रासप विद्यार्थी आघाडीच्या प्रयत्नास यश; महाज्योतीकडून सरसकट फैलोशिप
मुंबई : यशवंत नायक ब्यूरो
राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीच्या प्रयत्नामुळे महाज्योतीकडून सर्व विध्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळणार आहे. म्हाज्योती संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशीप मिळावी, यासाठीं रासपची विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस यांच्या नेतृत्वात प्रयत्नं करत होती. सारथी व बार्टी प्रमाणें महाज्योतीलाही सर्व सुविधा मिळाव्यात. तसेच फेलोशिप देखील सरसकट मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री यांना रासप विद्यार्थी आघाडीच्यावतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती. आंदोलन करण्यात आले होते. तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन देखील महाज्योतीच्या बाबतीत विद्यार्थ्यांची भूमिका मांडण्यात आली. २०० विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या माध्यमातून दिली जाणारी फिलोशीप विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असून ती सरसकट करावी अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली होती. १५०० विद्यार्थांनी महाज्योतीमधून फेलोशिपसाठी अर्ज केला होता, त्यातील महाज्योतीच्या माध्यमातून पहिली प्रोव्हिजनल लिस्ट जाहीर करण्यात आली असून, 1226 विद्यार्थ्यांची नावे यामध्ये सामाविष्ट आहेत. तर २५०-२७५ विध्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यामुळे, त्यांना त्रुटी दूर करण्यासाठी वेळ दिला आहे. सरसकट फेलोशिपच्या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
No comments:
Post a Comment