विलिंग्डन महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा
------------------------------ -------
भारतीय गणितज्ञांचे गणितातील योगदान महत्वाचे : प्रा.डाॅ. यु एच नाईक
------------------------------ -----
सांगली /आबासो पुकळे दि.22 डिसेंबर :
थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमीत्त विलिंग्डन महाविद्यालयात गणित विभागातर्फे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला.
गणित विभागाचे अधिविभागप्रमुख प्रा. डाॅ. यु एच नाईक सर यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करण्यात आला.
''भारतातील गणितज्ञांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना होणे अपेक्षित आहे. गणितासाठी भारतीयांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे" असे मत गणित विभागाचे अधिविभागप्रमुख प्रा.डाॅ. यु एच नाईक सर यांनी विद्यार्थ्याशी बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, एव्हरीस्ट गॅल्व्हा सारखा गणिती मरण्यापूर्वी 60 पाने लिहून गणिताला खूप काही देऊन गेला. रामानुजन यांना भारतीय गणिती म्हणून जगभर ओळखले जाते. रामानुजन यांच प्रतिभावंत गणित पाहून प्रा. हार्डी सारखा गणितीही भारावला.
यावेळी प्रा.डाॅ.जी डी शेळके सर, प्रा.एस एम दिक्षीत,प्रा. एम एम कोरे, प्रा.सौ. एस ए विभुते,प्रा.ए व्ही सूर्यवंशी, प्रा.एस एम जाधव, राजेश सूर्यवंशी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात लेखक राॅबर्ट कॅनिगेल यांच्या 'द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी : अ लाइफ ऑफ जिनियस रामानुजन' या पुस्तकांवर आधारीत 'द मॅन व्हू न्यू इन्फिनिटी' हा चित्रपट दाखवण्यात आला. याप्रसंगी गणित विभाग बी.एस्सी,भाग-3, एम.एस्सी भाग-1 व 2 चे विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment