Monday, May 18, 2020

विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी गोपीचंद पडळकर पोहचले धनगर वेषभुषेत

विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी  गोपीचंद पडळकर पोहचले धनगर वेषभुषेत

@Abaso Pukale


सांगली जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते गोपिचंद पडळकर हे आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी धनगर समाजाच्या पारंपरिक वेशभूशेत  पोहचले आहेत. १.५० कोटी लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या युवा नेतृत्वाची गरज  होती. गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या वरिष्ठ कायदा सभागृहात आगामी काळात धनगर समाजासह उपेक्षित समाजाचे प्रश्न ऐरणीवर येतील.



महाराष्ट्र विधान परिषद सभागृह सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी डोइवर पिवळा फेटा बांधून, हातात काठी, खांद्यावर घोंगड़ी टाकून गोपीचंद पडळकर मुंबईला पोहचले आहेत.  शपथ घेण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
विधान परिषद सभागृह सदस्यत्वाची शपथ घेताना  गोपीचंद पडळकर

धनगर समाजाच्या प्रश्नांचे घोंगडे खांद्यावर घेऊन गोपीचंद पडळकर सभागृहात निघाले आहेत. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन  व पुढील कार्यास शुभेच्छ्या.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...