Sunday, May 3, 2020
'विलिंग्डन' महाविद्यालयात गणित विभाग क्रमांक 1 चा विभाग- प्राचार्य. बी व्ही ताम्हणकर
'विलिंग्डन' महाविद्यालयात गणित विभाग क्रमांक 1 चा विभाग- प्राचार्य. बी व्ही ताम्हणकर
--------------------------------------------
सांगली/आबासो पुकळे (28 जुलै 2017): पदव्युत्तर पदवीसाठी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 'विलिंग्डन' महाविद्यालयात एम एस्सी गणित भाग-1 साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ वेलणकर सभागृहात आयोजीत केला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.बी व्ही ताम्हणकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागता प्रसंगी बोलताना सांगितले की, शिवाजी विदयापीठातील 'विलिंग्डन' एक चांगले महाविद्यालय आहे. महाविद्यालयात गणित विभाग क्रमांक 1 चा विभाग ओळखला जातो. ते पुढे म्हणाले, आजपर्यंत या महाविद्यालयात खूप विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले आहेत. करिअरच्या खूप संधी असताना विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षणासाठी महाविद्यालयात PG ला प्रवेश घेतला. यावर्षापासून गणित विभाग मुख्य इमारतीतून हलवून स्वतंत्रपणे संगणक लॅब, वर्ग,स्टाफ रूम देत आहोत. काही दिवसांतच गणित विभागाचा चेहरामोहरा बदलेल. पुढचे वर्ष महाविद्यालय शतकोत्सव साजरा करणार आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सर्व कृतीकार्यक्रमात सहभागी व्हावे.
पुस्तकी ज्ञान म्हणजे पदवी नव्हे : प्रा.डाॅ.यू एच नाईक
------------------------------------------
विद्यार्थ्यांनी काॅलेज जीवनात शैक्षणिक गोष्टी बरोबरच सांस्कृतिक दृष्ट्या अन्य कार्यक्रमात सहभागी होऊन नवनवीन गोष्टी शिकाव्यात. "काॅलेजमधून पुस्तकी ज्ञान घेऊन जाणे हा एकच विषय असू नये. पुस्तकी ज्ञान म्हणजे पदवी असा अर्थ होत नाही" असे प्रतिपादन गणित विभागाचे अधिविभागप्रमुख प्रा. डाॅ. यु एच नाईक यांनी केले.
एम एस्सी भाग-2 च्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात अभिमानाने सांगण्यासारखे नवीन काहीतरी करावे. एम.एस्सी चे विद्यार्थी काॅलेजमध्ये सर्वात वरिष्ठ आहेत, वरिष्ठतेचा फायदा बी एस्सी भाग-1,2,3 च्या विद्यार्थ्यांना करून द्यावा. गणितातील काही अडचणी सोडवून दिल्या पाहिजेत ; असे केल्यास स्वतःचे गणित सुधारते. गणित हा उपकाराचा विषय नाही याची जाणिवही श्री नाईक सर यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. कुठल्याही वर्गातील गणित सोपे असते असे कधी होत नाही. गणित हे गणितच असते.
विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये शिक्षकांसोबत बोलते व्हावे, एम एस्सी म्हणजे काय? कोणते विषय शिकायचे असतात? एम एस्सी पूर्ण कशी करावी, काय करायला पाहीजे अशा सर्व अनुषंगाने प्रा.एस एम दिक्षित सर यांनी त्यांच्या अनुभावातून एक गणितावरील सुदंर अशी कविता व्यासपीठावरून सादर केली तर नवनिर्वाचित प्रा.एम एम कोरे सर यांनी तालासुरात एक 'गवळण' सादर केली.
कार्यक्रमासाठी प्रा.डाॅ.एम एस बापट, प्रा.डाॅ.जी डी शेळके, एम एस्सी भाग-1 व भाग 2 चे विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत समारंभाचे प्रास्ताविक करताना शुभम हुजरे यांनी महाविद्यालयाची ओळख सांगितली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहीत कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन ओंकार पाटिल यांनी मांडले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
पीडित मुलीच्या न्यायासाठी महादेव जानकर प्रयागराज उत्तरप्रदेश येथे रस्त्यावर! पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या महादेव जानकर यांना प...
-
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदनशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदन फलटण जिल्हा सातारा येथे तहसीलदार यांना ...
-
छ. शाहू राजा शतकातील सर्वश्रेष्ट राजा आहे ! *कारण;* *स्वत:च्या संस्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात' (ब्रिटीश - ग...
No comments:
Post a Comment