Friday, December 2, 2022

भाजप काँग्रेसची सिस्टम एकच; त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल : महादेव जानकर

भाजप काँग्रेसची सिस्टम एकच; त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल : महादेव जानकर

सुरत : यशवंत नायक ब्यूरो 

काँग्रेस व भाजप दोन्ही पार्टी एकच सिस्टीम राबवत आहे, मात्र त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र यांनी सुरत येथे बोलताना केले आहे. चौर्यासी विधानसभा मतदार क्षेत्रातील उमेदवार मोतीभाई रबारी यांच्या प्रचारार्थ स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलताना वरील विधान केले आहे. दरम्यान श्री. महादेव जानकर यांनी लिंबायत विधानसभा व चौर्यासी विधानसभा मतदार क्षेत्रात 'रोड शो'द्वारे जनतेशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना श्री. जानकर पुढे म्हणाले, बेरोजगार आरोग्य व शिक्षण यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष काम करेल. अमेरिकेतील लोकांना नोबेल पारितोषिक जास्त मिळत आहेत, भारताला मात्र नोबेल मिळत नाहीत, त्यामुळे शिक्षणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. कोणताही आजार असू द्या, वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत दिली पाहिजे. आरोग्य, शिक्षण मोफत दिले आणि बेरोजगारीवर मात केली तर देश महासत्ताक बनेल.

निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन होईल, असे गुजरात मधील लोकांना वाटते.  कधी भाजप, कधी काँग्रेस ला सत्ता दिलीत, रासप, आपला ही संधी मिळाली पाहिजे. छोट्या पक्षांना देखील सत्ता मिळाली पाहिजे. मोठे पक्ष जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय करतात.  रासप गरीब लोकांसाठी काम करणारी पार्टी आहे. ज्यांना कोण तिकीट देत नाही, त्यांना राष्ट्रीय समाज पक्ष मुख्य राजकीय प्रवाहात आणत आहे. काँग्रेस व भाजप दोन्ही पार्टी एकच सिस्टीम राबवत आहेत, मात्र त्यांची सिस्टीम संपवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे.  सुरत वासियांना आवाहन करेन की, भाजपला सत्ता दिलीत, एकवेळ रासपला सत्ता द्या. गुजरातची भूमि ही दुधाची भूमी आहे. भाजपपेक्षा चांगले काम करू असा विश्वास श्री. जानकर यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, गुजरात प्रभारी सुशील शर्मा, गुजरात युवा अध्यक्ष महेंद्र राठोड,  सुरत जिल्हाध्यक्ष प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.


कापरडा, पारडी, वलसाड, लिंबायत, चोर्यासी, दभोई, वडोदरा शहर, अकोटा, रावपुरा, मांजलपूर आदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना गुजरातवासिय जनतेने विजयी करण्याचे आवाहन श्री. जानकर यांनी केले.



No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...