रासप युवक आघाडीचे संघटन मजबूत करा : भगवान ढेबे
राष्ट्रीय समाज पक्ष युवक कार्यकर्ता बैठकित नियुक्ती पत्र प्रदान करताना भगवान ढेबे, गजानन चंदणे, सुभाष वैशपायन व अन्य. |
वावोशी : राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युवकांचे प्रश्न हातात घेऊन सोडवले पाहिजेत. आज घडीला युवकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. बेरोजगारी, शिक्षण यासारख्या समस्या तर आहेतच, परंतु अलीकडे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ध्येय धोरणामुळे युवकांच्या गंभीर समस्या नव्याने उद्भवत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत असून, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युवकांचे संघटन मजबूत करावे, त्यास वरिष्ठ पातळीवरून ताकद देण्याचे काम करू, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य श्री भगवान ढेबे यांनी व्यक्त केले. वावोशी ता- खालापूर येथील राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात युवक आघाडी कार्यकर्ता बैठक पार पडली. यावेळी श्री. ढेबे बोलत होते.
या बैठकीसाठी उत्तरा विभाग रायगड जिल्हाध्यक्ष संपतराव ढेबे, प्रदीप कोचरेकर, आनंद हिरवे, गजाननभाऊ चंदने, उमेश पाटील, सुभाष वैशपायन, करण बबन ढेबे, अजय रमेश ढेबे, राजू रामचंद्र बर्गे, आनंद भगवान ढेबे, राज जाधव, साहिल अन्सारी, रोहित गाढवे, विजय ढेबे, आनंदा ढेबे, संदीप जाधव, लक्ष्मण हिरवे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment