आयटी नंतर फार्मा क्षेत्र देशाला परकीय चलन मिळवून देणारे क्षेत्र : डॉ. ए. व्ही. यादव
कुकुडवाड : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे, आयटी नंतर फार्मा क्षेत्र देशाला परकीय चलन मिळवून देणारे क्षेत्र असल्याचे मत डॉ. ए. व्ही. यादव यांनी व्यक्त केले. दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, म्हसवड येथे डॉ. ए. व्ही. यादव यांनी सदिच्छा भेट दिली व 'बी. फार्मसी'च्या विद्यार्थ्यांना "करिअर अपॉरचुनिटिज अफ्टर बी. फार्मसी" या विषयावर मार्गदर्शन केले.
श्री. यादव पुढे म्हणाले, फार्मसी हे यंग फिल्ड असून सर्वात फास्ट वाढत आहे. महाविद्यालयीन शिक्षणापासून ते आजपर्यंत फार्मा क्षेत्रात झालेले बदल विद्यार्थ्यांशी शेअर केले. तसेच फार्मा अपेक्स बॉडीकडून आजपर्यंत गव्हरमेंट क्षेत्रात आपलं हवं तेवढं वजन वाढवता आल नाही, याची खंत व्यक्त केली. खरंतर फार्मा क्षेत्र देशात आयटी क्षेत्रानंतर सगळ्यात जास्त परकीय चलन भारताला मिळवून देतय पण डॉक्टर, नर्स, टेक्नीसियन च्या तुलनेत फार्मासिस्टच महत्व तेवढं वाढलं नाही. तसेच कोरोना नंतर थोडाफार बदल निश्चित झाला असला, तरी विकसित राष्ट्रांच्या तुलनेत आपला फार्मासिस्ट पेशंट काऊनसेलिंग मध्ये खूप कमी पडत असल्याचेही सांगितले. विकसित राष्ट्रात डॉक्टरांकडून दिलेल प्रिसक्रीपशन अगोदर फार्मासिस्टकडे जात, त्यावर पेशंटला सर्व माहिती दिली जाते व नंतर औषध चेक करून दिली जात. आपल्या देशात फक्त हिंदू फार्मसी, गोवा याठिकाणी पेशंट काऊनसेलिंग चांगल्या प्रमाणत केले जाते, हे प्रमाण भारतात वाढणे अपेक्षित आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी झाल्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर, क्लिनिकल रिसर्च, प्रोडक्शन, सरकारी संधी याबद्दल मार्गदर्शन केले. अतिशय ग्रामीण भागात महाविद्यालय सुरू केल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले व सिद्धनाथाच्या नगरीत मुलांना फार्मसी शिक्षणाची दारे खुली केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. भास्कर बनगर, रिसर्च डायरेक्टर डॉ. सुहित गिल्डा, प्रा. एन. व्ही. पिंपोडकर, आयक्यूएसी हेड प्रा. नामदेव शिंदे व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. महेश माने, सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद माने, उपाध्यक्ष श्री. बाळकृष्ण लेंगरे, संस्थापक सचिव प्रा. दादासाहेब कोडलकर, सहसचिव डॉ. वैभव माने व खजिनदार श्री. योगिराज लेंगरे यांनी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment