू इतर मागासवर्गीयांसाठी कार्यालय नव्ह्ते. हि सामाजिक जाणीव सिदप्पा यांना झाल्यामुळे त्यांनी बॅकेतील इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची एक बैठक घेवून ओबीसी कर्मचारी महासंघाची निर्मिती केली आणि स्वतः संस्थापक अध्यक्ष बनले व अधिकार्याशी संघर्ष करून बॅकेच्याच ईमारतीत इतर मागासवर्गीय कर्मचारी संघटनेला कार्यालय मिळवून घेतले. येथूनच सिदप्पा हे देश पातळीवर सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यांनी देश पातळीवर संघटनेचे जाळे पसरविले. ओबीसींवर होणार्या अन्याया विरूध्द न्यायाचा संघर्ष सुरू झाला यातूनच एक अभ्यासक बनले.

 या चळवळीमुळे सिदप्पाना इतिहास वाचण्याचा, इतिहास घडविण्याच्या मुलं मंत्र ‌मिळाला.

त्यांना वाटू लागले आपली संस्कृती हि पशुपालक संस्कृती‌ असुन आपण इतिहासातील नाग संस्कृती, द्रविड संस्कृती, मौर्य संस्कृती चे वारसदार आहोत म्हणजेच आपण समता संस्कृतीचे आहोत. समता संस्कृतीत बंधूभाव असुन समाज शांती सुखाने नांदत असतो. जर या लोकशाहित विषमता नष्ट करून समता संस्कृंती आणायची असेल तर सत्ता असणे आवश्यक आहे. जर सत्ता पाहिजे असेल तर पक्ष आणि नेता लागतो म्हणून ते नेता धुंडत होते. सन १९९४ ला जानेवारी महिन्यात म्हणजेच सावित्रीबाई फुले यांच्या ज्ञानदान महिन्यात यशवंत सेनेचे सरसेनापती त्यागमुर्ती महादेवजी जानकर साहेबांचा संबंध आला आणि त्यांना पाहिजे तो नेता मिळाला. 

ज्या बॅकेतून शिवसेना निर्माण झाली त्या बॅंकेतूनच यशवंत सेना वाढण्यास प्रोत्साहन मिळत गेले.त्यांनी नेते महादेवजी जानकर साहेबांना संघटना वाढीसाठी लागणारे प्रचार माध्यम म्हणून मासिक काढण्याची संकल्पना दिली.समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून यशवंत सेनेच्या माध्यमातून " विश्वाचा यशवंत नायक " नावाचे मासिक सुरू केले व कार्यकारी संपादक म्हणून अंक काढण्याची जबाबदारी स्वतः घेतली.

या माध्यमातून नौकरी करत असताना कर्मचार्यांचे प्रश्न सोडवित असतं त्याचं बरोबर संघटना चालवण्यासाठी " विश्वाचा यशवंत नायक " मासिक चालवून यशवंतसेनचे कार्य सुरू केलें. 

आता सम्राट अशोकाचे स्वप्न पूर्ण करणारा नेता आपणाला मिळाला, त्यासाठीं सत्ता लागते, सत्तेत जाण्यासाठी पक्ष लागतो म्हणून ३१मे २००३ ला महाराणी अहिल्याबाई च्या जन्मभुमित यशवंत सेनेचे रूपांतर पक्षात करण्यास बौध्दिक सहकार्य केले. राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांनी सहकार्यांना सोबत घेवून " राष्ट्रिय समाज पक्षाची " स्थापना केली .

 त्यावेळी सिदप्पानी प्रत्यक्ष नौकरी करीत " विश्वाचा यशवंत नायक" मासिकातून सामाजिक कार्य सुरू ठेवले आणि सन १९९७ ला सेवा निवृत्त झाले. सेवानिवृत झाल्यानंतर राष्ट्रिय समाज पक्षाच्या कार्यात सक्रिय झाले. त्यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे पक्ष बांधणिस वेळ अपुरा पडत होता म्हणून जानकर साहेबांनी पक्षाची धुरा विश्वासु कार्यकर्ता सिदप्पा अक्कीसागर यांच्यावर सोपविण्याचे ठरविले आणि राष्ट्रिय अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती केली.  

पक्षाची जबाबदारी घेतल्यानंतर सिदप्पा अक्कीसागर यांनी पक्षाचे जाळे चार राज्यातून अठरा राज्यांत नेण्याचे काम केलें. पुढे राष्ट्रिय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देवून, राष्ट्रिय अध्यक्ष पद राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांकडे सोपविले. यावर न थांबता सिदप्पा अक्कीसागर यांनी कर्मचारी, बुद्धिजीवी वर्ग बांधण्यासाठी राष्ट्रिय समाज कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पद स्विकारून कामाला लागले आहेत. त्यांचा एकच ध्यास असतो राष्ट्राला पोशणारा, राष्ट्रांवर प्रेम करणारा हाच खरा राष्ट्रिय समाज असून या लोकशाहीत राष्ट्रिय समाजातील वंचीत, उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे, त्या साठीच प्रत्येक बुद्धिजीवी वर्गानी समाज रूण परत फेड केलं पाहिजे तरच खरा‌ राष्ट्रिय समाज निर्माण होईल आणि समतेची राज्य येवून राष्ट्र बलवान बनेल. 

हे काम आपण सर्वांनी पुढे नेण्यास तन,मन,धनाने सहकार्य करणे हेच सिदप्पा अक्कीसागर यांना खर्या अर्थाने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठरतील,आणि असे समाज रत्न समाजात निर्माण होतील. त्याचसाठी आमचे मार्गदर्शक मा.सिदप्पा लक्ष्मण अक्कीसागर साहेबाना दिर्घायुष्य लाभो‌ . हिच प्रार्थना.


--- गोविंदराम शूरनर

विश्वाचा यशवंत नायक डिसेंबर 2022

 विश्वाचा यशवंत नायक : डिसेंबर २०२२

*यशवंत नायक – डिसेंबर 2022*

*वाचक मित्रानो, 🙏*

*या अंकात काय वाचाल...*


पान १

_*धैर्य असून मत व्यक्त करू शकत नाही (क्षमता नाही म्हणून) तो मूर्ख आहे : डॉ. आंबेडकर*_

पान -२

_*क्षमता असून मत व्यक्त करण्याचे ध्येय दाखवत नाही (घाबरतो म्हणून) तो गुलाम आहे : डॉ. आंबेडकर*_

पान -३

_*क्षमता आणि धैर्य असूनही मत व्यक्त करत नाही(जाणीवपूर्वक मौन राहतो) तो कडवा/हटवादी संकुचित आहे : डॉ. आंबेडकर*_


*मुख्य बातम्या – पान 1* 

@ सुरत : यशवंत नायक ब्यूरो

भाजप काँग्रेसची सिस्टीम एकच; त्यांची सिस्टम संपण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल : महादेव जानकर


@ मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

महादेव जानकर यांचा साधेपणा दुर्गम भागातील नागरिकांना भावला


> महादेव जानकर यांची रायगड जिल्ह्यातील दुर्गम वाड्या वस्त्यांवर पायपीट


पान : २

@ इंदौर : (मध्य प्रदेश)यशवंत नायक ब्यूरो 

महादेव जानकर यांचा मध्य प्रदेश राज्य दौरा

> उज्जैन येथे बाबा महालकाल चरणी अभिषेक

> इंदौर च्या सुप्रसिद्ध गणेश मंदिरात घेतले दर्शन


@ परळी वैजनाथ : गुजरात यशवंत नायक ब्यूरो

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना रासप तर्फे अभिवादन


@ शाहजांहपुर: उत्तर प्रदेश यशवंत नायक ब्यूरो 

राष्ट्रीय समाज पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार : प्रदीप सिंह तोमर

> रासपचे मो. सईद खा महापौर पदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात 


@ बीड : यशवंत नायक ब्यूरो

मांजरसुभा जि- बीड येथे महादेव जानकर यांचे कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत


पान : ३

@ बेळगांव :यशवंत नायक ब्यूरो 

रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर

> चिंचणी मायाक्का देवीचे दर्शन करून रामदुर्ग तालुक्यातील एम चंदरगी येथे महादेव जानकर यांचा मुक्काम


@ सातारा : यशवंत नायक ब्यूरी

संत बाळूमामा पालखीचे पळसावडे येथे महादेव जानकर यांनी घेतले दर्शन


@ नंदगड : यशवंत नायक ब्यरो 

क्रांतिकारी भूमीत पिताश्री जगन्नाथ जानकर यांना १० वा स्मृतिदिन निमित्त अभिवादन


@ शाहजांहपुर : यशवंत नायक ब्यूरो

उत्तर प्रदेशात शहिदांच्या स्मारकास रासप पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन..!


@ बेळगांव /कर्नाटक : यशवंत नायक ब्यूरो

एस एल अक्कीसागर यांना मातृशोक

गंगुबाई अक्कीसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली


पान : ४

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे क्रांतिवीर संगोळी रायण्णा १५ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे आयोजन

> राष्ट्र राष्ट्रीय कार्यकारणी व विविध राज्य पदाधिकारी राहणार उपस्थित


*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*

*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*

*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*

_सिद्ध - सागर

कार्यकारी संपादक






Sunday, December 25, 2022

एस.एल.अक्कीसागर यांना मातृशोक..

एस.एल.अक्कीसागर यांना मातृशोक..


गंगूबाई अक्कीसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

बेळगाव (कर्नाटक) : वृत्तसंस्था 

राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांच्या मातोश्री गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर यांचे वृद्धापकाळाने मौजे चंदरगी जिल्हा बेळगाव येथे राहत्या घरी निधन झाले. 


गेल्या वर्षभरापासून गंगुबाई अक्कीसागर या वृद्धापकाळाने घरीच होत्या. नुकतीच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कर्नाटक दौऱ्यावेळी चंदरगी या गावी मुक्काम करून गंगुबाई अक्कीसागर यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. गंगुबाई अक्कीसागर या निरक्षर होत्या,  परंतु त्यांनी सुपुत्र एस.एल अक्कीसागर यांना वयाच्या २२ व्या वर्षी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर म्हणून धाडले होते. आईच्या वृद्धापकाळामुळे एस एल अक्कीसागर गावीच राहत होते. गंगुबाई अक्कीसागर यांच्या पश्चात सात लेकी व एक मुलगा, सून, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

गंगूबाई अक्कीसागर को भावभीनी  श्रद्धांजलि..!

 समाचार एजेंसी बेलगाम (कर्नाटक): 

राष्ट्रीय समाज पार्टी के पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एवं राष्ट्रीय समाज एम्प्लॉय फेडरेशन के राष्ट्रीय अध्यक्ष एसएल अक्कीसागर की माता श्री गंगूमाई लक्ष्मण अक्कीसागर का वृद्धावस्था के कारण मौजे चंदरगी जिला बेलगाम कर्नाटक स्थित आवास पर दुखद निधन हो गया। कै. गंगूमाई अक्कीसागर पिछले साल से वृद्धावस्था के कारण घर पर ही रह रही थीं।  हाल ही में राष्ट्रीय समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक दौरे के दौरान चंदरगी गांव में रुके और गंगूमाई अक्कीसागर के स्वास्थ्य की जानकारी ली.  गंगूमाई अक्कीसागर अनपढ़ थीं, लेकिन 22 साल की उम्र में अपने बेटे एसएल अक्कीसागर को भारतीय रिजर्व बैंक के महाप्रबंधक के रूप में सफलता मिली।  मां की वृद्धावस्था के कारण एसएल अक्कीसागर गांव में रहने लगा थे।

Wednesday, December 21, 2022

गुरुजींची एक्झीट वेदनादायी; समाजातील लोक हळहळले..!

गुरुजींची एक्झीट वेदनादायी; समाजातील लोक हळहळले..!

ज्यांनी मला लिहायला वाचायला शिकवले, शाळेच्या दप्तरी नाव आणि जन्म तारीख देऊन शाळेचा प्रवेश घडवून दिला, तसेच स्वतःच्या दुचाकीवरून घर ते शाळा असा रोजचा प्रवास करून ज्यांनी मला लहान वयात शाळेची गोडी निर्माण केली, असे माझे आवडते आणि प्रथम गुरुवर्य श्री. बाबा गुरुजी यांना एका बदमाश माणसामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले. त्यांचे मुळगाव खरात वस्ती, गटेवाडी पो - पिंपरी ता- माण जि- सातारा. गटेवाडी सारख्या छोट्याश्या गावात पहिले शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जायचे. गावकऱ्यांशी ते फार आदराने राहायचे. सगळ्याशी मिळून मिसळून राहायचे, त्यामुळे त्यांच्या बद्दल गावकऱ्यांना आपुलकी वाटायची. गुरुजी यांच्यावर वेदनादायी प्रसंग ओढवला हे ऐकून कुकुडवाड, नरवणे, वडजल, नरबटवाडी, ढाकणी, कारंडेवाडी, पुकळेवाडी, दोरगेवाडी आदी परिसरात शोककळा पसरून संपूर्ण समाजमन हेलावले. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

खरात गुरुजी यांचे मित्र व स्नेही प्रा. आनंद पुकळे सर यांनी बाबा गुरुजी यांच्याबद्दल आठवणी सांगताना ते म्हणाले, खरात गुरुजी हे अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून त्याकाळात ओळखले जायचे. त्यांच्या घरची परस्थिती ही अत्यंत गरिबीची होती. गटेवाडी ते कुकुडवाड हे अंतर अनवाणी पायांनी चालत येऊन त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांची लहानपणी खूप आबळ झाली. त्यांचे हस्ताक्षर हे अत्यंत सुरेख आणि सुंदर होते. गणित विषयात ते तरबेज होते. त्यांचा स्वभाव हा मनमिळावू होता, त्यांची Exit इतक्या कमी कालावधीत झाली, या वृत्ताने प्रा. पुकळे सर हे शोकमग्न झाले. मानवता प्रिय गुरुजी अकाली गेले, त्यांच्या कुटुंब परिवारास, आम्हा विद्यार्थ्यांस तीव्र दुःख झाले. गुरुजी यांच्या स्मृतीस विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली..!💐

शोकाकुल - आबासो सुखदेव पुकळे. 

Thursday, December 15, 2022

रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर

रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर

चिंचणी मायाक्का दर्शन करून रामदूर्ग तालुक्यात महादेव जानकर यांचा मुक्काम

बेळगाव : यशवंत नायक ब्यूरो

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. श्री. जानकर यांनी काल (दि.१४) रायबाग तालुक्यातील कुलस्वामिनी आई चिंचणी मायाक्का देवीचे दर्शन घेतले. रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल अक्कीसागर यांच्या मातोश्रींची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी श्री. जानकर रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी(एम) या गावी पोहचले. तसेच त्यांनी चंदरगी या गावी मुक्कामही केला, असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

श्री. अक्कीसागर यांच्या मातोश्री गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर या फार दिवसापासून वृद्धापकाळाने आजारी आहेत. एस एल अक्कीसागर यांचे राष्ट्रीय समाज पक्ष संघटन बांधणी व पक्ष नावारूपाला आणण्यात खूप मोठे योगदान राहिले आहे. श्री. 

अक्कीसागर साहेब यांच्या मातोश्रींची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी श्री. जानकर कर्नाटक दौऱ्यावर आलेले आहेत. ते आज चंदरगीहून बेळगावमध्ये उपस्थित राहतील व महत्वाच्या गाठीभेटी घेऊन, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचे समाधी'स्थळाचे दर्शन घेन्यासाठी नदंगड ता - खानापूरच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दौऱ्यात ते कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांशी ते भेट घेणार आहेत. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या कर्नाटक राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक राज्यात रासपचे संघटन वाढविण्याचे दृष्टीने श्री. जानकर सध्या प्रयत्नशील आहेत, कारण त्यांचा अलीकडच्या काळात दक्षिण भारतातील लोकांसारखा पेहराव समाज माध्यमात झळकत आहे. कर्नाटक राज्य हे श्री. जानकर यांच्यादृष्टीने आवडते राज्य असल्याचे बोलले जाते.

Wednesday, December 7, 2022

लंपी आजाराने 'सोन्या छब्याचा' घेतला बळी; शेतकरी कुटंबावर शोककळा

लंपी आजाराने 'सोन्या छब्याचा' घेतला बळी; शेतकरी कुटंबावर शोककळा 

सोन्या छब्याचा बेंदुर सणाचा संग्रहित फोटो

कुकुडवाड : प्रतिनिधी

माण तालुक्याच्या दक्षिण भागात लंपी या चर्मरोगाने धुमाकूळ घातला असून, पुकळेवाडी येथील नामांकित बैल जोडी 'सोन्या आणि छब्या' यांचा लंपी आजाराने बळी गेल्यामुळे, कुकुडवाड पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. लंपी आजाराने बैल जोडीचा मृत्यू झाल्याने, शेतकरी कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोन्या छब्याच्या जाण्याने गावात शोककळा पसरून, शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत. छब्या बैल विना दाव तीन किलोमीटर अंतरावरून, अगदी रसत्याच्याकडेने एक बाजू धरून थेट चालत येऊन थेट दावणीवर थांबायचा.

मिळालेली माहिती अशी की, गेल्या दोन वर्षांपासून पुकळेवाडी येथील पशुपालक गोचीडच्या साथीने हैराण असून, त्याकडे पशुसंवर्धन विभागाने डोळेझाक केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी लंपीचा पादुर्भव होऊ नये, म्हणून लसीकरण केले गेले, परंतु लसीकरण करताना गोचिडग्रस्त जनावरांचा इतर जनावरांशी संपर्क झाल्याने, लंपीची साथ झपाट्याने पसरून अनेक जनावरांना घेरल्याचे बोलले जात आहे. लस दिल्यानंतर जनावरे अस्वस्थ झाली, त्यामुळे लसीकरण तर चुकीचे झाले नाही ना? अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

आयुष्यभर भटकंती करत मेंढपाळीचा व्यवसाय केल्यानंतर स्वर्गीय वस्ताद पुकळे यांनी मोठ्या हिंमतीने 'सोन्या व छब्या'चा सांभाळ केला. वडिलांची आठवण म्हणून त्यांच्या पश्चात त्यांची मुले उत्तम पुकळे, प्रकाश पुकळे, संजय पुकळे या बंधूनी सोन्या व छब्याला लहान मुलाप्रमाणे जीवापाड जपले. गावगाड्यात सोन्या आणि छब्याची जोडी उठून दिसायची. मशागतीची कामे करताना बैलजोडी शेतशिवारात फुलून दिसायची, बघताक्षणी समाधान व्हायचे. सोन्या व छब्यास लंपीची लागण होऊन, त्यांचा मृत्यू झाला. डॉ. शेंडगे यांनी बैलजोडी वाचवण्यासाठी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते असफल ठरले, अशी माहिती प्रकाश व उत्तम या बंधूनी दिली.

उत्तम पुकळे यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे ही बैलजोडी आमच्या घरी होती. माघी पौर्णिमेस होणाऱ्या सिद्धनाथ देवाच्या बगाडाचा मान सोन्या व छब्यास होता. घरातील लहान थोरांचे व गावकऱ्यांचे देखील या बैलजोडीवर विशेष प्रेम होते. सोन्या व छब्याच्या जाण्याने घरातील सर्वजण धायमोकलून रडत आहेत. लंपी आजाराने आमच्या दावणीची जनावरे नव्हे तर माणसं गेल्या इतकं प्रचंड दुःख आहे. छब्या बैलासारखा गुणवान आणि मानवता प्रिय बैल आमच्या कुटुंबाचा रोजच्या जीवनाचा एक भाग बनला होता. तर काही दिवसांपूर्वी वाई येथील बगाडासाठी सोन्या व छब्याला मागणी आली होती.

शेतकरी उत्तम पुकळे यांच्याशी बोलताना सोन्या आणि छब्यासोबत २०२२ च्या बेंदूर सणातील आठवणीने राष्ट्र भारतीचे संपादक प्रा. आबासो पुकळे भावूक झाले. 'सोन्या आणि छब्या' ही बैल जोडी महाराष्ट्रसह देशात प्रसिद्ध झाली होती, अशी प्रतिक्रिया प्रा. पुकळे यांनी दिली. कुकुडवाड येथील पप्पू काटकर यांनी सांगितले की, सोन्या आणि छब्यासाठी लाखो रुपयांची बोली व्हायची, परंतु उत्तम पुकळे यांनी पै गावातील गोरगरीब लोकांची मशागतीची कामे करून दिली. अडल्या नडल्या लोकांना सोन्या आणि छब्याची जोडी शेवटचा पर्याय ठरायची.  


क्लिक करा पाहण्यासाठी>३ जुलै २००२२ बेंदूर सण सोन्या छब्याची आठवण 

क्लिक करा पाहण्यासाठी> शेतात मशागतीची कामे करताना आठवणीतले सोन्या आणि छब्या

क्लिक करा पाहण्यासाठी श्री. सिद्धनाथ देवाचा माघी पौर्णिमेस बगाड ओढताना सोन्या आणि छब्या

'राष्ट्र भरती'च्या वाचकांसाठी 'छब्या बैलाची कथा' ही ग्रामीण कथा लवकरच प्रसिद्ध करू

Friday, December 2, 2022

भाजप काँग्रेसची सिस्टम एकच; त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल : महादेव जानकर

भाजप काँग्रेसची सिस्टम एकच; त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल : महादेव जानकर

सुरत : यशवंत नायक ब्यूरो 

काँग्रेस व भाजप दोन्ही पार्टी एकच सिस्टीम राबवत आहे, मात्र त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र यांनी सुरत येथे बोलताना केले आहे. चौर्यासी विधानसभा मतदार क्षेत्रातील उमेदवार मोतीभाई रबारी यांच्या प्रचारार्थ स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलताना वरील विधान केले आहे. दरम्यान श्री. महादेव जानकर यांनी लिंबायत विधानसभा व चौर्यासी विधानसभा मतदार क्षेत्रात 'रोड शो'द्वारे जनतेशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना श्री. जानकर पुढे म्हणाले, बेरोजगार आरोग्य व शिक्षण यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष काम करेल. अमेरिकेतील लोकांना नोबेल पारितोषिक जास्त मिळत आहेत, भारताला मात्र नोबेल मिळत नाहीत, त्यामुळे शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. कोणताही आजार असू द्या, वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत दिली पाहिजे. आरोग्य, शिक्षण मोफत दिले आणि बेरोजगारीवर मात केली तर देश महासत्ताक बनेल.

निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन होईल, असे गुजरात मधील लोकांना वाटते.  कधी भाजप, कधी काँग्रेस ला सत्ता दिलीत, रासप, आपला ही संधी मिळाली पाहिजे. छोट्या पक्षांना देखील सत्ता मिळाली पाहिजे. मोठे पक्ष जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय करतात.  रासप गरीब लोकांसाठी काम करणारी पार्टी आहे. ज्यांना कोण तिकीट देत नाही, त्यांना राष्ट्रीय समाज पक्ष मुख्य राजकीय प्रवाहात आणत आहे. काँग्रेस व भाजप दोन्ही पार्टी एकच सिस्टीम राबवत आहेत, मात्र त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे.  सुरत वासियांना आवाहन करेन की, भाजपला सत्ता दिलीत, एकवेळ रासपला सत्ता द्या. गुजरातची भूमि ही दुधाची भूमी आहे. भाजपपेक्षा चांगले काम करू असा विश्वास श्री. जानकर यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, गुजरात प्रभारी सुशील शर्मा, गुजरात युवा अध्यक्ष महेंद्र राठोड,  सुरत जिल्हाध्यक्ष प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.


कापरडा, पारडी, वलसाड, लिंबायत, चोर्यासी, दभोई, वडोदरा शहर, अकोटा, रावपुरा, मांजलपूर आदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना गुजरातवासिय जनतेने विजयी करण्याचे आवाहन श्री. जानकर यांनी केले.



Sunday, November 27, 2022

रासप युवक आघाडीचे संघटन मजबूत करा : भगवान ढेबे

रासप युवक आघाडीचे संघटन मजबूत करा : भगवान ढेबे 

राष्ट्रीय समाज पक्ष युवक कार्यकर्ता बैठकित नियुक्ती पत्र प्रदान करताना भगवान ढेबे, गजानन चंदणे, सुभाष वैशपायन व अन्य.

वावोशी : राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युवकांचे प्रश्न हातात घेऊन सोडवले पाहिजेत. आज घडीला युवकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. बेरोजगारी, शिक्षण यासारख्या समस्या तर आहेतच, परंतु अलीकडे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ध्येय धोरणामुळे युवकांच्या गंभीर समस्या नव्याने उद्भवत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत असून, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युवकांचे संघटन मजबूत करावे, त्यास वरिष्ठ पातळीवरून ताकद देण्याचे काम करू, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य श्री भगवान ढेबे यांनी व्यक्त केले. वावोशी ता- खालापूर येथील राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात युवक आघाडी कार्यकर्ता बैठक पार पडली. यावेळी श्री. ढेबे बोलत होते. 

या बैठकीसाठी उत्तरा विभाग रायगड जिल्हाध्यक्ष संपतराव ढेबे, प्रदीप कोचरेकर, आनंद हिरवे, गजाननभाऊ चंदने, उमेश पाटील, सुभाष वैशपायन, करण बबन ढेबे, अजय रमेश ढेबे, राजू रामचंद्र बर्गे, आनंद भगवान ढेबे, राज जाधव, साहिल अन्सारी, रोहित गाढवे, विजय ढेबे, आनंदा ढेबे, संदीप जाधव, लक्ष्मण हिरवे आदी उपस्थित होते.





Tuesday, November 22, 2022

महादेव जानकरांचा साधेपणा : दुर्गम भागातील नागरिकांना भावला

महादेव जानकरांचा साधेपणा : दुर्गम भागातील नागरिकांना भावला

महादेव जानकर यांची रायगड जिल्ह्यातल्या दुर्गम वाड्या वस्त्यांवर पायपीट

महादेव जानकर यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला असून त्यांच्या अतिशय साधेपणाची झलक कोकण दौऱ्यातल्या गाठीभेटीने अधोरेखित झाली आहे. महादेव जानकर हे जमिनीवरचा नेता असल्याचा परिचय दुर्गम भागातील नागरिकांना आला आहे. महादेव जानकर यांच्या दौऱ्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्यांनी सर्व प्रकारचा लवाजमा बाजूला ठेऊन सर्वसामान्य नागरकांप्रमाणे दुर्गम भागातील नागरिकांच्यात मिळून मिसळून राहिल्याने त्यांचा साधेपणा दुर्गम वाडी वस्तिवरच्या नागरिकांना भावला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, माजीमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी रायगड जिल्ह्यात दौरा करून सुधागड, खालापूर तालुक्यात अती दुर्गम डोंगर कड्या कपारीतील वाड्या वस्त्यांवर भेट देऊन आदिवासी, धनगर, ठाकूर बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना आपल्या समस्या मानून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. शेतात मशागतीच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे कष्ट जवळून अनुभवले. रानोमाळ भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या पालावर भेट देऊन लहान मुलांना शाळेत दाखल करून त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण द्यावे असे सुचवले.

नुकतीच महादेव जानकर यांनी जंगलातून चालत जाऊन दर्यागाव आसानी ठाकूरवाडी येथे आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांच्यात मिळून मिसळून राहत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खालापूर तालुक्यातल्या ढेबेवाडी येथे भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शिरवली पासून चालत जाऊन दूर सह्याद्रीच्या डोंगरात वसलेल्या ढेबेवाडी गावात ढेबे कुटुंबीयांकडे दोन दिवस वस्ती करून ढेबेवाडी, वावोशी गावातील रस्त्याची व पाण्याची समस्या जाणून घेतली. बालगोपाळांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना शिक्षणाचा कानमंत्र दिला. अभ्यासाची प्रेरणा देऊन संस्काराचे धडेही दिले. शाळांनाही भेटी देऊन दुर्गम भागातील शिक्षणाची व्यथा जाणल्या. दरम्यान महादेव जानकर यांनी गारमाळ, जभिवली, वावोशी, परखंदे, गोरठन, हेमडी येथील जननी मंदिराचे दर्शन करून या गावांनाही भेट दिली.

या दौऱ्यात कोकण प्रदेश अध्यक्ष तथा प्रदेश राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, कोकण नेते श्रीकांतदादा भोईर, उत्तर रायगड अध्यक्ष संपतराव ढेबे, रायगड संपर्क प्रमुख संंतोष ढवळे-धनवीकर , रायगड महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकूर, खालापूर तालुका रा.स.प. नेते गजाननशेठ चंदने, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेशभाई भगत, रासप युवक आघाडीचे नेते उमेश पाटील आदी उपस्थित होते.

- रिपोर्ट : आबासो पुकळे, उपसंपादक यशवंत नायक.

गायरान अतिक्रमनाबाबत फेरविचार करून सर्वसामान्यांना दिलासा द्या

गायरान अतिक्रमनाबाबत फेरविचार करून सर्वसामान्यांना दिलासा द्या, रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाने केली मागणी

निवेदन सादर करताना श्री भगवान देवी मनीषाताई ठाकूर मुकेश भगत व अन्य रासप पदाधिकारी.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन

अलिबाग  : सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारच्या प्रकरणात दिलेल्या  २०११च्या व नुकतेच मुंबई हे उच्यन्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला असल्यामुळे, शासनाच्या जमिनीवर जमीन नसलेल्या भूमिहीन, आदिवासी, दलित व शासकीय योजनेतून बांधण्यात आलेल्या शाळा तसेच शासकीय संस्थाच्या इमारती आणि याठिकानावरील जसे की रस्ते, विज, पाणीपुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्र, जनावरांचे दवाखाने व इतर पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने अब्जावधी रुपये खर्च केलेले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे धर्तीवर गावखेड्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण शासनाने नियमित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यकारणी कार्यकारणी सदस्य श्री भगवान ढेबे साहेब यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी, सर्व प्रांत, तहसील अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती श्री. भगवान ढेबे यांनी दिली.

न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या  हेतूने अतिक्रमण काढणे संदर्भाततील फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व व राज्याचे मुख्यसचिव यांनी स्वतःकडे जमिनिअसूनही धनदांडग्यांनी व्यावसायिक उद्धेशानी शासकीय जमिनी बळकावल्या असतील, त्या वगळून ज्यांना जमिनी नसलेल्या भूमिहीन, अदिवासी व दलित यांच्याबाबत न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.

याबाबत जर शासनाने नुसती बघ्याची भूमिका घेतली तर राष्ट्रीय समाज पक्ष या प्रश्नासाठी जनआंदोलन उभे करेल आणि सर्व भूमिहीन, दलित,आदिवासी व सर्व पशुपालक भटकेविमुक्त शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून शासनाच्या नाकर्तेपणाबद्दल या प्रश्नाबद्दल तीव्र जनआंदोलन उभे करेल, याची शासनाने दखल घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे. शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गायरान जमिनीवर कुणी धनदांडग्यांनी डल्ला मारला असेल तर त्याची चौकशी करून, अशी जमीन रिकामी करून शासनाकडे जमा करून घ्यावी. जेणेकरून गायरान जमिनीत भर पडून पशूंना चरण्यासाठी पुरेसा चारा मिळेल. 

दिलेल्या निवेदनावर सौ. मनिषाताई ठाकूर, संपत ढेबे, मुकेश भगत, शहानवाज ताडे, अल्पेश खंडागळे, अजय सिंह, भास्कर नावडेकर, धर्मा खैर, सुरेश मुंडकर, प्रशांत गायकवाड यांच्या सह्या आहेत.

यापुढे पशुपालकांच्या पशुसाठी एकुण लागवडीच्या ५% इतके गायरान राखीव अबाधित ठेवण्यासाठी अतिक्रमण रोखण्यासाठी कायद्याची कडक अमंलबजावणी करण्यात यावी. - भगवान ढेबे, नेते रासप

Friday, November 18, 2022

तुमच्या मुलामुलींना कलेक्टर करा नाहीतर राष्ट्रीय समाज पक्षाचे मिनिस्टर करा : महादेव जानकर

तुमच्या मुलामुलींना कलेक्टर करा नाहीतर राष्ट्रीय समाज पक्षाचे मिनिस्टर करा : महादेव जानकर

 गजी ढोल वाजवून महादेव जानकर यांनी यात्रेची शान वाढवली.

दहिवडी: यशवंत नायक ब्यूरो 

तुमच्या मुला-मुलींना कलेक्टर करा नाहीतर राष्ट्रीय समाज पक्षाचे मिनिस्टर करा, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र यांनी आबाबा देवस्थान यात्रेच्या प्रसंगी केले. यावेळी वडगावचे सरपंच अजित जाधव, रासपचे ज्येष्ट नेते बबन दादा विरकर, जिल्हा उपाध्यक्ष इंजी. दादासाहेब दोरगे, चंद्रकांत दडस, शरद दडस उपस्थित होते. 

महादेव जानकर ग्रामस्थांशी बोलताना म्हणाले, ज्या गावची शाळा चांगली असते, त्या गावची प्रगती चांगले असते. ज्या गावचा शिक्षक चांगला त्या गावचे वैभव चांगले असते. दडसाची लेक राष्ट्रीय समाज पक्षामुळे माण तालुक्याची पहिली सभापती झाली. दोरगेची लेक मार्केट कमिटीवर राष्ट्रीय समाज पक्षामुळे उपसभापती झाली. कारण आज जिस समाज का दल है ! उस समज का बल है !! ज्यांचे दल नाही ते बेदखल आहेत. या गावचा सरपंच रामोशी समाजाचा आहे, याचा मला अभिमान आहे. उमाजीराजे नाईक यांची पहिली जयंती, महात्मा फुले यांची पहिली जयंती साजरी केली.  महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या हातात तलवारधारी प्रतिमा व पहिली जयंती मीच केली. दडसवाडा येथे आज मी नवीन आलेलो नाही. चारपाच वेळा इथे मुक्काम केला आहे, असे श्री. जानकर यांनी सांगितले.

पुढे श्री. जानकर म्हणाले, ज्यांनी आता गजी घाई लावली ते दडसमामा २१ वर्षाचे असताना यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान होते तेव्हा पांगरीतले दडस गजी खेळण्यासाठी दिल्लीला गेले, पण मामा मी तुम्हाला दिल्लीला बोलविन, घाई लावण्यासाठी नाही तर नेता म्हणून बोलविन. रामोशी समाजाचा पोरग मंत्री झालं पाहिजे. धनगराचा पोरगा पंतप्रधान झाला पाहिजे. माळी, वंजारी समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. यात काही चुकीचे नाही. या देशाची व्यवस्था बदलण्यासाठी ४० वर्ष फिरतोय. तुम्ही माझ्यावर प्रेम केले. दहा दहा रुपये दिले. तुम्ही मते दिलीत. तुमच्यामुळेच दिल्लीकडे चाललोय. चार राज्यात पक्षाला मान्यता मिळत आहे. आता दोन आमदार आहेत; पुढच्या वेळेस २५ आमदार असतील. स्वता:ची झोपडी असेल, दुसऱ्याचा महाल नाही. तुमचीच मदत घेऊन पक्ष पुढे जात आहे. महादेव जानकरने स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. स्वाभिमान विकलेला नाही. एकट्या समाजाचा नेता मला बनायचे नाही. सर्व समाजाचा नेता बनायचाय. एकट्या जातीचा नेता बनून चालणार नाही. एकट्या जातीची संघटना चालती; पक्ष चालत नाही. सर्व समाजाला सोबत घ्यावे लागेल.  आजपर्यंत महाराष्ट्रात रामोशी समाजाला कोणी विधानसभेचे तिकीट दिले नाही. राष्ट्रीय समाज पक्षाने रामोशी समाजाला पहिले विधानसभेचे तिकीट दिले. रासपच्या मंत्रिमंडळात रामोशी समाजाचाच पहिला गृहमंत्री होईल.  आमची लोकसंख्या जास्त आहे, पण वाटा कुठाय? सर्वच क्षेत्रात संख्येनुसार वाटा पाहिजे. आजपर्यंत उपसभापती करत होती, सभापती नाही, त्यासाठी मला पक्ष काढावा लागला. त्यामुळे आपला पक्ष ओळखा. मला गजी घाई लावता येते, मेंढर राखता येतात आणि डाहळा देखील पाडता येतो. ऊस तोडायला येतो व ऊस नांगरायलही येतो. 

श्री. जानकर म्हणाले, माझी विनंती आहे.. आपल्यातले हेवेदावे बंद करा. हिमंत असेल, तर तुमच्या मुला मुलींना कलेक्टर करा. पोरं राजकारणात टाका. आमचा समाज काय म्हणतोय, राजकारण वाईट आहे.  ग्रापंचायतींलाच मारामारी करतील. जिल्हा परिषद, आमदार खासदारकी लढणार नाहीत. आता तुम्हाला आमदार खासदार व्हावे लागेल, कारण राष्ट्रीय समाज पक्ष नावाचा तिकिटाचा कारखाना काढलाय. भल्याभल्यांना लोळवणार हाय. आपल्या लोकांनी त्याची काळजी करू नका. फक्त दारू पिऊ नका, व्यसनात जाऊ नका. माझा कोणत्या नेत्यावर राग नाही. पण आमची संख्या जास्त आहे, एखादा खासदार करायला पाहिजे होता. मुख्यमंत्री करायला पाहिजे होता. माझी बहीण पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करायला पाहिजे होते राहुल गांधी व अमित शहाना ढोल वाजवता येईल का? आपण तुमच्या सोबत ढोल व गजी घाई खेळलो. लहान वयात मुलींची लग्ने करू नका, असे आवाहन करून यात्रेकरू व ग्रामस्थांना शुभेच्छ्या दिल्या.

विश्वाचा यशवंत नायक : ऑक्टोबर २०२२

 





Thursday, November 17, 2022

रासप विद्यार्थी आघाडीच्या प्रयत्नास यश

रासप विद्यार्थी आघाडीच्या प्रयत्नास यश; महाज्योतीकडून सरसकट फैलोशिप


मुंबई : यशवंत नायक ब्यूरो 

राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीच्या प्रयत्नामुळे महाज्योतीकडून सर्व विध्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळणार आहे. म्हाज्योती संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशीप मिळावी, यासाठीं रासपची विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस यांच्या नेतृत्वात प्रयत्नं करत होती. सारथी व बार्टी प्रमाणें महाज्योतीलाही सर्व सुविधा मिळाव्यात. तसेच फेलोशिप देखील सरसकट मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री यांना रासप विद्यार्थी आघाडीच्यावतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती. आंदोलन करण्यात आले होते. तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन देखील महाज्योतीच्या बाबतीत विद्यार्थ्यांची भूमिका मांडण्यात आली. २०० विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या माध्यमातून दिली जाणारी फिलोशीप विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असून ती सरसकट करावी अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली होती. १५०० विद्यार्थांनी महाज्योतीमधून फेलोशिपसाठी अर्ज केला होता, त्यातील महाज्योतीच्या माध्यमातून पहिली प्रोव्हिजनल लिस्ट जाहीर करण्यात आली असून, 1226 विद्यार्थ्यांची नावे यामध्ये सामाविष्ट आहेत. तर २५०-२७५ विध्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यामुळे, त्यांना त्रुटी दूर करण्यासाठी वेळ दिला आहे. सरसकट फेलोशिपच्या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Wednesday, November 16, 2022

भाजप जनमताचा अनादर करणारी पार्टी : सुशील शर्मा, गुजरात प्रभारी रासप

रासप लोकशाहीचा पुरस्कार करणारी पार्टी तर भाजप जनमताचा अनादर करणारी पार्टी : सुशील शर्मा

वडोदरा : यशवंत नायक ब्यूरो

महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष भाजपचा मित्र पक्ष असून, भाजप धोका देणारी पार्टी आहे. राष्ट्रीय समाज पार्टी लोकशाहीचा पुरस्कार करणारी पार्टी आहे तर भारतीय जनता पार्टीने जनमाताचा अनादर करण्याचे काम केलेले आहे, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे गुजरात राज्य प्रभारी सुशील शर्मा यांनी घणाघात केला आहे. श्री. शर्मा हे शहरवाडी विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार नयना परमार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शर्मा पुढे म्हणाले, लोकशाही टीकण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष गुजरातमध्ये स्वबळावर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडणुकीतील मुद्दे जनहिताचे आहेत. भाजप हा भांडवलदारांचा पक्ष आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. राष्ट्रीय समाज पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहे. पादरा, कर्जत, वडोदरा येथील जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाला भरभरून साथ दिली आहे, आशीर्वाद दिला आहे. लोकशाही रक्षणासाठी जनतेने रासप सारख्या विरोधी पक्षाला देखील संधी दिली पाहिजे.

ભાજપ જનતાના અભિપ્રાયનો અનાદર કરે છે: સુશીલ શર્મા, ગુજરાત પ્રભારી આરએસપી

આરએસપી લોકશાહીની હિમાયત કરતી પાર્ટી છે જ્યારે ભાજપ જનતાના અભિપ્રાયનો અનાદર કરતી પાર્ટી છેઃ સુશીલ શર્મા

વડોદરાઃ યશવંત નાયક બ્યુરો

મહારાષ્ટ્રમાં રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટી ભાજપની સહયોગી પાર્ટી છે અને ભાજપ એક ધમકી આપનારી પાર્ટી છે. જ્યારે રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટી લોકશાહીની હિમાયત કરતી પાર્ટી છે, ત્યારે ભારતીય જનતા પાર્ટીએ લોકોનો અનાદર કરવાનું કામ કર્યું છે, તેવી રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટીના ગુજરાત રાજ્ય પ્રભારી સુશીલ શર્માએ ઝાટકણી કાઢી છે. શ્રી શર્માએ આ પ્રતિક્રિયા ત્યારે આપી જ્યારે તેઓ શાહરવાડી વિધાનસભા ક્ષેત્રમાં રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટીના ઉમેદવાર નયના પરમારનું ઉમેદવારી પત્ર ભરવા આવ્યા હતા.

શર્માએ વધુમાં જણાવ્યું હતું કે લોકશાહીની ટીકા કરવા માટે રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટી ગુજરાતમાં સ્વબળે ચૂંટણી લડી રહી છે. રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટીના ચૂંટણી મુદ્દાઓ જનહિતના છે. ભાજપ મૂડીવાદીઓનો પક્ષ છે. રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટી સામાન્ય લોકોની પાર્ટી છે. રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટી અસ્તિત્વની લડાઈ લડી રહી છે. પાદરા, કર્જત, વડોદરાના લોકોએ રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટીને સમર્થન અને આશીર્વાદ આપ્યા છે. લોકશાહીનું રક્ષણ કરવા માટે લોકોએ રાસપ જેવા વિરોધ પક્ષને પણ તક આપવી જોઈએ.

Saturday, November 12, 2022

केंद्र व राज्यात रासपचे सरकार सत्तेत आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू : महादेव जानकर

केंद्र व राज्यात रासपचे सरकार सत्तेत आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र कार्यालयात संत कनकदास यांना ५३५ व्या जयंती निमित्त अभिवादन प्रसंगी बोलताना महादेव जानकर, सिद्धप्पा अक्कीसागर, पंडित घोळवे, मोहनकुमार एम, लल्लन पाल व अन्य मान्यवर. 

राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात संत कनकदास यांना ५३५ व्या जयंती निमित्त अभिवादन

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

केंद्र व राज्यात रासपचे सरकार सत्तेत आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य कार्यालयात संत कनकदास यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री जानकर बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर होते. राष्ट्रीय संघटक पंडित घोळवे, राष्ट्रीय खजिनदार मोहनकुमार एम, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष लल्लन पाल, जिवाजी लेंगरे, विठ्ठल यमकर, प्रकाश डांगे, सुरेश येडगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री. जानकर पुढे म्हणाले, आजचा दिवस हा भाग्याचा दिवस आहे. संत कनकदास एक महान व्यक्ती आहे. आज संत कनकदास यांची जयंती आहे, कर्नाटक राज्यात शासनातर्फे जयंती साजरी होत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात संत कनकदास जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्र व देशात राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू. संत कनकदास राष्ट्रीय संत होते.

श्री. जानकर पुढे म्हणाले, ज्या कागेनेली मध्ये संत कनकदास यांना संघर्ष करावा लागला, त्या भूमीत आज संत कनकदास यांना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले, त्याबद्दल त्यांना राष्ट्रीय समाज पक्षातर्फे धन्यवाद. त्याकाळात दक्षिण भारतात संत कनकदास हे संत तुकाराम, संत कबीर, संत ज्ञानेश्वर यांच्यासारखे महान होते. केवळ हिंदूसाठी नव्हे तर संत कनकदास यांचे कार्य तमाम मानव जातीसाठी होते. 

सत्यशोधक, दंडनायक संत कनकदास यांच्या जीवनावर श्री. अक्कीसागर साहेब यांनी पुस्तक लिहले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते अभ्यासावे. संत कनकदास यांची जयंती महाराष्ट्र, उत्तर प्रदेश राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे साजरी होत आहे. कर्नाटकात सर्वच राजकीय पक्ष तर्फे जयंती साजरी होत आहे.

श्री. एस एल अक्कीसागर म्हणाले, संगोळी रायन्ना, संत कंनकदास यांचे कार्य मर्यादित क्षेत्रात दडपले होते, मात्र त्यांचे कार्य देशपातळीवर घेऊन जाण्याचं कार्य महादेव जानकर यांनी सातत्याने केले आहे.

Friday, November 11, 2022

राधनपुर विधानसभा मतदार संघात रासपचा युवा चेहरा

राधनपुर विधानसभा मतदार संघात रासपचा युवा चेहरा 

पाटण/गुजरात : यशवंत नायक ब्यूरो

गुजरात सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने 16- राधनपुर विधानसभा मतदारसंघात युवा नेता किशनजी ठाकोर यांना उमेदवारी देऊन काँग्रेस व भाजप समोर आव्हान उभे केले आहे. किशनजी ठाकोर हे राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात युवक आघाडीचे नेते आहेत. 

वाहेदपुर गावचे रहिवासी असलेले किशनजी ठाकोर विधानसभा मतदार क्षेत्रातील युवकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत.  गेल्या एक महिन्यापासून त्यांनी मतदार क्षेत्रात जनसंपर्क वाढवला आहे. गुजरात राज्य ठाकोर समाज युवा संघटनेचे पदाधिकारी आहेत. राधनपुर विधानसभा मतदार संघात रासपच्या उमेदवारांमुळे निवडणुक चुरशीची होईल, स्थानिक पत्रकार दिनेश पटेल सांगतात.

Thursday, November 10, 2022

जामनगर ग्रामीण विधानसभा मतदार संघात रासपचे उमेदवार नागराजभाई जापडा

जामनगर ग्रामीण विधानसभा मतदार संघात रासपचे उमेदवार नागराजभाई जापडा

वडोदरा : यशवंत नायक ब्यूरो

सार्वत्रिक गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जामनगर ग्रामीण विधानसभा मतदार क्षेत्रात नागराजभाई जापडा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. राष्ट्रीय समाज पक्षात येण्यापूर्वी नागराजभाई जापडा हे भारतीय जनता पार्टीचे जामनगर जिल्हा पदाधिकारी होते.  काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडून स्वतःच्या गावात राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा उघडून पक्षात प्रवेश केला. जापडा यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी गुजरात राज्य समन्वयक जतीन शेठ यांनी प्रयत्न केले. श्री जापडा यांनी त्यांचे सरपंच असलेले भाऊ लखनभाई जापडा यांच्यासह यशवंत नायक ब्यूरोशी वडोदरा येथे खास भेट घेऊन चर्चा केली. नागराजभाई जापडा यशवंत नायक ब्यूरोशी संपर्कात आहेत.  राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे असली नेतृत्व असून, या देशात नकली नेतृत्वाचा ऊत आला आहे, अशा नकली नेतृत्वापासून सावध राहिले पाहिजे, असे मत यशवंत नायक ब्यूरोशी बोलताना व्यक्त केले




Wednesday, November 2, 2022

आयटी नंतर फार्मा क्षेत्र देशाला परकीय चलन मिळवून देणारे क्षेत्र : डॉ. ए. व्ही. यादव

आयटी नंतर फार्मा क्षेत्र देशाला परकीय चलन मिळवून देणारे क्षेत्र : डॉ. ए. व्ही. यादव

कुकुडवाड : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे, आयटी नंतर फार्मा क्षेत्र देशाला परकीय चलन मिळवून देणारे क्षेत्र असल्याचे मत डॉ. ए. व्ही. यादव यांनी व्यक्त केले. दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, म्हसवड येथे डॉ. ए. व्ही. यादव यांनी सदिच्छा भेट दिली व 'बी. फार्मसी'च्या विद्यार्थ्यांना "करिअर अपॉरचुनिटिज अफ्टर बी. फार्मसी" या विषयावर मार्गदर्शन केले.

श्री. यादव पुढे म्हणाले, फार्मसी हे यंग फिल्ड असून सर्वात फास्ट वाढत आहे. महाविद्यालयीन शिक्षणापासून ते आजपर्यंत फार्मा क्षेत्रात झालेले बदल विद्यार्थ्यांशी शेअर केले. तसेच फार्मा अपेक्स बॉडीकडून आजपर्यंत गव्हरमेंट क्षेत्रात आपलं हवं तेवढं वजन वाढवता आल नाही, याची खंत व्यक्त केली. खरंतर फार्मा क्षेत्र देशात आयटी क्षेत्रानंतर सगळ्यात जास्त परकीय चलन भारताला मिळवून देतय पण डॉक्टर, नर्स, टेक्नीसियन च्या तुलनेत फार्मासिस्टच महत्व तेवढं वाढलं नाही. तसेच कोरोना नंतर थोडाफार बदल निश्चित झाला असला, तरी विकसित राष्ट्रांच्या तुलनेत आपला फार्मासिस्ट पेशंट काऊनसेलिंग मध्ये खूप कमी पडत असल्याचेही सांगितले. विकसित राष्ट्रात डॉक्टरांकडून दिलेल प्रिसक्रीपशन अगोदर फार्मासिस्टकडे जात, त्यावर पेशंटला सर्व माहिती दिली जाते व नंतर औषध चेक करून दिली जात. आपल्या देशात फक्त हिंदू फार्मसी, गोवा याठिकाणी पेशंट काऊनसेलिंग चांगल्या प्रमाणत केले जाते, हे प्रमाण भारतात वाढणे अपेक्षित आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी झाल्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर, क्लिनिकल रिसर्च, प्रोडक्शन, सरकारी संधी याबद्दल मार्गदर्शन केले. अतिशय ग्रामीण भागात महाविद्यालय सुरू केल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले व सिद्धनाथाच्या नगरीत मुलांना फार्मसी शिक्षणाची दारे खुली केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. भास्कर बनगर, रिसर्च डायरेक्टर डॉ. सुहित गिल्डा, प्रा. एन. व्ही. पिंपोडकर, आयक्यूएसी हेड प्रा. नामदेव शिंदे व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. महेश माने, सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद माने, उपाध्यक्ष श्री. बाळकृष्ण लेंगरे, संस्थापक सचिव प्रा. दादासाहेब कोडलकर, सहसचिव डॉ. वैभव माने व खजिनदार श्री. योगिराज लेंगरे यांनी शुभेच्छा दिल्या.



चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...