तुमच्या मुलामुलींना कलेक्टर करा नाहीतर राष्ट्रीय समाज पक्षाचे मिनिस्टर करा : महादेव जानकर
गजी ढोल वाजवून महादेव जानकर यांनी यात्रेची शान वाढवली. |
दहिवडी: यशवंत नायक ब्यूरो
तुमच्या मुला-मुलींना कलेक्टर करा नाहीतर राष्ट्रीय समाज पक्षाचे मिनिस्टर करा, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र यांनी आबाबा देवस्थान यात्रेच्या प्रसंगी केले. यावेळी वडगावचे सरपंच अजित जाधव, रासपचे ज्येष्ट नेते बबन दादा विरकर, जिल्हा उपाध्यक्ष इंजी. दादासाहेब दोरगे, चंद्रकांत दडस, शरद दडस उपस्थित होते.
महादेव जानकर ग्रामस्थांशी बोलताना म्हणाले, ज्या गावची शाळा चांगली असते, त्या गावची प्रगती चांगले असते. ज्या गावचा शिक्षक चांगला त्या गावचे वैभव चांगले असते. दडसाची लेक राष्ट्रीय समाज पक्षामुळे माण तालुक्याची पहिली सभापती झाली. दोरगेची लेक मार्केट कमिटीवर राष्ट्रीय समाज पक्षामुळे उपसभापती झाली. कारण आज जिस समाज का दल है ! उस समज का बल है !! ज्यांचे दल नाही ते बेदखल आहेत. या गावचा सरपंच रामोशी समाजाचा आहे, याचा मला अभिमान आहे. उमाजीराजे नाईक यांची पहिली जयंती, महात्मा फुले यांची पहिली जयंती साजरी केली. महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या हातात तलवारधारी प्रतिमा व पहिली जयंती मीच केली. दडसवाडा येथे आज मी नवीन आलेलो नाही. चारपाच वेळा इथे मुक्काम केला आहे, असे श्री. जानकर यांनी सांगितले.
पुढे श्री. जानकर म्हणाले, ज्यांनी आता गजी घाई लावली ते दडसमामा २१ वर्षाचे असताना यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान होते तेव्हा पांगरीतले दडस गजी खेळण्यासाठी दिल्लीला गेले, पण मामा मी तुम्हाला दिल्लीला बोलविन, घाई लावण्यासाठी नाही तर नेता म्हणून बोलविन. रामोशी समाजाचा पोरग मंत्री झालं पाहिजे. धनगराचा पोरगा पंतप्रधान झाला पाहिजे. माळी, वंजारी समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. यात काही चुकीचे नाही. या देशाची व्यवस्था बदलण्यासाठी ४० वर्ष फिरतोय. तुम्ही माझ्यावर प्रेम केले. दहा दहा रुपये दिले. तुम्ही मते दिलीत. तुमच्यामुळेच दिल्लीकडे चाललोय. चार राज्यात पक्षाला मान्यता मिळत आहे. आता दोन आमदार आहेत; पुढच्या वेळेस २५ आमदार असतील. स्वता:ची झोपडी असेल, दुसऱ्याचा महाल नाही. तुमचीच मदत घेऊन पक्ष पुढे जात आहे. महादेव जानकरने स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. स्वाभिमान विकलेला नाही. एकट्या समाजाचा नेता मला बनायचे नाही. सर्व समाजाचा नेता बनायचाय. एकट्या जातीचा नेता बनून चालणार नाही. एकट्या जातीची संघटना चालती; पक्ष चालत नाही. सर्व समाजाला सोबत घ्यावे लागेल. आजपर्यंत महाराष्ट्रात रामोशी समाजाला कोणी विधानसभेचे तिकीट दिले नाही. राष्ट्रीय समाज पक्षाने रामोशी समाजाला पहिले विधानसभेचे तिकीट दिले. रासपच्या मंत्रिमंडळात रामोशी समाजाचाच पहिला गृहमंत्री होईल. आमची लोकसंख्या जास्त आहे, पण वाटा कुठाय? सर्वच क्षेत्रात संख्येनुसार वाटा पाहिजे. आजपर्यंत उपसभापती करत होती, सभापती नाही, त्यासाठी मला पक्ष काढावा लागला. त्यामुळे आपला पक्ष ओळखा. मला गजी घाई लावता येते, मेंढर राखता येतात आणि डाहळा देखील पाडता येतो. ऊस तोडायला येतो व ऊस नांगरायलही येतो.
श्री. जानकर म्हणाले, माझी विनंती आहे.. आपल्यातले हेवेदावे बंद करा. हिमंत असेल, तर तुमच्या मुला मुलींना कलेक्टर करा. पोरं राजकारणात टाका. आमचा समाज काय म्हणतोय, राजकारण वाईट आहे. ग्रापंचायतींलाच मारामारी करतील. जिल्हा परिषद, आमदार खासदारकी लढणार नाहीत. आता तुम्हाला आमदार खासदार व्हावे लागेल, कारण राष्ट्रीय समाज पक्ष नावाचा तिकिटाचा कारखाना काढलाय. भल्याभल्यांना लोळवणार हाय. आपल्या लोकांनी त्याची काळजी करू नका. फक्त दारू पिऊ नका, व्यसनात जाऊ नका. माझा कोणत्या नेत्यावर राग नाही. पण आमची संख्या जास्त आहे, एखादा खासदार करायला पाहिजे होता. मुख्यमंत्री करायला पाहिजे होता. माझी बहीण पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करायला पाहिजे होते राहुल गांधी व अमित शहाना ढोल वाजवता येईल का? आपण तुमच्या सोबत ढोल व गजी घाई खेळलो. लहान वयात मुलींची लग्ने करू नका, असे आवाहन करून यात्रेकरू व ग्रामस्थांना शुभेच्छ्या दिल्या.
No comments:
Post a Comment