Thursday, November 10, 2022

जामनगर ग्रामीण विधानसभा मतदार संघात रासपचे उमेदवार नागराजभाई जापडा

जामनगर ग्रामीण विधानसभा मतदार संघात रासपचे उमेदवार नागराजभाई जापडा

वडोदरा : यशवंत नायक ब्यूरो

सार्वत्रिक गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जामनगर ग्रामीण विधानसभा मतदार क्षेत्रात नागराजभाई जापडा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. राष्ट्रीय समाज पक्षात येण्यापूर्वी नागराजभाई जापडा हे भारतीय जनता पार्टीचे जामनगर जिल्हा पदाधिकारी होते.  काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडून स्वतःच्या गावात राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा उघडून पक्षात प्रवेश केला. जापडा यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी गुजरात राज्य समन्वयक जतीन शेठ यांनी प्रयत्न केले. श्री जापडा यांनी त्यांचे सरपंच असलेले भाऊ लखनभाई जापडा यांच्यासह यशवंत नायक ब्यूरोशी वडोदरा येथे खास भेट घेऊन चर्चा केली. नागराजभाई जापडा यशवंत नायक ब्यूरोशी संपर्कात आहेत.  राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे असली नेतृत्व असून, या देशात नकली नेतृत्वाचा ऊत आला आहे, अशा नकली नेतृत्वापासून सावध राहिले पाहिजे, असे मत यशवंत नायक ब्यूरोशी बोलताना व्यक्त केले




No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...