Thursday, December 29, 2022

‌ "समाज रत्न‌" : अक्कीसागर साहेब

 ‌"समाज रत्न‌" : अक्कीसागर साहेब 


जिवन जगत असताना अनेक सहवास मिळतं असतात, असाच एक सहवास जिवनात आला. ज्यांची मातृभूमी कर्नाटक, जन्मभुमी मध्यप्रदेश, कर्मभूमी महाराष्ट्र लाभली असून, आपलं समाज रूण परत फेड करण्यासाठी देशपातळीवर काम करण्याचा योग आला आणि सर्व राज्यांत कार्यकर्त्यांचा जथ्था निर्माण केलेले, फुले विचार धारेवर चालणारे, संघर्षमय जीवनातून वंचित, उपेक्षिताच्या न्याय हक्कासाठी पर्याय निर्माण करणारे,मनमिळाऊबुध्दिवान व्यक्तीमत्व असलेले असे ते स्नेही मित्र सिदप्पा अक्कीसागर होय.

जिवनात असेही योगायोग येतात ते इतिहास घडवून जातात, मी नौकरी करीत असताना मला मान्यवर कांशीरामजीच्या बहुजन चळवळीचा संबंध आला. त्या निमित्ताने मी त्यांच्या बहुजन डे कार्यक्रमासाठी १५ मार्च १९९४ला मुंबई येथे गेलो होतो. तेथे यशवंत सेनेचे सरसेनापती महादेवजी जानकर साहेब यांचा संबंध आला. त्यामुळे पुढे याच चळवळीत काम करणारे सिध्दपा अक्कीसागर यांचा जवळून संबंध आला आणि एकत्रच काम करण्याचा योग आला.

सिदप्पा अक्कीसागर यांचे वडिल लक्ष्मणराव याचं मुळ गाव चंदरगी तालुका रामदुर्ग,जिल्हा बेळगाव असुन त्यांची फौजी खात्यांत नौकरी असल्यामुळे मध्यप्रदेशात जबलपुर येथे राहाण्याचा योगायोग आला होता. येथेच सिदप्पा अक्कीसागर यांचा जन्म झाला. पुढे लक्ष्मणराव अक्कीसागर यांची महाराष्ट्रात पुणे येथे बदली झाली. त्यामुळे सिदप्पाचे शिक्षण पुणे येथेच झाले. सिदप्पाचे पदवी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मुंबई येथे रिझर्वबॅकेंत नौकरीला लागले.पुढे त्यांना कांशीरामजीच्या बहुजन चळवळीचा सहवास लाभला आणि बहुजन चळवळीमुळे समाज रूण परत फेड करण्याची जाणीव झाली, त्यामुळे त्यांना समाज कार्य करण्याची ओढ लागली आणि समाज कार्याला सुरुवात केले. त्यानी जेथे नौकरी करत होते त्या रिझर्व्ह बँकेत अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती साठी स्वंतत्र कार्यालय देण्यात आले होते, परंतू इतर मागासवर्गीयांसाठी कार्यालय नव्ह्ते. हि सामाजिक जाणीव सिदप्पा यांना झाल्यामुळे त्यांनी बॅकेतील इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची एक बैठक घेवून ओबीसी कर्मचारी महासंघाची निर्मिती केली आणि स्वतः संस्थापक अध्यक्ष बनले व अधिकार्याशी संघर्ष करून बॅकेच्याच ईमारतीत इतर मागासवर्गीय कर्मचारी संघटनेला कार्यालय मिळवून घेतले. येथूनच सिदप्पा हे देश पातळीवर सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यांनी देश पातळीवर संघटनेचे जाळे पसरविले. ओबीसींवर होणार्या अन्याया विरूध्द न्यायाचा संघर्ष सुरू झाला यातूनच एक अभ्यासक बनले.

 या चळवळीमुळे सिदप्पाना इतिहास वाचण्याचा, इतिहास घडविण्याच्या मुलं मंत्र ‌मिळाला.

त्यांना वाटू लागले आपली संस्कृती हि पशुपालक संस्कृती‌ असुन आपण इतिहासातील नाग संस्कृती, द्रविड संस्कृती, मौर्य संस्कृती चे वारसदार आहोत म्हणजेच आपण समता संस्कृतीचे आहोत. समता संस्कृतीत बंधूभाव असुन समाज शांती सुखाने नांदत असतो. जर या लोकशाहित विषमता नष्ट करून समता संस्कृंती आणायची असेल तर सत्ता असणे आवश्यक आहे. जर सत्ता पाहिजे असेल तर पक्ष आणि नेता लागतो म्हणून ते नेता धुंडत होते. सन १९९४ ला जानेवारी महिन्यात म्हणजेच सावित्रीबाई फुले यांच्या ज्ञानदान महिन्यात यशवंत सेनेचे सरसेनापती त्यागमुर्ती महादेवजी जानकर साहेबांचा संबंध आला आणि त्यांना पाहिजे तो नेता मिळाला. 

ज्या बॅकेतून शिवसेना निर्माण झाली त्या बॅंकेतूनच यशवंत सेना वाढण्यास प्रोत्साहन मिळत गेले.त्यांनी नेते महादेवजी जानकर साहेबांना संघटना वाढीसाठी लागणारे प्रचार माध्यम म्हणून मासिक काढण्याची संकल्पना दिली.समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून यशवंत सेनेच्या माध्यमातून " विश्वाचा यशवंत नायक " नावाचे मासिक सुरू केले व कार्यकारी संपादक म्हणून अंक काढण्याची जबाबदारी स्वतः घेतली.

या माध्यमातून नौकरी करत असताना कर्मचार्यांचे प्रश्न सोडवित असतं त्याचं बरोबर संघटना चालवण्यासाठी " विश्वाचा यशवंत नायक " मासिक चालवून यशवंतसेनचे कार्य सुरू केलें. 

आता सम्राट अशोकाचे स्वप्न पूर्ण करणारा नेता आपणाला मिळाला, त्यासाठीं सत्ता लागते, सत्तेत जाण्यासाठी पक्ष लागतो म्हणून ३१मे २००३ ला महाराणी अहिल्याबाई च्या जन्मभुमित यशवंत सेनेचे रूपांतर पक्षात करण्यास बौध्दिक सहकार्य केले. राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांनी सहकार्यांना सोबत घेवून " राष्ट्रिय समाज पक्षाची " स्थापना केली .

 त्यावेळी सिदप्पानी प्रत्यक्ष नौकरी करीत " विश्वाचा यशवंत नायक" मासिकातून सामाजिक कार्य सुरू ठेवले आणि सन १९९७ ला सेवा निवृत्त झाले. सेवानिवृत झाल्यानंतर राष्ट्रिय समाज पक्षाच्या कार्यात सक्रिय झाले. त्यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री होते त्यामुळे पक्ष बांधणिस वेळ अपुरा पडत होता म्हणून जानकर साहेबांनी पक्षाची धुरा विश्वासु कार्यकर्ता सिदप्पा अक्कीसागर यांच्यावर सोपविण्याचे ठरविले आणि राष्ट्रिय अध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती केली.  

पक्षाची जबाबदारी घेतल्यानंतर सिदप्पा अक्कीसागर यांनी पक्षाचे जाळे चार राज्यातून अठरा राज्यांत नेण्याचे काम केलें. पुढे राष्ट्रिय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देवून, राष्ट्रिय अध्यक्ष पद राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांकडे सोपविले. यावर न थांबता सिदप्पा अक्कीसागर यांनी कर्मचारी, बुद्धिजीवी वर्ग बांधण्यासाठी राष्ट्रिय समाज कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पद स्विकारून कामाला लागले आहेत. त्यांचा एकच ध्यास असतो राष्ट्राला पोशणारा, राष्ट्रांवर प्रेम करणारा हाच खरा राष्ट्रिय समाज असून या लोकशाहीत राष्ट्रिय समाजातील वंचीत, उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे, त्या साठीच प्रत्येक बुद्धिजीवी वर्गानी समाज रूण परत फेड केलं पाहिजे तरच खरा‌ राष्ट्रिय समाज निर्माण होईल आणि समतेची राज्य येवून राष्ट्र बलवान बनेल. 

हे काम आपण सर्वांनी पुढे नेण्यास तन,मन,धनाने सहकार्य करणे हेच सिदप्पा अक्कीसागर यांना खर्या अर्थाने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठरतील,आणि असे समाज रत्न समाजात निर्माण होतील. त्याचसाठी आमचे मार्गदर्शक मा.सिदप्पा लक्ष्मण अक्कीसागर साहेबाना दिर्घायुष्य लाभो‌ . हिच प्रार्थना.


--- गोविंदराम शूरनर

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...