राधनपुर विधानसभा मतदार संघात रासपचा युवा चेहरा
पाटण/गुजरात : यशवंत नायक ब्यूरो
गुजरात सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने 16- राधनपुर विधानसभा मतदारसंघात युवा नेता किशनजी ठाकोर यांना उमेदवारी देऊन काँग्रेस व भाजप समोर आव्हान उभे केले आहे. किशनजी ठाकोर हे राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात युवक आघाडीचे नेते आहेत.
वाहेदपुर गावचे रहिवासी असलेले किशनजी ठाकोर विधानसभा मतदार क्षेत्रातील युवकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. गेल्या एक महिन्यापासून त्यांनी मतदार क्षेत्रात जनसंपर्क वाढवला आहे. गुजरात राज्य ठाकोर समाज युवा संघटनेचे पदाधिकारी आहेत. राधनपुर विधानसभा मतदार संघात रासपच्या उमेदवारांमुळे निवडणुक चुरशीची होईल, स्थानिक पत्रकार दिनेश पटेल सांगतात.
No comments:
Post a Comment