आरती सिद्धनाथा : जय जय आरती सिद्धनाथा : धृ:
तुच करता । तुच करविता ।। विश्व चालक स्वतः । जय जय आरती सिद्धनाथा ।।१।।
नेती नेती । म्हणती श्रोती। आठरा पुराणे शोधून पहाती ।।वेद शिनले गाता। जय जय आरती सिद्धनाथा ।।२।।
अंनन्ये भावे येतीजे शरण। चुकवी त्यांचे जन्म मरण। लावीशी मोक्ष पंता ।जय जय आरती सिद्धनाथा ।।३।।
त्रिसुळ डमरू । जटेत गंगा। सगून निर्गुण । द्वादश लिंगा। ठेविला पदी माथा ।जय जय आरती सिद्धनाथा ।।४।।
काळ्या असुराशी । वधुनि त्यासी। जनता पीड़क। सुवर्ण असुराशी। धाड़िले यम पंता । जय जय आरती सिद्धनाथा ।।५।।
पंचप्राणाची करुनी आरती । सगुन निर्गून । लाऊनी जोती। ओवळीतो नाथा । जय जय आरती सिद्धनाथा ।।६।।
पुकळेवाडीत सिद्धनाथगड़ । तिथे राहण्याची झाली आवड़। मंदीर डोंगर माथा। जय जय आरती सिद्धनाथा ।।७।।
(समाप्त).
No comments:
Post a Comment