Saturday, November 12, 2022

केंद्र व राज्यात रासपचे सरकार सत्तेत आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू : महादेव जानकर

केंद्र व राज्यात रासपचे सरकार सत्तेत आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र कार्यालयात संत कनकदास यांना ५३५ व्या जयंती निमित्त अभिवादन प्रसंगी बोलताना महादेव जानकर, सिद्धप्पा अक्कीसागर, पंडित घोळवे, मोहनकुमार एम, लल्लन पाल व अन्य मान्यवर. 

राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात संत कनकदास यांना ५३५ व्या जयंती निमित्त अभिवादन

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

केंद्र व राज्यात रासपचे सरकार सत्तेत आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य कार्यालयात संत कनकदास यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री जानकर बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर होते. राष्ट्रीय संघटक पंडित घोळवे, राष्ट्रीय खजिनदार मोहनकुमार एम, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष लल्लन पाल, जिवाजी लेंगरे, विठ्ठल यमकर, प्रकाश डांगे, सुरेश येडगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री. जानकर पुढे म्हणाले, आजचा दिवस हा भाग्याचा दिवस आहे. संत कनकदास एक महान व्यक्ती आहे. आज संत कनकदास यांची जयंती आहे, कर्नाटक राज्यात शासनातर्फे जयंती साजरी होत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात संत कनकदास जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्र व देशात राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू. संत कनकदास राष्ट्रीय संत होते.

श्री. जानकर पुढे म्हणाले, ज्या कागेनेली मध्ये संत कनकदास यांना संघर्ष करावा लागला, त्या भूमीत आज संत कनकदास यांना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले, त्याबद्दल त्यांना राष्ट्रीय समाज पक्षातर्फे धन्यवाद. त्याकाळात दक्षिण भारतात संत कनकदास हे संत तुकाराम, संत कबीर, संत ज्ञानेश्वर यांच्यासारखे महान होते. केवळ हिंदूसाठी नव्हे तर संत कनकदास यांचे कार्य तमाम मानव जातीसाठी होते. 

सत्यशोधक, दंडनायक संत कनकदास यांच्या जीवनावर श्री. अक्कीसागर साहेब यांनी पुस्तक लिहले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते अभ्यासावे. संत कनकदास यांची जयंती महाराष्ट्र, उत्तर प्रदेश राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे साजरी होत आहे. कर्नाटकात सर्वच राजकीय पक्ष तर्फे जयंती साजरी होत आहे.

श्री. एस एल अक्कीसागर म्हणाले, संगोळी रायन्ना, संत कंनकदास यांचे कार्य मर्यादित क्षेत्रात दडपले होते, मात्र त्यांचे कार्य देशपातळीवर घेऊन जाण्याचं कार्य महादेव जानकर यांनी सातत्याने केले आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...