Thursday, December 15, 2022

रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर

रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर

चिंचणी मायाक्का दर्शन करून रामदूर्ग तालुक्यात महादेव जानकर यांचा मुक्काम

बेळगाव : यशवंत नायक ब्यूरो

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. श्री. जानकर यांनी काल (दि.१४) रायबाग तालुक्यातील कुलस्वामिनी आई चिंचणी मायाक्का देवीचे दर्शन घेतले. रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल अक्कीसागर यांच्या मातोश्रींची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी श्री. जानकर रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी(एम) या गावी पोहचले. तसेच त्यांनी चंदरगी या गावी मुक्कामही केला, असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

श्री. अक्कीसागर यांच्या मातोश्री गंगुबाई लक्ष्मण अक्कीसागर या फार दिवसापासून वृद्धापकाळाने आजारी आहेत. एस एल अक्कीसागर यांचे राष्ट्रीय समाज पक्ष संघटन बांधणी व पक्ष नावारूपाला आणण्यात खूप मोठे योगदान राहिले आहे. श्री. 

अक्कीसागर साहेब यांच्या मातोश्रींची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी श्री. जानकर कर्नाटक दौऱ्यावर आलेले आहेत. ते आज चंदरगीहून बेळगावमध्ये उपस्थित राहतील व महत्वाच्या गाठीभेटी घेऊन, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचे समाधी'स्थळाचे दर्शन घेन्यासाठी नदंगड ता - खानापूरच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दौऱ्यात ते कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांशी ते भेट घेणार आहेत. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या कर्नाटक राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक राज्यात रासपचे संघटन वाढविण्याचे दृष्टीने श्री. जानकर सध्या प्रयत्नशील आहेत, कारण त्यांचा अलीकडच्या काळात दक्षिण भारतातील लोकांसारखा पेहराव समाज माध्यमात झळकत आहे. कर्नाटक राज्य हे श्री. जानकर यांच्यादृष्टीने आवडते राज्य असल्याचे बोलले जाते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...