विलिंग्डन महाविद्यालयात गणित विभागातर्फे शिक्षक दिन साजरा
भारतात गुरू-शिष्य पंरपरेला मोठे स्थान-प्रा.डाॅ.यु एच नाईक सर
विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षणाचा उपयोग करून आयुष्याची जडणघडण करावी- प्रा.डाॅ.एम एस बापट
सांगली (आबासो पुकळे) :
विलिंग्डन महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमीत्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. गणित विभागातर्फे वेलणकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काळाबरोबर काही परंपरा आपण विसरत चाललो, तरी चांगल्या गोष्टी स्विकारल्या पाहिजेत. डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक चांगले शिक्षक होते. शिक्षण, संगीत, क्रीडा अन्य क्षेत्रात गुरू-शिष्यांची परंपरा आढळते. भारतात गुरू-शिष्य परंपरेला मोठे स्थान असल्याचे प्रतिपादन प्रा.डाॅ.यु.एच.नाईक सर यांनी केले. श्रध्दा व श्राध्य यावर भाष्य करत ते पुढे म्हणाले, की शिक्षक व विद्यार्थी यांचेमध्ये श्रध्दा एकमेकांस पूरक असली पाहिजे तरच गुरू-शिष्य परंपरा बळकट होईल.
प्रा.डाॅ.एम.एस बापट सर रामानुजन पीठावरून विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले, महाविद्यालयात गणित विभाग हा संख्येने मोठा समजला जातो. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी चांगली आठवण काढतात त्याप्रमाणे विद्यार्थांनी महाविद्यालयातील सेवांचा उपयोग करावा. शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन चांगले यश संपादन करून पुढे जावे. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभागी व्हावे. दोन वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षणाचा उपयोग करून आयुष्याची जडण घडण करावी.
माजी विद्यार्थी महेश बंडगर हे सेट परिक्षा उत्तीर्ण झालेबद्दल महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती महेश बंडगर यांनी सेट परिक्षा विषयी माहीती सांगून स्वतःचा अभ्यासातील अनुभव विद्यार्थ्यासमोर कथन केला.
कार्यक्रमस्थळी रामानुजन पीठावर महाविद्यालयाचे गणित विभागप्रमुख प्रा.डाॅ.यु.एच.नाईक सर, प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. महेश बंडगर सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाॅ. एम.एस. बापट सर, प्रा.डाॅ. जी.डी. शेळके सर, प्रा. एस. दिक्षित सर, प्रा. एम.कोरे सर, प्रा.जाधव मॅडम, प्रा. विभुते मॅडम स्थानापन्न होते. तसेच बीएस्सी(गणित), एम एससी भाग 1 व 2 चे विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी अनेक विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. शुभम हुजरे यांनी शिक्षक दिनानिमीत्त प्राजेक्टरवर ध्वनीचित्रफित दाखवली. सुत्रसंचालन एम.एस्सी भाग-2 विद्यार्थीनी कुमारी प्रियांका गुजर व आभार प्रदर्शन कुमार.योगेश कोकरे यांनी केले.
-६ सप्टेबर २०१७
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी
स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...

-
राष्ट्रीय समाज पक्षाचा ऐतिहासिक टप्पा!, दिल्ली केंद्रीय कार्यालयाचा शुभारंभ दिल्ली (३०/५/२०२५) : येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या केंद्रीय कार...
-
राष्ट्रीय समाज की आन-बान और शान मान्यवर दीनाभाना वाल्मीकि जी के जयंती पर कोटि-कोटि नमन। विडम्बना है कि मान्यवर कांशी राम जी के योगदान का गुण...
-
ॲड.अशोक सुरेश पुकळे यांचा सत्कार ॲड.अशोक सुरेश पुकळे रा. म्हसवड जिल्हा - सातारा यांनी B.sc LLB ही कायदा पदवी (एलएलबी) उत्तीर्ण झाल्याबदल त्...
No comments:
Post a Comment