Wednesday, December 21, 2022

गुरुजींची एक्झीट वेदनादायी; समाजातील लोक हळहळले..!

गुरुजींची एक्झीट वेदनादायी; समाजातील लोक हळहळले..!

ज्यांनी मला लिहायला वाचायला शिकवले, शाळेच्या दप्तरी नाव आणि जन्म तारीख देऊन शाळेचा प्रवेश घडवून दिला, तसेच स्वतःच्या दुचाकीवरून घर ते शाळा असा रोजचा प्रवास करून ज्यांनी मला लहान वयात शाळेची गोडी निर्माण केली, असे माझे आवडते आणि प्रथम गुरुवर्य श्री. बाबा गुरुजी यांना एका बदमाश माणसामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले. त्यांचे मुळगाव खरात वस्ती, गटेवाडी पो - पिंपरी ता- माण जि- सातारा. गटेवाडी सारख्या छोट्याश्या गावात पहिले शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जायचे. गावकऱ्यांशी ते फार आदराने राहायचे. सगळ्याशी मिळून मिसळून राहायचे, त्यामुळे त्यांच्या बद्दल गावकऱ्यांना आपुलकी वाटायची. गुरुजी यांच्यावर वेदनादायी प्रसंग ओढवला हे ऐकून कुकुडवाड, नरवणे, वडजल, नरबटवाडी, ढाकणी, कारंडेवाडी, पुकळेवाडी, दोरगेवाडी आदी परिसरात शोककळा पसरून संपूर्ण समाजमन हेलावले. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

खरात गुरुजी यांचे मित्र व स्नेही प्रा. आनंद पुकळे सर यांनी बाबा गुरुजी यांच्याबद्दल आठवणी सांगताना ते म्हणाले, खरात गुरुजी हे अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून त्याकाळात ओळखले जायचे. त्यांच्या घरची परस्थिती ही अत्यंत गरिबीची होती. गटेवाडी ते कुकुडवाड हे अंतर अनवाणी पायांनी चालत येऊन त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांची लहानपणी खूप आबळ झाली. त्यांचे हस्ताक्षर हे अत्यंत सुरेख आणि सुंदर होते. गणित विषयात ते तरबेज होते. त्यांचा स्वभाव हा मनमिळावू होता, त्यांची Exit इतक्या कमी कालावधीत झाली, या वृत्ताने प्रा. पुकळे सर हे शोकमग्न झाले. मानवता प्रिय गुरुजी अकाली गेले, त्यांच्या कुटुंब परिवारास, आम्हा विद्यार्थ्यांस तीव्र दुःख झाले. गुरुजी यांच्या स्मृतीस विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली..!💐

शोकाकुल - आबासो सुखदेव पुकळे. 

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...