Sunday, July 30, 2023

जन विरोधी सरकारने 'रासप'च्या जन स्वराज यात्रेस रोखले : एस. एल अक्कीसागर यांचे टीकास्त्र

जन विरोधी सरकारने 'रासप'च्या जन स्वराज यात्रेस रोखले : एस. एल अक्कीसागर यांचे टीकास्त्र 


धारवाड/कर्नाटक : यशवंत नायक ब्यूरो

काल "देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात चर्चगेट स्टेशन येथून निघालेली राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा ही जनता विरोधी सरकारने घाबरून जन स्वराज यात्रा रोखली, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य एस एल अक्कीसागर यांनी यशवंत नायक शी बोलताना सोडले. श्री. अक्कीसागर हे कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत. धारवाड येथून ते यशवंत नायकशी बोलत होते.

श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, जनतेसाठी, जनतेद्वारा, जनतेच राज - जनतेच स्वराज या देशात आले पाहीजे, ही भुमिका घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वात भारताच्या सर्व लोकसभा मतदार क्षेत्रात जनजागृती करत जन स्वराज यात्रा काढण्याचा संकल्प केला आहे. दिनांक १० जुलै २०२३ रोजी क्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेच्या तीरावर संत नामदेव महाराज यांच्या पायरीपासून माढा लोकसभा क्षेत्रातून जन स्वराज यात्रेस सुरूवात झाली. हजारोंच्या संख्येने जन स्वराज यात्रेत लोक सामील होत आहेत. दि.२२ जुलै रोजी संत शेख महमद बाबा यांच्या दर्ग्यास अभिवादन करून अहमनगर लोकसभा क्षेत्रात पोहचली. 

राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी जन स्वराज यात्रेद्वारे रस्त्यावर उतरून थेट जनतेत मिसळत आहेत. जनतेच्या अडीअडचणी समजावून घेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने ही खोटी ठरल्याने देशभरात जनतेचा आक्रोश आहे. संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे जन स्वराज यात्रेत सहभागी होऊन जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सत्ताधारी घाबरले आहेत. रासपच्या जन स्वराज यात्रेचा धसका सत्ताधारी पक्षाने घेतला आहे. त्यातूनच देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात चर्चगेट स्टेशन येथून निघालेली जन स्वराज यात्रा जनता विरोधी सरकारने घाबरून जन स्वराज यात्रा रोखली. मिशन लोकसभा -२०२४ अंतर्गत संसद भवन दिल्ली लक्ष्य करुन महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जन स्वराज यात्रेस कोणी रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन श्री. अक्कीसागर यांनी व्यक्त केले आहे. 

दरम्यान, यशवंत नायकचे मार्गदर्शक हितचिंतक जयसिंग राजगे सर यांनी यशवंत नायकला मुंबईहून कळवले आहे की, काल मुंबई विभागात जन स्वराज यात्रा चालू असताना, राज्यशासन व प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून रोखण्याचा प्रयत्न केला तरी आज रविवार दिनांक ३० जुलै रोजी सायंकाळी राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांची यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट, मंत्रालयाच्या समोर जाहिर सभा होणार आहे. तरी जनतेचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाला ताकद देऊन जानकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे.

Sunday, July 23, 2023

यशवंत नायक – जुलै 202

 यशवंत नायक – जुलै 2023

*वाचक मित्रानो, 🙏*

*या अंकात काय वाचाल...*

पान १

_*मत बाळगणे, मत व्यक्त करणे, मताचा प्रचार - प्रसार करणे लोकशाही भारतातील जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार आहे*_

पान -२

_*मत शक्ती ही लोकशाही भारतातील सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. पवित्र कर्तव्य आहे. मत नाही तो समाज 'शक्ति'हीन आहे.*_

पान -३

_*यशवंत नायक मत व्यक्त करण्याचे एक पीठ आहे. यशवंत नायक आपला प्रतिनिधी आहे, आपली शक्ती आहे.*_


*मुख्य बातम्या – पान 1* 

@ सातारा (यशवंत नायक ब्यूरो) : *खोटी आश्वासने देऊन भुलवणाऱ्या पक्षांना थारा न देता रासपला पाठबळ द्यावे : महादेव जानकर*

> *भाजप, काँग्रेस, मोदींवर जन स्वराज यात्रेत महादेव जानकर यांचा घणाघात* 

> *मोदी ओबीसींच्या पाठीशी आहेत काय?*

@ संपादकिय: *राष्ट्रीय समाज आणि राष्ट्रीय समाजाचे प्रश्न*

> *राष्ट्रीय समाज पक्षाला साथ द्या..! जनसराज यात्रेत सामील व्हा..!!*


पान : २

@ म्हसवड : *राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात आणि देशात वाढविण्यासाठी फिरत असून, मी देखील देशाचा पंतप्रधान होणार: महादेव जानकर*

@ कर्जत : *रस्त्यावरील खड्ड्यात बसून रासपचे आंदोलन*

> *रासपच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाकडून मुरूम टाकून खड्डे बुजवत केली तात्पुरती मलमपट्टी*

@ पुणे : *युवतीचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी युवकाचे राष्ट्रीय समाज पक्षाने पालकत्व स्वीकारले*

@ नागपुर : *सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरता ओबीसींनी सत्ताधीश व्हावे : महादेव जानकर*

> *सत्यशोधक समाज स्थापनेच्या १५० व्या शतकोत्तर महोत्सव निमित्त चर्चा सत्रात महादेव जानकर, एस एल अक्कीसागर यांची उपस्थिती*

@ मुंबई, यशवंत नायक ब्यूरो : *मिशन लोकसभा - २०२४ अंतर्गत देशभरात रासपची जन स्वराज यात्रा*

> *राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय*


पान : ३ 

@ मुंबई: *स्वर्गीय हरिओम बाबू यांच्यामुळे उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष उभारला : सिद्धप्पा अक्कीसागर*

> *महाराष्ट्र रासेफ, यशवंत नायक परिवार व रासप तर्फे देशभर स्व. हरिओम बाबू यांची जयंती साजरी*

> *महादेव जानकर कार्यकर्त्याची आठवण जपणारा नेता : अक्कीसागर यांचे प्रतिपादन*

@ म्हसवड : *माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्स रिसर्च सेंटर येथे 'डी'फार्मसी, ' बी'फार्मसीचे प्रवेश सुरू*

@ पंढरपुर : यशवंत नायक ब्यूरो :

*संत नामदेव महाराजांच्या पायरीपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेस प्रारंभ*

> *आम्ही कोणावर अवलंबून नाही; आम्ही आमच्या पायावर उभे : महादेव जानकर यांचे चंद्र भागेच्या तीरावर वक्तव्य*


पान : ४

@ नाशिक: *आमचा स्वतःचा मार्ग; आमची स्वतंत्र लढण्याची तयारी महादेव जानकर*

> *शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या पक्षांनी आम्हाला जवळ केले नाही*

@ लखनऊ - यशवंत नायक ब्यूरो : *उत्तर प्रदेशात लोकसभेला राष्ट्रीय समाज पक्ष दंड थोपटणार?*

> *रासप उत्तर प्रदेश राज्य कार्यकारणी बैठकीत निर्धार*

> *लवकरच उत्तर प्रदेश राजधानीत रासपचा महामेळावा*

@ मुंबई, विधानभवन यशवंत नायक ब्यूरो: *आम्ही कोणाकडे जाणार नाही, आमचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करू : महादेव जानकर*

> *एनडीएच्या बैठकीवरून महादेव जानकर यांनी सूचक वक्तव्य करून भाजपची हवा काढली*

@ कळंबोली: *राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापनदिन ताकतीने साजरा करू : काशिनाथ शेवते*

> *कळंबोली नवी मुंबई राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात बैठक*

> *रासपचा वर्धापन दिन स्वाभिमानाचा असणार : ज्ञानेश्वर सलगर*

_*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*_

*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*

*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*

_सिद्ध - सागर

कार्यकारी संपादक






राष्ट्रीय समाज आणि राष्ट्रीय समाजाचे प्रश्न

राष्ट्रीय समाज आणि राष्ट्रीय समाजाचे प्रश्न

राष्ट्रीय समाज पक्षाला साथ द्या..!

जन स्वराज यात्रेत सामील व्हा..!!

नुकताच मान्सून सुरू झाल्यामुळे गल्ली बोळासह जिकडे पाहावे तिकडे दलदल वाढलीय तशीच राजकारणातली दलदल वाढल्याचे चित्र समोर आलेले आहे. या दलदलीत अनेकांचे चेहरे माखले तर काही नामनिराळे राहिले. देशाच्या राजकारणात अनेक उलथापालथ घडवून आणल्या जात आहेत. पोकळ आश्वासने देऊन भ्रमाने फुगलेला भाजप पक्ष देशातील विविध राज्यातील सत्तेत आला आणि सत्तेतून पायउतारही झाला. काही ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणाना हाताशी धरून ऑपरेशन लोटस केले, त्यास काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अयशस्वी प्रयत्न झाला. भाजपाची महाकाय महत्वकांक्षा हळूहळू उरली सुरली सत्ता देखील गमावणार आहे. याचे उदाहरण कर्नाटक आहे. ऐन उन्हाळ्यात कर्नाटकात निवडणुकीमुळे रान तापले होते, त्याची धग देशभरात पोहचली व पोहचवण्यात आली. ज्या पद्धतीने भाजपने देशाला आश्वासने दिली, ती आश्वासने खोटी ठरल्याने देशभरात भाजपवरील विश्वास उडाला आहे. राज्यकर्त्यांनी कितीही २४ तास विजेच्या गप्पा मारल्या तरी आजही देशात ४४% जनता अंधारात आहे. अद्याप त्यांना वीज मिळालेली नाही. शेतकऱ्यांना महाराष्ट्रात भारनियमन करून रात्रीचा वीज पुरवठा केला जात आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यात महिलांवर, दीन दुबळ्या वंचीतावर अत्याचार वाढत आहेत. गुजरातमध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना  न्यायालयाने शिक्षा दिली असताना भाजप सरकारने त्यांना सोडून दिले व त्यांचा जाहीर सत्कार केला. न्यायालयाकडे गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या महिलेस, गुजरात राज्याचे न्यायाधीश दवे संविधानाने दिलेल्या खुर्चीवरून बसून मनस्मृतीचे दाखले देत आहेत. मे महिन्यापासून ईशान्य भारतातील मणिपूर जळत आहे. दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचे व्हिडिओ समाज माध्यमात फिरल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री तोंड उघडत आहेत. गोदी मीडियामुळे अनेक वृत्तपत्र, वृत्त वाहिन्यांचे संपादक, पत्रकार राजीनामे देऊन बाहेर पडत आहेत. त्यातूनही काहीजण स्वतंत्रपणे आपले पत्रकारितेचे इमान राखून लिहत आहेत, बोलत आहेत.

उच्च शिक्षित तरूण संधीअभावी हताश झाला आहे. त्याचे पोट भरण्याइतपत त्याच्या हाताला काम नाही. शिक्षण क्षेत्राचे धिंडवडे निघतील अशी परिस्थिती आहे. पदव्युत्तर पदवीधर तरुणाई कंत्राटी नोकरी करून अल्प मानधनात आपल्या स्वप्नाचा चुराडा करून कशीबशी गुजराण करत आहे. नोकरीची हमी, भविष्य नसताना नवे शैक्षणिक धोरण लादत आहे. अभ्यासक्रमात छेडछाड केली जात आहे. इतिहासाच्या उदरात अनेक खरेखुरे देशाभिमानी क्रांतिवीर, स्वातंत्र्यवीर गडप आहेत. एक वर्षात मिळणारी पदवी दोन व्हाया चार वर्षे करून, वाढत्या वयात अधिकचे शैक्षणीक वय वाढवत आहे. 

मंदिर, काश्मीर आणि समान नागरी कायदा हे मुद्दे मतदारांच्या पोटाचे प्रश्‍न सोडवू शकत नाहीत. देशाचे अर्थकारण घरंगळत भुईसपाट होईल अशी स्थिती आहे. सर्वसामान्यजनांचे पोटापाण्याचे प्रश्‍न तीव्र होत आहेत. धार्मिक ध्रुवीकरण करून मुस्लिम-ख्रिश्‍चनांविरोधात गहजब निर्माण करून देशाने काय साध्य केले? परवा उत्तर प्रदेशातील एक गरीब शेतकरी प्रश्‍न विचारताना समाजमाध्यमांवर पाहिला. तो विचारत होता, ‘मुस्लिमांविरुद्ध ओरड करून हातात त्रिशूल घेऊन मंत्री-आमदारांची मुले धावताना, रक्तपात करताना तुम्ही कधी पाहिलीत का?’ गरीब बेरोजगार तरुणांची माथी भडकावून त्यांना रक्तपात, हिंसा करायला प्रवृत्त केले जातेय. देशातील ८० टक्के हिंदूंना २० टक्के अल्पसंख्याकांची भीती का वाटावी? आपला एवढा मोठा हिंदू धर्म, २० टक्के लोक कसे काय धोक्यात आणतील? हा प्रश्‍न या तरुणांना का विचारावासा वाटत नाही? 

भटके विमुक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावून लढले, प्रसंगी बलिदान दिले. शहीद व्हावे लागले. त्यांच्या वारसदारांना स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिश कायद्याची री ओढत गुन्हेगार  ठरवले जातेय. पशुपालकांच्या नैसर्गिक अधिकारावर गदा आणली जात आहे. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत या राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करणाऱ्या समाजकंटकास देशद्रोही न ठरवता त्याला पोलिस सरंक्षनात सभास्थळी पोहचवले जाते आणि देशाच्या ऐक्यासाठी, अस्मितेसाठी लढणाऱ्या देशप्रेमीना पोलीसबळ वापरून कायद्याचा धाक दाखवून रोखले जाते.

कित्येक दशके या देशातील राष्ट्रीय समाजातील बहुसंख्य घटक सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणीक स्वातंत्र्यासाठी झगडतोय. देशाच्या सर्वजनिक आस्थापनाचे खासगीकरण करून मूठभर उद्योगपतींचे लाड पुरवण्यासाठी कामगार वर्गाची मुस्कटदाबी राजरोसपणे सुरु आहे. कामगारांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेतले जात आहेत. अनेक समाज आपल्या भागिदारीसाठी आरक्षणासाठी रस्त्यावर येतोय, पण त्यांच्या मागण्यांकडे लक्ष विचलित करुण दुर्लक्ष केलं जात आहे. केंद्रीय नागरी सेवा मध्ये खासगी यंत्रणाद्वारे नोकरी भरती करून जिद्द चिकाटीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय केला जात आहे. लोकशाही संस्थांचे खच्चीकरण केले आहे, होत आहे. गोदी मिडियामुळे सारी प्रसारमाध्यमे प्रचार माध्यम होऊन एकसुरी बनली आहेत. राजकारणातील विरोधी पक्षांचे अस्तित्व कधीच धोक्यात आले आहे. प्रादेशिक पक्षांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागतेय. पार्टी विथ डीफ्रनसची बात करणाऱ्या भाजप सारख्या पक्षाला देशाच्या राज्याचा सत्तेपर्यंत पोहचण्यात मदत करणारा राष्ट्रीय समाज पक्ष आज प्रतिकूल परिस्थितीतही सत्तेला भिक न घालता स्वाभिमानाने चिवटपणे झुंज देण्याचा प्रयत्न करतोय त्यास तोड नाही. 

विचारांचे अधिष्ठान नसलेले राजकिय नेते पक्षांतर करत आहेत. वर्षानुवर्षे सत्तेतून वारेमाप लूटलेली साधन संपत्ती वाचवण्यासाठी भाजपच्या तंबूत डेरेदाखल होत आहेत, भाजप त्यांना पोसत सन्मानाने सरंक्षन देण्यात कोणतीही कसर ठेवत नाही. लोकशाही देशात घराणेशाही पोसणाऱ्या पक्षांना स्वतःच्या नेत्यांचे प्रश्न सोडवताना दमछाक होत आहेत. लोकशाहीतून राजकरणात निकोप राजकरण होणे आवश्यक असताना देशाच्या सर्वोच्चस्थानाकडून एकाधिकारशाही सुरू असल्याचे जाणवत आहे. काही पक्षांनी हतबल होऊन केंद्रीय तपास यंत्रणापुढे हात टेकले आहेत. असे पक्ष राष्ट्रीय समाजाचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. 

राष्ट्र भक्कम करण्यासाठी राष्ट्रीय समाजाचे जीवनमरणाचे प्रश्न सोडवावे लागतील. सर्वोतपरी राष्ट्र बळकट करण्यासाठी या देशाला एका चांगल्या राजकीय पक्षाची, नेतृत्वाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून भारतीय समाजाला पर्याय मिळाला आहे. फक्त राष्ट्रीय समाज पक्षाला आपला पक्ष समजून सत्तेत संधी देण्याची गरज आहे. देशाच्या व राज्याच्या राजकरणात विषवल्ली वाढत असताना त्यास छेद देण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे स्वत: कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता राष्ट्रीय समाजासाठी निर्भिडपणे प्रस्थापित व्यवस्थेशी भिडतायत. विषमतेच्या मैदानात जमिनीवर घट्ट पाय रोवून लढतायत. भारतासारख्या विशाल राष्ट्रात 'राष्ट्रीय समाज भक्कम असेल तर भारत राष्ट्र भक्कम होईल'. राष्ट्रीय समाज पक्षाकडे महादेव जानकर यांच्यासारखे राष्ट्रीय बाणा असणारे नेतृत्व आहे. राष्ट्रातील उच्च वर्गीयापासून मध्यम ते शेवटच्या माणसासाला सामावून घेणारी सगळ्यात भारी विचारधारा रासपकडे आहे. राष्ट्राला सर्वोच्च प्रगतीपथावर नेणारे व्हिजन राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडे निवडणुकीच्या रणमैदानात लढण्यासाठी लागणारी साधसामग्री अत्यलप आहे. असे असूनदेखील राष्ट्रीय समाज पक्ष त्यागी, स्वाभिमानी, निष्ठावान अशा मोजक्या कार्यकर्त्यांच्या बळावर 'राष्ट्र व राष्ट्रीय समाजाच्या आत्मसन्मानासाठी' मिशन लोकसभा - २०२४ अतंर्गत 'जन स्वराज यात्रे'द्वारा देशभरात आपल्या भेटीस येत आहे. तरी आम्ही यशवंत नायक परिवारातर्फे आपणास नम्र आवाहन करतो की, राष्ट्र व राष्ट्रीय समाज बलवान बनवण्यासाठी रासपच्या जन स्वराज यात्रेत सामील व्हा. राष्ट्रीय समाज पक्षाचा आवाज बुलंद करून देशाच्या सर्वोच्च सत्तेची सूत्रे जनतेने हातात घ्यावी.

|आबासो पुकळे, उपसंपादक यशवंत नायक

Friday, July 21, 2023

धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे : धनगर समाजात नाराजीचा सुर

 धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे


हे फडणवीस आहेत की फसवणवीस हे राज्यातील जनतेला काय ते ऐकदाची कळुद्या ..... 

पहिल्या कँबीनेटच्या आशेवर बसलेला धनगर समाज आणी पुन्हा पुन्हा खोडारडेपणा केल्याने  उघडे  पडलेले फसणवीस.....

साहेब तुम्ही कुणाबरोबर ही मुहुतुर बडवा आम्ही केवळ निवडणुकुची वाट पाहतो आहोत......

विधानसभेच्या निवडणुकीत मात्र प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तुम्हाला शंभर टक्के धक्के देवु......

राज्यातील तमाम दोन कोटी न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावुन बसलेला असताना येथे सहकार्य करण्याचे सोडुन चार दिवसातच तुम्ही सरड्यासारखे रंग बदलले तुमच्या बरोबर राष्र्टवादी आणी ते झीरवळ आले काय आणी तुम्ही लगेच धनगर समाज्याला पार विसरुन पुन्हा ऐकदा खोटा अभ्यास सुरु केला......

आणी विनाकारण सहा आठवडे केस पुढे ढकलली अचाकन सिनीअर अँडव्होकेटच्या जागी अॅटर्नी जनरल उभे करुन चाल टाकली आणी हातातोंडाशी आलेला निकाल लांबवला ......

कुण्या झीरवळला सरकारची सुखद हीरवळ काय मीळायची ती मीळो.... आणी आमच्या आरक्षण लढ्याचे आता काय व्हायचे ते होवो पण बिरोबा खंडेराया तुमच्याकडुन चोख हिशोब करुन घेणार हे मात्र नक्की ......

पक्ष वेगवेगळे पण गोतावळा तोच आहे आणी हे राज्यातील जनतेला प्रचंड खटकलेले आहे.....

 खर तर या महाराष्र्टामधे अनेक जाती जमातींचा राजकीय मागासलेपणा राजकीय सामाजीक अनुषेश असताना लोकसंख्येनुसार लोकप्रतीनीधीत्व ही धनगर समाज्याची खरी गरज असताना तुम्ही अनेक जाती जमातींचे महत्व कमी करुन या गोतावळ्याबरोबर मांडी लावुन बसुन बाकी समाज घटकांचे महत्व जाणीव पुर्वक कमी करण्याचा प्रयत्न येथे झालेला दीसत आहेत .......

आणी याचे परिणाम थेट कालच्या न्यायालयीन लढ्यावर पडल्याच स्पष्टपणे दिसले आहे.....

ठीक आहे आता समाज्याच्या आस्तीत्वाची चुणुक दाखवल्याशीवाय गत्यांतर नाही या प्रस्थापीत घराणेशाहीचा कुणीही उमेदवार असो आणी तो कोणत्याही पक्षाचा असो त्यांचे विरोधात मतदान करुन त्यांची जागा त्यांना दाखवुन द्यावी .लागेल मीत्रांनो.....

येवढ्या मोठ्या महाराष्र्टामधे जर ही लोक आरक्षण लढ्यामधे आपल्या बरोबर उभी राहुन आपल्याला समर्थन करणार नसतील तर ती मंडळी आपल्या कोणत्याही कामची नाहीत ....,,

कारण आरक्षणा ईतका महत्वाचा जिव्हाळ्याचा आणी टांगणीला लागलेला दूसरा विषय नाही......

 त्यामुळे समाजबांधवांनो जागे व्हा पक्ष गेला भाड मे....या सर्वच पक्षांना समाज्याची ताकत आता निवडणुकीतुन दाखवायची आहे...... फडणवीस ने जे ओझ या राज्यातील जनतेवर लादलेल आहे आणी ज्यांचे मुळ आपल्या समाज्याचे महत्व कमी केल गेल ते ओझ आता आपणच या राज्यावरुन आणी  या फडणवीसच्या मानगुटीवरुन उतरवु.... आणी आपली समाज्याची ताकत दाखवुन देवु तो वर थांबा आणी पाहा.......!!!

- भिमराव मासाळ

इतिहास: बहुजनांचे कसब

 *यशवंत नायक : दिसम्बर 2000 *



*यशवंत नायक👇🏽*

*जन स्वराज यात्रा* 

*तब भी आज भी*


*जन शक्ती का परिवर्तन*

*मतशक्ती  मे  करके*

*राज शक्ती हाथ मे लो* 

*राजा बनो शासक बनो* 

*राजा बनकर*

*जन प्रजा हित का राजकरो*


*इतिहास इतिहास इतिहास !!!*

*अस्मिता प्रेरणा सिख संदेश लो*

*वास्तव वर्तमान मे आओ*

*भविष्य को देखो*

*इतिहास का निर्माण करो*


*सम्राट चंद्रगुप्त निर्मित*

*भारतवर्ष पुनर्निर्माण हम करेंगे*

*इतना ही याद रखो...* 

*बहुजन कसब - जोतीराव फुले*

✍🏻सिद्ध सागर

Thursday, July 20, 2023

आम्ही कोणाकडे जाणार नाही; आम्ही स्वतंत्र लढणार : महादेव जानकर

आम्ही कोणाकडे जाणार नाही; आम्ही स्वतंत्र लढणार : महादेव जानकर

आ. महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष 

मुंबई :  दिनांक १८ जुलै रोजी दिल्लीत एनडीएची एक महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली. या बैठकीत एनडीएचे ३८ घटक पक्ष सामील होणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्रातील भाजपच्या जुन्या मित्रपक्षांना या बैठकीतून वगळण्यात आलं आहे. महादेव जानकर हे जनसामान्यांचे नेतृत्व करतात. अलीकडच्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाने देशभरात चांगलेच नेटवर्क वाढवले आहे. गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन आहे. विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना रासपचे महादेव जानकर यांनी "आम्ही कोणाकडे जाणार नाही. आम्ही स्वतंत्र लढणार" असे सूचक वक्तव्य करून भाजपची हवाच काढून घेतली. 

एनडीएच्या महत्वात्या बैठकीचं नियोजन न गेल्याने भाजपाच्या मित्रपक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. भाजपने दिलेली वागणूकीमुळे आम्ही स्वत:च्या पायावर उभं राहालया शिकलो असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे. तर आम्ही कोणाकडे भीक मागायला जाणार नाही, आता प्रत्येक जागा आम्ही लढणार, असं महादेव जानकर म्हणाले आहेत.

या विषयावर बोलताना ते म्हणाले की, भाजपला वाटत आमची त्यांना गरज नाही. त्यामुळे आम्ही कशाला भीक मागायला जाऊ की आम्हाला बोलवा. असं काही करायची गरज नाही. आम्ही महाराष्ट्र देशभर जन स्वराज यात्रा काढली आहे. आमचा पक्ष कसा वाढेल याचा आम्ही प्रयत्न करु. हा पक्ष मोठा होईल, अशी त्यांना भीती असेल म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं नसेल. आमचे आमदार-खासदार होतील, तेव्हा ते आम्हाला बोलावतील. आम्ही शहाणे झालो असून ५४३ जागा राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार असल्याचं जानकर म्हणाले. 

सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरता ओबीसींनी सत्ताधीश व्हावे : महादेव जानकर

सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरता ओबीसींनी सत्ताधीश व्हावे :  महादेव जानकर

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्ण वर्ष महोत्सवी वर्षानिमित एक दिवशीय संवाद परीषदेत बोलताना महादेव जानकर बाजूस मान्यवर.

नागपूर : जोपर्यंत बहुसंख्याक उपेक्षित समाज सत्तेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही, तोपर्यंत आपले हक्क आणि अधिकार आपल्याला मिळणार नाहीत, त्यामुळे ओबीसींनी आता सत्तेचे स्वप्न पाहिले पाहिजे, सामाजिक व आर्थिक परिवर्तनाकरिता सत्ताधीश व्हावे, असे आवाहन माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी  येथे केले.

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्ण वर्ष महोत्सवी वर्षानिमित तथा आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज व विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने एक दिवशीय संवाद परीषदेचे आयोजन सेवा दल महिला महाविद्यालय सक्करदरा येथे करण्यात आले होते, त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून श्री जानकर बोलत होते.

अरविंद माळी म्हणाले, सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय परिवर्तन अशक्य आहे.  याकरता स्वतःमध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणावे लागेल. तसेच फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जनमानसात पोहोचण्यासाठी, आपल्याला प्रयत्न करावे लागतील.

विदर्भ तेली समाज महासंघाचे राज्य संघटक कृष्णाजी बेले अध्यक्ष होते. सेवादल महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय शेंडे स्वागताध्यक्ष होते. राष्ट्रीय समाज एम्पलॉयज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर उद्घाटक होते. राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे अध्यक्ष गोपाल भारती, सुशिलाताई मोराळे, शुभांगी घाठोळे, मिस्टर अफजल, हरिकिशन दादा हटवार, प्राध्यापक राहुल मून, अरुण गाडे, संजय रामटेके उपस्थित होते. संचलन एड. रमेश पिसे यांनी केले. विलास काळे यांनी भूमिका मांडली तर सुधीर सूर्वे यांनी आभार मानले.

संत नामदेव महाराज यांच्या पायरी पासून रासपच्या जन स्वराज यात्रेस प्रारंभ

संत नामदेव महाराज यांच्या पायरी पासून रासपच्या जन स्वराज यात्रेस प्रारंभ

आम्ही कुणावर अवलंबून नाही; आम्ही आमच्या पायावर उभे : महादेव जानकर 

पंढरपूर (यशवंत नायक ब्यूरो) : आम्ही कुणावरही अवलंबून नाही, आम्ही आमच्या पायावर उभे आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. आगामी काळात भाजपाने आमचा विचार केला नाही, तर एकला चलोची भूमिका घ्यावी लागेल, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

महादेव जानकर यांनी पंढरपूरातील श्री. विठ्ठल मंदिर येथील संत नामदेव पायरी पासून ‘जनस्वराज्य यात्रे’चा शुभारंभ केला. राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जानकर यांनी ही यात्रा काढली आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर म्हणाले, “जनतेने खऱ्या माणसाला आणि पक्षाला मत दिलं पाहिजे, असं आवाहन यात्रेच्या माध्यमातून करणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी ही यात्रा सुरू केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ( एनडीए ) लोकसभेला जागा दिल्या नाही, तर एकला चलोरेची भूमिका घेणार आहे.”

“भाजपा आणि काँग्रेसवर किती दिवस अवलंबून राहायचं. आपला पक्ष वाढवण्याची गरज आहे. लोकसभेच्या ४८ मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात परभणी, माढा, बारामती, सांगली, ईशान्य मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील मिर्जापूर येथून मी लढण्याची तयारी केली आहे,” अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली.

उत्तर प्रदेशात हरिओम बाबू यांच्यामुळेच राष्ट्रीय समाज पक्ष उभारला : सिद्धप्पा अक्कीसागर

उत्तर प्रदेशात हरिओम बाबू यांच्यामुळेच राष्ट्रीय समाज पक्ष उभारला : सिद्धप्पा अक्कीसागर

मुंबई : हरिओम बाबू यांच्यामुळेच उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष उभारला, असे प्रतिपादन रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्किसागर यांनी केले. उत्तर प्रदेश रासपचे संयोजक हरिओम बाबू यांची जयंती रासेफ व यशवंत परिवारातर्फे आयोजित केली होती. 

जयंती निमित्त ऑनलाईन मार्गदर्शन करताना रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल अक्कीसागर म्हणाले, पशु नव्हे तुम्ही मानव कमाल देणगी अक्कल विधवा केली असे महात्मा फुले यांनी सांगितले आहे. हरिओम बाबू भारत दूरसंचार मध्ये नोकरी करत होते. त्यांनी नोकरी करत कुटुंबाला व समाजाला सांभाळले. 2016 च्या एप्रिल महिन्यात माझ्या घरी कुमार सुशील व मनोज अमरपाल आले होते. त्यानंतर पुढे त्यांच्या माध्यमातून हरिओम बाबू यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी मला विचारले जानकर साहेब उत्तर प्रदेशला येतील का? मी म्हणालो, येतील. पुढे जानकर साहेब वाराणसीच्या दौऱ्यावर गेले आणि दौऱ्यात असताना साहेबांना मंत्री पदासाठी फोन आला. हरीओम बाबू म्हणाले, आपणास काशी विश्वेश्वराचा आशीर्वाद मिळाला आहे. उत्तर प्रदेशात पार्टी हरिओम बाबू यांच्यामुळे उभी राहिली. त्यांची आठवण जपत जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनात देशभरात रासप तर्फे पहिला स्मृतिदिन साजरा केला. महाराष्ट्रात नालासोपारा येथे स्मृतिदिन कार्यक्रम झाला. 

ऑगस्ट २०१८ मध्ये जानकर साहेबांनी रासपच्या दिल्लीतील वर्धापन कार्यक्रमात कार्यकर्त्यांसाठी जेवण ठेवलेले आणि तेथे हरिओम बाबू बोलत होते, माझे आज स्वप्न पूर्ण झाले, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले. सुखी जीवन जगत असताना त्यांनी दू:खी जीवन जगल. त्यांनी खूप मोठा वारसा ठेवला. बहुसंख्याक समाज हा महामानवाची वाट पाहत असणारा समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. राष्ट्रीय समाज फेडरेशन हे बुद्धिजीवी व श्रमजीवी लोकांचे आहे. सर्वानाच महादेव जानकर, काशीराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बनता येणार नाही, परंतु हरिओम बाबू जरूर होता येईल. राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांचे कार्य पुढे नेण्याचा निश्चय हरीओम बाबू यांच्या जयंतीनिमित्त करूया. जानकर साहेब यांनी हरिओम बाबू यांची जयंती साजरी करावी असे निर्देश दिले होते. कार्यकर्त्यांची आठवण जपणारा नेता महादेव जानकर आहे. हरिओम बापू यांच्याप्रमाणे कार्य करत रहा, कार्यकर्त्यातूनच नेता तयार होतो. 

यावेळी जयंतीप्रसंगी नरेश वाल्मिकी, दिल्ली रासेफचे वीरपाल, उत्तर प्रदेश राज्याचे प्रभारी चंद्रपाल, इस्माईल बाटलीवाला, महाराष्ट्र राज्य सचिव ज्ञानेश्वर सलगर, दिगंबर राठोड साहित्यिक डॉक्टर जे. पी. बघेल,ल रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेफचे महाराष्ट्र सचिव जयसिंग राजगे सर यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी केले. बैठकीसाठी देशभरातून मान्यवर उपस्थित होते.

बातमी स्त्रोत : आबासो पुकळे, उपसंपादक यशवंत नायक.

२७ अगस्त को जोधपूर मे देव-रूपी राईका- रेबारी- देवासी समाज (पशुपालक )का विशाल एवं भव्य महासम्मेलन

२७ अगस्त को जोधपूर मे देव-रूपी राईका- रेबारी- देवासी समाज (पशुपालक )का विशाल एवं भव्य महासम्मेलन

जोधपुर चलो...!  जोधपुर चलो....! जोधपुर चलो...!                                                         

देवरूपी सामाजिक बन्धुओ !                                             

राम- राम सा                                 

राजस्थान प्रदेश की  'सूर्यनगरी ' के विरुद से विख्यात  जोधपुर  में सम्भाग स्तर पर आप सम्मानीय देव-रूपी राईका, रेबारी, देवासी समाज (पशुपालक) का विशाल एवं भव्य महा सम्मेलन 27 अगस्त, 2023 रविवार को समाज के राजनैतिक, सामाजिक, आर्थिक तथा शैक्षणिक भविष्य के निर्धारण एवं विकास की दिशा में सामाजिक एकता और सांगठनिक शक्तिप्रदर्शन के लिए -परम पूज्य सन्तों, महापुरुषों व प्रबुद्धजनों के सान्निध्य में आयोज्य महाकुम्भ में आप अपनी  गौरवमयी उपस्थिति से बहु- आयामी इस सामाजिक कार्यक्रम को सफल बनावें । देवासी समाज के आराध्य देवाधिदेव  आशुतोष महादेव से  हार्दिक  प्रार्थना है कि  हमारे  इस महासम्मेलन को अपने अनुकम्पात्मक शुभाशिष  से सफल बनावें ।

सज्जनो ! आधुनिक प्रजातान्त्रिक युग में देवरूपी समाज के संख्याबल और युवाशक्ति के संगठन का अनुशासित रीति से शक्ति- प्रदर्शन  समय की माँग है ।

अतः आप सभी बन्धुओं से करबद्ध अनुरोध है कि समाजहित  को सर्वोपरि मानकर  आप अधिकाधिक सँख्या में 27 अगस्त 2023  रविवार को जोधपुर में  आयोज्य महा सम्मेलन में पधारने की कृपा करें ।

- ओमप्रकाश जी दाडमी 

(व्याख्याता)

Wednesday, July 19, 2023

रासपचा विचार महात्मा फुलेवादाचा : काशीनाथ शेवते

रासपचा विचार महात्मा फुलेवादाचा : काशीनाथ शेवते

अमरावती विभागिय मेळाव्यात बोलताना रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, फुलेपिठावर युवा नेते अजितदादा पाटील, गणेश मानवकर व अन्य 

अमरावती विभाग रासपचा कार्यकर्ता मेळावा यशस्वी

शेगाव (आबासो पुकळे) : राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या नेतत्वात राष्ट्रीय समाज पक्षाची घोडदौड देशभर सुरू आहे. रासपचा विचार हा फुलेवादाचा आहे. कार्यकर्त्यांनी फुलेवाद समजून घ्यावा. महात्मा फुले यांची पुस्तके वाचावीत, असे विचार राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी व्यक्त केले. श्री. शेवते हे रासप अमरावती विभाग कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

श्री. शेवते पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षात घराणेशाही नाही. धनदांडगे नेते, जातदांडगे नेते नाहीत. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेली, कोणताही राजकीय वारसा नसनाऱ्या माणसांचा पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष आहे. रासप सामाजिक चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पैशावर, निष्ठेवर चालणारा पक्ष आहे. रासप कलेकलेने वाढत चाललेला आहे. या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला स्वाभिमान देण्याचे काम जानकर साहेब करत आहेत. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता, भाजप सारख्या पक्षांना आपली गरज राहिली नाही. त्यांना आता मोठे पक्ष नेते मिळालेत, अमरावती विभागात आपली ताकद वाढवली पाहिजे. कोणत्याही निवडणुका लढताना कार्यकर्त्यांचे पाठबळ लागते. पैशावर नुसतं राजकारण होत नाही. कार्यकर्त्यांची फळी तयार करावी. मतांची टक्केवारी वाढल्याशिवाय छोटे पक्ष सत्तेत येणार नाहीत. राष्ट्रात राहणारा समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. 

यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, युवकचे नेते अजितदादा पाटील, अमरावती विभागाचे प्रभारी आणि विदर्भाचे उपाध्यक्ष डॉक्टर तौसिफ शेख यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख अतुलभाऊ भुसारी, वाशिम जिल्हाध्यक्ष दीपक तिरके, बुलढाणा घटाखली जिल्हाध्यक्ष शिवदास सोनोने व नवनिर्वाचित अकोला जिल्हाध्यक्ष गणेश मानकर, अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले, जिल्हा प्रभारी तोशिफ मोहम्मद, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष महेश तायडे, सुरेश काले, संतोष वनवे, मदन तिरके, आशिष कोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खोटी आश्वासने देऊन भुलवणाऱ्या पक्षांना थारा न देता रासपला पाठबळ द्यावे : महादेव जानकर

खोटी आश्वासने देऊन भुलवणाऱ्या पक्षांना थारा न देता रासपला पाठबळ द्यावे : महादेव जानकर 

जन स्वराज यात्रेत भाजप, काँगेस, प्रधानमंत्री मोदींवर महादेव जानकर यांचा घणाघात 

सातारा (आबासो पुकळे) : आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेवादाचा विचार घेवून राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल सुरु आहे. उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी जाता याव हे आमचे ध्येय आहे. आजवर जनतेला भुलविण्याचे काम करणारे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला आता थारा न देता जनतेने रासपला मतांचे पाठबळ द्यावे, असे आवाहन करून मी एकवेळ आत्महत्या करेन पण, अन्य कुठल्याही पक्षातून आमदार अथवा खासदार होणार नाही, असे प्रतिपादन रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर येथून राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेचा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शुभारंभ झाला. फलटणच्या आंबेडकर चौकात ही जन स्वराज यात्रा आली आणि तिचं रुपांतर सभेत झालं. यावेळी जानकर यांनी जोरदार फटकेबाजी करत सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिलाय. यावेळी फुलेपिठावर रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, सचिव ज्ञानेश्वर मंदिर, प्रदेश उपाध्यक्ष बबनदादा वीरकर, जिल्हा अध्यक्ष खंडेराव सरक, ज्येष्ठ नेते भाऊसो वाघ, मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, माण तालुका बाजार समिती उपसभापती वैशाली वीरकर, युवक आघाडीचे अजित पाटील, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शरदभाऊ दडस आदींची उपस्थिती होती.

महादेव जानकर म्हणाले, मी वाहवत जाणारा माणूस नाही. एक काळ असा होता जेव्हा माझे सगळे सहकारी, मित्रपक्ष त्यांचं (भाजपाचं) चिन्ह घेऊन निवडणूक लढवू लागले होते. माझ्यावरही दबाव होता. मला त्यांनी सांगितलं तुम्हाला कमळ चिन्ह घ्यावं लागेल. मी त्यांना म्हटलं "माझा राजीनामा घ्या, मी गावाकडं जाऊन शेती करेन किंवा मेंढरं राखेन. मला तुमची काही गरज नाही. मला हे सरकार नको आहे. मी तसं म्हटल्यावर त्यांनी मला सांगितलं तुमच्या चिन्हावर निवडणूक लढा." 

जानकर घणाघाती भाषणात म्हणाले, प्रस्थापित पक्ष निवडणूकीत शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची, बेरोजगारांची भाषा करतील, भाई बहनो म्हणतील, पण त्यांना भुलू नका, कारण हे मृगजळ आहे. त्यांना तुमचा विकास करायचा नाही, तुमची फक्त त्यांना मते पाहिजेत. जनतेने केवळ मतदार न होता तुम्ही निवडून गेले पाहिजे. झेंडे, रंग बदलून सत्तेत तेच ते लोक राहतात, हे चित्र रासपला बदलायचे आहे. तुम्हाला कुणाकडे तिकीट मागायची गरज नाही. आजवर ज्यांना राजकारणात जागा मिळाली नाही, त्यांना राजकीय सत्तेत आणण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष जन्माला आलाय. लोकशाहीत राज्यकर्ते जेव्हा जनतेचे मालक होतात तेव्हा जनता भिकारी होते. 

आमच्या ताटात माती टाकत असाल तर मी तुमचही ताट भरु देणार नाही, सुरुवात तुम्ही केलीत शेवट महादेव जानकर करेल, असा खणखणीत इशारा भाजपला दिला. जन स्वराज यात्रेचं सर्वच पक्षांनी माढा मतदारसंघात स्वागत केले आहे. याचा अर्थ माझा कोणीच शत्रू नाही. मी शत्रुत्व का स्वीकारत नाही? कारण मी कोणाशीही येणाऱ्या काळात युती करू शकतो, असा इशारा महादेव जानकर यांनी महायुतीला दिला. मला स्वतःच्या ताकदीवर आता दिल्लीला जायचे आहे. माझे मन मुंबईत रमत नव्हते. मला दिल्लीला जायचे होते. माझ्यावर दबाव टाकून मला राज्यात मंत्री करण्यात आले, असा गौप्यस्फोट महादेव जानकर यांनी केला. आपलं लक्ष आता महाराष्ट्रात नसून दिल्लीकडे असल्याचंही महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं.

मी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली होती. मात्र, मी आत्महत्या करेन पण कमळ, हात आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असं मी भाजपला सुनावलं होतं, असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला.

महादेव जानकर म्हणाले, मी आमचं चिन्ह घेऊन लढत होतो. मी माझ्या पक्षातून चिन्हावर लढलो, परंतु ६९ हजार मतांनी पडलो. त्यानंतरच्या निवडणुकीत (२०१९) भाजपाने रासप आमदाराच्या बायकोला कांचन कुल यांना बारामतीतून उमेदवारी दिली. त्या कमळ चिन्हावर दीड लाख मतांनी पडल्या. त्यांच्याकडे कमळ होतं तर ते बारामतीत यायला पाहिजे होतं. आजही बारामतीची निवडणूक महादेव जानकरच लढू शकतो, हे मी चॅलेंज देऊन सांगतो.

मोदी ओबीसींच्या पाठीशी आहेत काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाव घेतात आणि ओबीसी मतावर निवडून येतात. मात्र हेच मोदी जातीनिहाय गणनेला विरोध करतात. जातीनिहाय जनगणनेला विरोध करणारे पंतप्रधान ओबीसी समाजाच्या पाठीशी आहेत का? असा सवाल त्यांनी केला. जातनिहाय जनगणना सर्व समाजाची होणे गरजेचे आहे. जातिनिहाय जनगणना झाल्यास प्रत्येक जातीची लोकसंख्या कळेल. आणि त्या प्रमाणात त्या जातीचा किती विकास झाला हे सुद्धा समोर येईल. जेव्हा हे सत्यसमोर येईल तेव्हा काँग्रेस आणि भाजपने कशी फसवणूक केली हे सुद्धा उघड होईल, असा दावाही त्यांनी केला. माढा तो झाकी है! वाराणसी अंतिम लक्ष है ! असे सूचक वक्तव्य जानकर यांनी बोलताना केले.

महादेव जानकर यांच्या नावावर महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात आणि कर्नाटकात आपले उमेदवार एबी फॉर्मवर निवडून आले आहेत. आपला पक्ष चांगला जम धरत आहे. आपल्याला लोक स्वीकारत आहेत. हे सांगण्यासाठी फलटणमध्ये आलो आहे. तुम्ही मला माढा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी सांगतय पण माझा डोळा 48 लोकसभा मतदारसंघावर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेस जनतेकडून तुफान प्रतिसाद मिळाला.

Monday, July 17, 2023

सरकारी नोकरीची जाहिरात काढा आणि बेरोजगारांना लुटा शासनाचे नवे धोरण तर नाही ना?

सरकारी नोकरी.. हे कसलं लॉजिक आहे :

कोणत्याही सरकारी खात्यात जागा रिक्त असेल तर त्याची फॉर्म फी ₹ 500-700 आहे.

सरकारला विद्यार्थ्यांकडून पैसे कमवायचे आहेत की त्यांना रोजगार द्यायचा आहे???  माहिती नाही.

उदाहरणार्थ:-

पदे ५० आहेत संपूर्ण भारतातून फॉर्म भरले जातात.


फॉर्म फी रु 500,

50 लाख ते 80 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात


सरकारचा फायदा पाहूया


500 रुपये फॉर्म फी × 50,00,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला =

 (निव्वळ उत्पन्न फॉर्म फी पासून)

2 अब्ज 50 कोटी

50 जणांना नोकरी द्यावी लागेल

पगार 25000 रुपये दरमहा गृहीत धरला जातो, तो जास्त मानला जातो पण तो तेवढा नाही.


25000 × 50 लोक = 12,50,000 महिना


12,50,000 × 12 महिने = 1 कोटी 50 लाख


चाळीस वर्षे काम करत आहे

1,50,00,000 × 40 वर्षे = 60 कोटी


सरकारचे फॉर्म फी एकूण उत्पन्न = 2 अब्ज 50 कोटी रुपये


 नियुक्त लोकांचा 40 वर्षांपर्यंतचा पगार

 60 कोटी रु


 2,50,00,00,000 - 60,00,00,000 = 1,90,00,00,000


 सरकारचे एकूण उत्पन्न = 1 अब्ज 90 कोटी


 माझा सरकार आणि विभागाला प्रश्न आहे की तुम्हाला विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्यायच्या आहेत की

 पैसे कमवायचे आहेत...?

(मुदलात करियरच्या कट्ट्यावरील मुशाफिरी करताना फीविषयक ऐकिवात आलेली चर्चा...😁)

बारामतीचे पवार आणि बारा 'मती'वाले पत्रकार

 *21 साल पहले☝🏾*

यशवंत नायक:  मई 2002

*बारामती* के पवार और बारा *मती* के पत्रकार 


मराठीमे ☝🏾 कृपया पढे ☝🏾

ये अग्रलेख *चंद्रगुप्त* ने लिखा था✍🏻

पवार साहेब *साठी* 60 पार कर के

 *एक्सष्टी* मना रहे थे. 

मराठी - महाराष्टीय  पवार जी राष्ट्रीय बन रहे थे.

*पंतप्रधान* बनने का ख्वाब देख रहे थे.

लेकीन 

*12 मती वाले पत्रकार*

*10 मती वाले रावण से ज्यादा* 


इसका लेखा - जोखा

See through

Report

पत्रकार चंद्रगुप्त ने लिखा है☝🏾

आज शरद पवार आयु के 82 वर्ष मे संघर्षरत है..

आज के एकम एवं

*Grat मराठा शरद पवार जी* 

*भारत के प्रधाममंत्री बने* 

*यही एक शुभकामना 💐*

*Plan for 1 year plant SEED for 10 year TREE & for 100 year THOUGHTS*

_सागर

Thursday, July 13, 2023

यादव वंशीय कृष्णा तुझा तो कुरु वंशीय अर्जुन कोठे आहे ?

ये यदु वंशीय कृष्ण, तेरा वो कुरु वंशीय अर्जुन कंहा है ?


✍🏻 सिद्दसागर 

हिंदू हित वादी मंडल को, हिंदुत्व वादी ओं का विरोध क्यों ?

संपादकीय

संदर्भ : यशवंत नायक - जुलाई 2000☝🏾

पत्रिका यशवंत नायक

23 साल पहले ☝🏾

तब भी आज भी...


मेंढपाळपुत्र चंद्रगुप्त मौर्य

मेंढपाळपुत्र चंद्रगुप्त मौर्य




ॲड.अशोक सुरेश पुकळे यांचा सत्कार

ॲड.अशोक सुरेश पुकळे यांचा सत्कार 

ॲड.अशोक सुरेश पुकळे रा. म्हसवड जिल्हा - सातारा यांनी B.sc LLB ही कायदा पदवी (एलएलबी) उत्तीर्ण झाल्याबदल त्यांचा पुकळे कॉर्नर स्थित विरकर हार्डवेअर येथे मान्यवरांनी पुष्पहार गळ्यात घालून अभिनंदन केले. शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार केला. उपस्थितांनी त्यांच्या यशाचे कौतुक करताना अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आप्पासाहेब पुकळे (माण - खटाव विधानसभा अध्यक्ष रासप), ब्रह्मदेव पुकळे (मा. सरपंच पुकळेवाडी ग्रामपंचायत सदस्य - संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माण ), बबनदादा विरकर (रासप राज्य कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र, इंजि दादासाहेब दोरगे साहेब (सातारा जिल्हा उपाध्यक्ष रासप), पोपट मासाळ (मा.नगरसेवक म्हसवड नगरपालिका), सुरेश पुकळे (मा.नगरसेवक , मा.उप नगराअध्यक्ष म्हसवड नगरपालिका), आकाश विरकर, धनाजी विरकर, गणेश पुकळे, भागवत पुकळे, अनिल नामदेव पुकळे, अंकुश कोकरे (युवा उद्योजक) पै.विकास सारुख आदी मान्यवर उपस्थित होते. अशोक पुकळे यांनी कायद्याची पदवी प्राप्त केल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुकळेवाडी ग्रामस्थांनी समाज माध्यमातुन अभिनंदन केले आहे.

Wednesday, July 12, 2023

जोतिबा मंदिर शिखराचा जिर्णोद्धार

 जोतिबा मंदिर शिखराचा जिर्णोद्धार


पुकळेवाडी तालुका माण जिल्हा सातारा येथील जोतिबा मंदिराच्या शिखराचा जिर्णोद्धार ग्रामस्थ मंडळ पुकळेवाडी यांच्या तर्फे करण्यात आलेला आहे. मंदिराचा गाभारा पूर्ववत ठेऊन त्यावर जीर्ण झालेले शिखर हटवून त्या ठिकाणी नवीन शिखर बांधण्यात आले आहे. पूर्वीच्या शिखरात आणि आताच्या शिखरात बराचसा बदल केलेला आहे. पूर्वीच्या शिखराची उंची ही खूप मोठी होती, आताच्या शिखराची उंची कमी करण्यात आली असून शिखराचे काम मजबूत करन्यात आले आहे. शिखराच्या जिर्नोधराचे काम दिनांक ११/०६/२०२२ रोजी सुरू करण्यात आले. शेवटचे काम १०/०४/२०२३ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान काळभैरव मंदिराचे समोर चौफाळा बांधण्यात आला आहे. शिखराचे जिर्नोधराचे काम करणारे कारागीर नाव - एस पांडीए राजण आहे तर त्यांचा कायम रहिवाशी पत्ता - मु/पो देवकोटई तालुका - सिवगंगा, तमिळनाडू- ६३०३०२ हा आहे. 

Sunday, July 9, 2023

राष्ट्रीय समाज पक्ष की देशभर मे निकलेगी जन स्वराज यात्रा -2024

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित जनस्वराज यात्रा 2024

जन के लिए 
जन के द्वारा 
जनस्वराज यात्रा

राष्ट्रीय समाज पक्ष की देशभर मे निकलेगी जन स्वराज यात्रा 


अखाड़ा दंगल का हो या सियासत का, वो विरोधियों को अपने दांव से चित करने में माहिर हैं। वो राजनीति के महारथी हैं तो राष्ट्र को महात्मा फुले के  फुलेवाद स्वामी विवेकानंद के एकात्मवाद और पुण्यश्लोक अहिल्या देवी के आदर्श राज्यकर्ता की राह पर ले जाने वाले एकमात्र सारथी भी हैं।  सियासत उनके लिए सिर्फ सत्ता पाने का जरिया नहीं बल्कि राष्ट्रीय समाज के गरीबो, मजलूमों और जरूरतमंदों तथा हाशिये पर छूट गए लोगों के उत्थान का माध्यम है।देश के राजनीति में 90 के दशक में एक नौजवान निर्भीकता पूर्वक महाराष्ट्र के कोने कोने में बिना संशाधनों के दौड़ रहा था,उसके मन मे मात्र एक विश्वास था कि विचारों के दम पर राजनैतिक प्रवाह से दूर फेके गए नौजवानों को फिर शने शने जोड़कर उन्हें सत्ता में भागीदारी दिलाना  ....ओ भी सिर्फ ओ सिर्फ विचारों के बलबूते और उसका खोया हुवा स्वाभिमान जगा कर अनेक अड़चनों से सामना करते हुए भी वह नौजवानों के भीतर स्वाभिमान, स्वावलंबन और विचारों की मशाल जगाता घूम रहा था इसी मशाल से 2003 में राष्ट्रीय समाज पार्टी का अवतरण हुवा प्रचंड इच्छाशक्ति और जीद्द के बलबूते जलती मशाल  स्वाभिमानी स्वावलंबी वैचारिक निष्ठावंत आम नौजवान राष्ट्रीय समाज पार्टी की ताकत बनने लगी। अनेकानेक नौजवानों को राजनीति में  जन्म देने वाली मातृत्व रूपी संस्था बन गयी राष्ट्रीय समाज पार्टी, जिस व्यक्ति ने ये सब संघर्षों से खड़ा किया सर्वसामान्य से प्रेम का नाता जोड़ राष्ट्रीय समाज पार्टी रूपी परिवार खड़ा किया उस व्यक्ति को आज पूरा देश सम्मान से महादेव जानकर साहब के नाम से जानता है अनेक संकटं आये प्रस्थापित विरोधीयो के साथ साथ अपनो ने भी कई बार पीछे से वार किया सब झेलते रहे! कभी पलट कर ऐसे लोगो को जवाब दिया ही नही..पर रहे सदैव चलते धैर्यवान धिरवान विरवान बनके कारण जिन्हें कभी कोई जानता नही था आज उन्हें चौक चौराहों पर नेताजी के तौर पर पहचाना जाने लगा था.. राष्ट्रीय समाज की बदौलत वे लड़ना सिख रहे थे ... कदम शने शने राजनैतिक पगडंडिओ की ओर बढ़ रहे है ... आज चुनावो फार्म भरने की कला सिख तो रहे ही थे जहाँ पहले कही किसी का झंडा उठाने, दरी बिछाने में लगे थे गुलामी का झंडा ले फिरते थे  उसे छोड़ अपना डंडा अपना झंडा, चर्चा पर्चा खर्चा अपना हो ऐसा तो कहना सिख ही गए । राजनीति में नेता तो बहुत है लेकिन राजनीति में जिनका कोई नही ऐसे नौजवानों के लिए क्रांति की मशाल जलानेवाले एकमात्र औलिया है जानकर साहब इसे कोई नकार नही सकता हम जैसे सामान्य कार्यकर्ताओ को  गढ़नेवाले कुम्भार रूपी थापों के सरताज  ‘मन से भोले महादेव लेकिन इरादों में फौलादी’ राष्ट्रीय समाज पार्टी के मुखिया और ‘साहेब’ के नाम से प्रसिद्ध है राष्ट्रनायक महादेव जानकर ..... सातारा  की क्रांतिभूमि महाराष्ट्र जहाँ महात्मा फुले, सावित्री बाई फुले, छत्रपति शाहूजी महाराज, वीर शिवाजी, लोकमाता अहिल्यादेवी होल्कर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, बाबासाहब अम्बेडकरने जन्म लिया ऐसे जिले से निकलकर अन्याय अत्याचार और पिछड़ेपन के खिलाफ लड़ना और हक़ की आवाज बुलन्द करना आप के स्वाभाव में बचपन से शामिल था। एक सुशिक्षित इंजीनयर बनने के बाद जब आपके सहपाठी बहुराष्ट्रीय कंपनियों में नोकरी से जुड़कर मोटी कमाई को अपना रहे थे, तब आपका मन, मस्तिक, हृदय, राष्ट्रीय समाज के पिछड़ेपन, गरीबी, अन्याय, अत्याचार के हक़ के लिए लड़ने को ललकार रहा था । आपने अपने ऐश्वर्य की आरामदायक जीवन यात्रा को पथरीली कंकरीली अविस्मरणीय अगाथ यात्रा की ओर मोड़ दिया और इस दबे कुचले घोर गरीब बेसहारा राष्ट्रीय समाज के लिए देवो के महादेव की शिरलोबा की महायात्रा लाखो लोगो के बीच प्रण कर लिया कि आगे अब......यही राष्ट्रीय समाज मेरा परिवार है मेरे जीवन का उद्देश्य ही राष्ट्रीय समाज को उसका ऐतिहासिक गौरवशाली अतीत का वैभव दिला कर उसे याचक की बजाय पुनः राजसत्ता दिलाना है उसके लिए अब मैं.....

अब अविवाहित रहूंगा ।

किसी प्रकार के पारिवारिक रिश्ते नाते नही रखूंगा।

अब कभी घर की डयोढ़ी नही लाघुँगा।।

उपेक्षित समाज को अपेक्षित सामाजिक आर्थिक राजनीतिक भागीदारी दिलाना ही मेरे जीवन का लक्ष्य बना आज तक आप अपनी इसी परिपाटी को यथवात जारी रख कर आगे बढ़ रहे है ।।

1989 से लगातार आप कभी राष्ट्रीय समाज अधिकार यात्रा, राष्ट्रीय समाज दिन दुखी जनजागरण /अधिकार यात्रा, राष्ट्रीय समाज अधिकारी खोज यात्रा .. महान स्वतंत्रता सेनानी अंग्रेजो के ख़िलाफ़ आज़ादी का संगठित प्रथम विद्रोह के नायक संगोली रय्याना, महात्मा फुले जन्मगांव कटगुण जयंती, लोकमाता अहिल्यादेवी होल्कर जन्मगांव चौंडी जयंती, भिवड़ी में  बेडर रामोशी समाज सम्मान समारोह भारत की संसद पर धनगर गडरिया पाल बघेल कुरुबा रबारी अधिकार मोर्चा जैसे कई समाजप्रबोधन के कार्यकर्मो की आपने शुरुवात की।

आपके सिर पर वर्ष 2003 में एक सेहरा बंधा जब आपने राष्ट्रीय समाज पक्ष रूपी राजनीतिक दल की स्थापना इस देश की एकमात्र न्यायकुशल आदर्श शासिका पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी के उदगम स्थल चौड़ी अहमदनगर में उनके जयंती कार्यक्रम 31 मई को की गई। भारत के राजनैतिक इतिहास में यह एक महत्वपूर्ण अध्याय था, क्योंकि लगभग दसों दशकों से हाशिये पर जा चुके फुलेवादी  अहिल्यावादी आंदोलन को आपने शने शने पुनः पुनर्जीवित किया है। 

आपने एक आगाज़ किया और उदघोष दिया कि .... भारत में सब समान तो देश महान ..एक देश एक विधान सबको शिक्षा एक समान ...करो शिक्षा का राष्ट्रीयकरण.. मिले सबको मुफ्त चिकित्सा..हर हाथ को काम .. किसान को मिले मुफ्त बीज बिजली ओ उत्पादन लागत का दुगुना दाम ... महिलाओ को समान हिस्सेदारी ...आरक्षण का हो सही अनुपालन .....।।



  • राष्ट्रीय समाज का एजेंडा, संसद भवन में पिला झंडा।।
  • बलश्रेष्ठ तो रणश्रेष्ठ बुद्धि श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ ।।
  • फुलेवाद के सम्मान में रासपा मैदान में । 
  • वोट हमारा राज हमारा 
  • राष्ट्र हमारा राज हमारा।।
  • सत्यशोधन समाजप्रबोधन राष्ट्रसंघटन
  • राष्ट्र ही देव राष्ट्र ही जाति राष्ट्र ही धर्म हमारा। राष्ट्र बने बलशाली यह भाषा सूत्र हमारा।। 
  • न्याय चाहते हो तो शासक बनो।
  • राष्ट्रीय समाज का हित फुलेवाद मे सुरक्षित।।
  • आरसपी करे पुकार पीला झंडा अपनी सरकार।।
  • भारत राष्ट्रीय समाज का । शासन भी राष्ट्रीय समाज का।
  • दुसरो के आलीशान महल की बजाय अपनी झोपड़ी अच्छी है इसपर गर्व करिये और स्वाभिमानी बनिये । 
  • संघर्ष, धैर्य, जिद्द व बुद्धिकौशल से आप राष्ट्र  ही नही अपितु संसार भी जीत सकते है।। 
  • अपयश मिलने पर प्रयत्न करना कदापि न छोड़े करत करत अभ्यास के जड़मति होते सुजान।। 
  • कौन आपसे जुड़ रहा है, कौन आपको छोड़के जा रहा है, कौन आपको गाली दे रहा है इसका विचार किये बिना आप अपने लक्ष्य ध्येय को प्राप्त करने हेतु सतत प्रयत्नशील रहे 

  • किसी की मेहरबानी पर नेता कभी नही बन सकते। अपनी भुजाओं पर सदा यकीन रखिये और आइये संघर्ष शुरू करिये
  • मुफ्त का राशन नही, हमे हमारा शासन चाहिए

54 साल की इस तपस्या में आपने न सिर्फ उत्तरप्रदेश महाराष्ट्र गुजरात कर्नाटक में फुलेवाद अहिल्यावाद स्वामी विवेकानंद के एकात्मवाद और राष्ट्रीय समाज के  दीन दुखी दुबलो के विकास का परचम फहराया है, बल्कि राष्ट्रीय राजनीति में भारत के लगभग 17 राज्यो में  इस राष्ट्रीय समाज को एक नया मुकाम दिलाया है । महादेव जग्गनाथ जानकर की इसी व्यक्तित्व, कार्यशैली और लोकप्रियता की वजह से वह लगभग सभी वर्गो/ दलों के चहेते हैं। 

आज राष्ट्रीय समाज पक्ष प्रायोजित 

जन के लिए जन के द्वारा आयोजित जनस्वराज यात्रा  मिशन 2024 के माध्यम से आप भारत के भविष्य , मतधारको से मिलने का सुअवसर मिल रहा है आप सभी से अनुरोध है आज  प्रस्थापितो के विषमता भरी राजनीतिक मंसूबों को आप भलीभांति अनुभव कर रहे है देश प्रदेश के राजनैतिक, सामाजिक, आर्थिक उपेक्षित वंचित राष्ट्रीय समाज को आनेवाले चुनाव में एक मौका देकर एक स्वच्छ प्रगतिशील ईमानदार आदर्श  राजव्यवस्था को लागू करने हेतु एक बार अपना सहयोग एक वोट और एक नोट के साथ अवश्य दे ।

- कुमार सुशील, राष्ट्रीय महासचिव रासप.

Saturday, July 1, 2023

कळंबोली शहराचे उभरते नेतृत्व : आण्णासाहेब वावरे

कळंबोली शहराचे उभरते नेतृत्व : आपले अध्यक्ष आण्णासाहेब वावरे

आज १ जुलै २०२३ राष्ट्रीय समाज पक्षाचे कळंबोली शहर अध्यक्ष श्री. आण्णसाहेब वावरे यांचा वाढदिवस. कळंबोली शहरात सर्वसामान्य ते थोर लोकांपर्यत त्यांचा परिचय आहे. त्यांचे आडनाव वावरे असून भारतीय मराठी संस्कृतीत त्यांचे आडनावाला फार मोठे स्थान आहे. वावर हाय तर पावर हाय तशी त्यांची इलेक्ट्रिक क्षेत्रात वावरेंची पावर आहे. त्यांच्या कार्यकुशलतेने कळंबोली शहरात जनसामान्यांमध्ये त्यांचा चांगला वावर आहे. वावरे साहेब राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष झाले आणि शहरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हळू हळू पक्षाचे काम वाढत आहे; कळंबोली शहरात नेतृत्व उभारत आहे. नेतृत्वाचे हात बळकट करण्याचे काम चोखपणे कार्यकर्ते बजावत आहेत. आपले अध्यक्ष म्हणून त्यांचा सामाजिक राजकिय सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा ठसा उमटत आहे. आगामी पनवेल महानगरपालिकेत वावरे साहेब यांच्या रूपाने राष्ट्रीय समाज पक्षाचे खाते उघडावे, हीच त्यांना आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा राहील. त्यांना निरोगी आयुष्य,आर्थिक, सामाजिक राजकिय क्षेत्रात भरारी घ्यावी अशी आई कुलस्वामिनी मायाक्कादेवी, मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना..!

शुभेच्छुक : राष्ट्र भारती आणि यशवंत नायक परिवार.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...