Monday, April 22, 2024

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा परभणी लोकसभा मतदारसंघात विजय निश्चित

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा परभणी लोकसभा मतदारसंघात विजय निश्चित

महादेव जानकरांना मत म्हणजे पंतप्रधान मोदींना मत : देवेंद्र फडणवीस

परभणी (०१/०४/२०२४) : राष्ट्रभारती 

महादेव जानकर हा साधा माणूस आहे. पंकजाताई मुंडे सोबत निश्चितच जानकर साहेब दिल्लीला खासदार म्हणून जातील, हा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महादेव जानकर यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत' असे प्रतिपादन केले. परभणी लोकसभा मतदारसंघ संघातून महादेव जानकर यांनी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी समवेत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पंकजाताई मुंडे, सदाभाऊ खोत व अन्य महायुतीचे स्थानिक पदाधिकारी यांच्या समवेत भव्य नामांकन मोठी जाहीर सभा पार पडली. 

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, महादेव जानकर यांनी पाच वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळात काम केलं. कोणतीही कुरकूर त्यांनी केली नाही. सातत्याने आपल्या खात्याचे काम नेटानी करायचं. सामान्य माणसाकरता काम करायचं. पाच वर्षांत 1 रुपयाचा डाग सुद्धा या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही. हा मंत्री फाटकाच आला, मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला, आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटका राहणार आहे. म्हणूनच लोकांच्य मनामध्ये जानकरांचे घर आहे. महादेव जानकरांची श्रीमंती म्हणजे इथे बसलेले लोक आहेत. महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील दलीत गोरगरिब, आदिवाशी, शेतकरी, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक, भटके विमुक्त यांच्याबद्दल जानकरांबद्दल जी जागा आहे, तीच महादेव जानकरांची श्रीमंती आहे. जानकरांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत. महादेव जानकरांचे चिन्ह आता लवकरच येईल, नाहीतर कमळ, धनुष्यबाण किंवा घड्याळ शोधाल. पण कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे महादेव जानकरांच्या पाठीशी उभे आहे. जानकरांचे चिन्ह आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर हे चिन्ह घराघरांच पोहचवून महादेव जानकरांना निवडून आणायचे आहे. महादेव जानकर हा साधा माणूस आहे. त्यांच्या फोनची कुणीही वाट पाहू नये. 

महादेव जानकरांना सांगा, मी तुमची वाट बघतोय! पंतप्रधान मोदींनी फडणवीसांकडे पाठवला खास संदेश

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीचं काय सुरू आहे याची माहिती विचारली. तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही महादेव जानकरांचा फॉर्म भरायला परभणीत जाणार आहोत अशी माहिती आम्ही मोदींना दिली. त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, जानकरांना सांगा, मी त्यांची 18 व्या लोकसभेत वाट पाहतोय. परभणीच्या लोकांना सांगा जानकरांना दिल्लीला पाठवण्याची आता त्यांची जबाबदारी आहे. मोदींचा संदेश मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. मोदींसाठी जाकरांनासारखा एक खासदार तुम्ही दिल्लीला पाठवणार का? असा देवेंद्र फडणवीसांनी परभणीकरांना सवाल विचारला.

गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारत बदलल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 2014 पर्यंत प्रत्येकजण गरिबीविषयी बोलायचा, पण देशात पहिल्यांदा कोणी खऱ्या अर्थाने गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या 10 वर्षांमधील भारताची कामगिरी पाहून संपूर्ण जग आश्चर्याने तोंडात बोटं घालत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्या वर काढलं. जगातील अर्थतज्ज्ञ म्हणतात की, भारतामध्ये हे काय आश्चर्य झालं. जे विकसित देशांना जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं. मोदीजींनी हे कसं केलं, हा प्रश्न सगळ्यांना पडला. पंतप्रधान मोदींना हे जमलं कारण, त्यांनी मुठभर लोकांसाठी काम केले नाही. त्यांनी गरिबांच्या घरात वीज, पाणी, सिलेंडर या सुविधा मिळतील, हे पाहिले. तसेच आमच्या महिलांना शौचालय, मुद्रा लोन, शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासातंर्गत तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, यासाठी मोदीजींनी सातत्याने प्रयत्न केले. मोदीजी म्हणतात की, 10 वर्षांमध्ये देशात झालेले हे परिवर्तन हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्याप्रकारे बदलणार आहे, त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Wednesday, April 17, 2024

चंद्रपूर जिल्हा रासपचा कार्यकर्ता मेळावा

चंद्रपूर जिल्हा रासपचा कार्यकर्ता मेळावा

चंद्रपुर : दिनांक २१/२/२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी विदर्भ दौऱ्यात जुनासुला तालुका - मुल, जिल्हा- चंद्रपूर येथे कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले. मेळाव्यास विदर्भ अध्यक्ष रमेश पिसे, विदर्भ उपाध्यक्ष तथा अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष डॉ.तौसीफ शेख, विदर्भ सचिव संजय कन्नावर उपस्थित होते.

म्हणून रासपने पिक विमा कंपनीच्या कार्यालयाला फासले काळे

म्हणून रासपने पिक विमा कंपनीच्या कार्यालयाला फासले काळे 

दर्यापूर (२२/२/२४) : वर्षापूर्वी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी रीतसर पैसे भरून पिक विमा काढला. परंतु एक वर्षे उलटूनही पिक विमा कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांना अद्याप विम्याचे रक्कम देण्यात आलेली नाही. या संदर्भात विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी, निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी विमा कंपनीच्या कार्यालयाला काळे फासले. या आंदोलनात  अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले, तालुकाध्यक्ष राजेश पावडे, तेजस राऊत, आकाश नारे, कृष्णा होले, तेजस घुरडे, शिवशंकर धर्माळे आदी सहभागी झाले.

रासपच्या सुरत शहर अध्यक्षपदी जैनेश मोदी यांची नियुक्ती

रासपच्या सुरत शहर अध्यक्षपदी जैनेश मोदी यांची नियुक्ती

सुरत (२९/२/२४ : गुजरात रासप प्रभारी सुशील शर्मा, गुजरात युवा आघाडी अध्यक्ष महेंद्र राठोड, संघटनमंत्री युवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरत शहर अध्यक्षपदी जैनेश मोदी यांची नियुक्ती करण्यात आली.

बुलढाणा जिल्हा रासप कार्यकर्ता मेळावा

लोणार : दिनांक २४/२/२४ रोजी बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना महादेव जानकर, यावेळी मंचावर विदर्भ उपाध्यक्ष डॉ. तहसील शेख, जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तारामती जायभाये, जिल्हा संपर्क प्रमुख अतुल भुसारी, कारभारी गायकवाड आदी उपस्थित होते.

छत्रपति शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन

कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी अभिवादन केले. यावेळी रासपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, अजित पाटील, बाळासाहेब डोंगरे, परमेश्वर पुजारी, उमाजी चव्हाण, युवराज वीरकर.

स्वरूप रामटेके यांच्या निधनाने हळहळ, रासपकडून शोक

स्वरूप रामटेके यांच्या निधनाने हळहळ, रासपकडून शोक

संभाजीनगर : मुंबईतील बैठक संपवून गावी परतणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष श्री. स्वरूप रामटेके आणि संदीप साखरवाडे यांचा समृध्दी महामार्गावर भीषण रस्ते अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आणि हृदयद्रावक आहे. रितेश भानादकर आणि आशिष सरवदे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  स्वरूप रामटेके यांनी नुकताच भंडारा येथे रासपचा मेळावा घेतला होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावून त्यांच्या पाठीशी राजकीय बळ उभे केले होते. 

स्वरूपजी यांचे निधन ही विदर्भातील पक्षाची आणि सामाजिक राजकीय क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय समाज पक्षात हळहळ व्यक्त केली जात आहे. ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच निर्मिकास प्रार्थना. राष्ट्रिय समाज पक्ष सदैव त्यांच्या  सोबत आहे, ओम शांति ओम.

कांदा निर्यात बंदी उठवा, रासपचे नांदगाव तहसीलदारांना निवेदन

कांदा निर्यात बंदी उठवा, रासपचे नांदगाव तहसीलदारांना निवेदन

नांदगाव : राज्यातील शेतकरी गेल्या दोन ते तीन वर्षापासून कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत आहे, अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारची शेतकरीविरोधी भूमिका सातत्याने बघायला मिळत आहे. कुठेतरी शेतकऱ्यांच्या शेतातील माल बाजारात येण्यास सुरुवात झाली की, त्याचे बाजारभाव कमी होतात. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालास अनुदान व हमीभाव मिळावे तसेच कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत नांदगाव तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. अन्यथा केंद्र व राज्य सरकार विरोधात नांदगाव तालुका अध्यक्ष खुशाल सोर, दिंडोरी लोकसभा प्रभारी रामदास बाचकर, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष नानाभाऊ यमगर यांनी जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय.

रासपच्या तेलंगणा राज्य प्रदेश अध्यक्षपदी रमाकांत करगतला

रासपच्या तेलंगणा राज्य प्रदेश अध्यक्षपदी रमाकांत करगतला

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात तेलंगणा राज्य प्रदेशाध्यक्षपदी रमाकांत करगतला - कुकतपल्ली, हैदरबाद तसेच तेलंगणा राज्य प्रभारीपदी के. दत्तूराम- निझामाबाद, तेलगंणा यांची नियुक्ती राष्ट्रीय महासचिव के. प्रसन्नाकुमार यांनी केली आहे. नवनिर्वाचित तेलंगणा राज्याध्यक्ष रमाकांत करगतला हे सहकारी पवनाथम, कोनगोला, एल. के. अशोककुमार यांच्यासह परभणीतील रासपच्या विजय निर्धार मेळाव्यास उपस्थित राहिले असल्याची माहिती, यशवंत नायकला राष्ट्रीय संघटक गोविंदराव शूरनर यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची नियुक्ती पक्ष संघटनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. निवडीबद्दल रासपचे संस्थापक सदस्य एस. एल. अक्कीसागर यांनी अभिनंदन केले आहे.

मी सुरवात केल्यास सरकार राहणार नाही; विजय मेळाव्यातून महादेव जानकरांचा इशारा

मी सुरवात केल्यास सरकार राहणार नाही; विजय मेळाव्यातून महादेव जानकरांचा इशारा

परभणी : लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात बोलताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर

रासपच्या विजय निर्धार मेळाव्यास परभणीत तुफान प्रतिसाद

परभणी (११/३/२४) : 'भाजपनं माझ्यासोबत धोका केला, मात्र मी त्यांच्यासोबत इमानदारीने राहिलो. ज्या दिवशी मी धोका देईल, त्या दिवशी यांचे सरकार राहणार नाही. मला मुख्यमंत्री नाही व्हायचं, पाच मिनिटं का होईना, मला पंतप्रधान व्हायचंय असे म्हणत पुन्हा एकदा महादेव जानकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. परभणीत रासपच्या लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते. परभणी शहरातील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. याप्रसंगी रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर बोलत होते. 

लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहिलेला जनसमुदाय.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शूरनर, बाळकृष्ण लेंगरे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर, रासपचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, विलास गाढवे, गणेशराव रोकडे, विष्णू सायगुंडे, परभणी मनपाचे माजी आरोग्य सभापती सचिन देशमुख, किशन भोसले, प्रा. संदीप माटेगावकर, राज्य सचिव ओमप्रकाश चितळकर, राम मरगळ, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्याग बांधवांनी महादेव जानकर यांचे परभणी शहरात स्वागत केले. यावेळी आ. रत्नाकर गुट्टे व अन्य उपस्थीत होते.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नसण्यामुळे पंकजाताई पेक्षा जास्त माझी वाताहत झाली असल्याची खंत रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केली. महाआघाडी आणि महायुती दोन्ही आमच्या संपर्कात आहेत, अजून कोणताही निर्णय झाला नसून, मात्र रासपकडून परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. महादेव जानकर यांनी संपुर्ण कार्यक्रम हा व्यासपीठावर न जाता, खाली कार्यकर्त्यांमध्ये बसुन राहिल्याने कार्यकर्त्याचा उत्साह वाढला. 

परभणी लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर, एस. एल. अक्कीसागर, रत्नाकर गुट्टे यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

महादेव जानकर म्हणाले, माझ्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघ हा देशात ओळखला जाणार आहे. परभणीत वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी आपण प्रयत्न केले होते. राष्ट्रीय समाज पक्षाची देशात सत्ता आल्यास जात, धर्म न पाहता सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे एकसमान शिक्षणाचे धोरण राबविणार. आम्हाला राशन नको हक्काचे शासन पाहिजे. काँग्रेस आणि भाजपचा जातनिहाय जनगणनेस विरोध असून, त्यांना बहुसंख्य राष्ट्रीय समाजाला विकासापासून वंचित ठेवायचे आहे. लोकसंखेच्या प्रमाणात सर्वांना त्यांचा वाटा मिळालाच पाहिजे. 

लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर मंचावर न बसता थेट जनतेत मिसळले.

यावेळी बोलतांना महादेव जानकर यांनी भाजपला लक्ष करत लोकसभेतील जागावाटपावरून इशारा देखील दिला आहे. गोपीनाथ मुंडे हयात असते तर मी आज केंद्रात मंत्री राहिलो असतो. 'महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही' लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती जागा देणार यावर कोणताही निर्णय झाला नसून, यासाठी दिल्लीत बैठका होतांना पाहायल मिळत आहे. अशात मित्रपक्षांना मात्र भाजपकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. महायुतीसोबत राहूनही महायुतीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत. मात्र आम्ही आमचं सक्षम आहोत. कुणी आम्हाला कितीही डावलल तरीही काहीही फरक पडणार नाही. महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही अशा शब्दात महादेव जानकर यांनी ठणकावून सांगितले. भाषणाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांना पैश्यांचा हार घातला. या मेळाव्याला रासपच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे सर यांनी केले तर आभार परभणी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दुगाने यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या विजय निर्धार मेळाव्यास परभणीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सहरसा येथे रासपचा कार्यकर्ता मेळावा

सहरसा येथे रासपचा कार्यकर्ता मेळावा

सहरसा - बिहार (१०/०३/२४) : सहरसा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यालय स्थापन करण्यात आले. यावेळी सहसा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यास बिहार प्रदेशाध्यक्ष गोपाल पाठक, प्रदेश उपाध्यक्ष एस. के यादव, बिहार प्रदेश सचिव डॉक्टर पंकज कुमार, उत्तर बिहार प्रदेश प्रभारी श्री हरिवंश नारायण सिंह, बिहार प्रदेश सचिव राजकुमार महतो, राज्य कार्यकारणी सदस्य सहसा तथा सहरसा जिल्हा प्रभारी अभिनंदन प्रसाद यादव, जिल्हाध्यक्ष दीपक कुमार, मधुबनी जिल्हाध्यक्ष रोहित शर्मा, मधुबनी जिल्हा सचिव गगन झा, लोकसभा अध्यक्ष विजयकुमार झा, जिल्हा सचिव संजय कुमार सिंह, जिल्हाध्यक्ष शंकर साह यांच्यासह पार्टीचे सर्व सदस्य उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुक राष्ट्रीय समाज पक्ष ताकतीने बिहार राज्यात लढवेल असे जाहीर करण्यात आले. हर हर महादेव घरघर महादेव हा नारा देऊन बिहार राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची पाळेमुळे रूजवावित यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीला रासपचा पाठींबा : महादेव जानकर

वेगळ्या विदर्भाच्या मागणीला रासपचा पाठींबा : महादेव जानकर

चंद्रपुर (२१ /२/२४) : विदर्भाचा विकास स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय होणार नाही. राष्ट्रीय समाज पार्टीचा वेगळ्या विदर्भाच्या मागण्याला पाठिंबा आहे, असे प्रतिपादन महादेव जानकर यांनी चंद्रपुर येथे केले आहे. शासकिय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत महादेव जानकर बोलत होते. 

श्री. जानकर पुढे म्हणाले, छोटे राज्य विकासाला पूरक असतात. विदर्भात मोठ्या प्रमाणात कोळसा, पाणी मॅगजीन लोह, चौखडक, डोलामाईट मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती विदर्भात आहे. यातूनच येथे उद्योगधंदे निर्मितीसाठी उद्योगपतींना आकर्षित करता येईल. विदर्भात प्रचंड प्रमाणात रोजगार होईल.

 'राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं जानकर यांनी अभिनंदन केलं. कोर्टात मराठा आरक्षण 100% टिकणार व त्याबाबत तिळमात्र शंका नाही. "भारतात जिथे उमेदवार मिळतील, तिथे राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जागा लोकसभा लढवणार आहे". भाजप सत्तेत येत नव्हते, तेव्हा त्यांना जी दीड दोन टक्के मतांची गरज होती, त्यावेळी आमच्याशी युती करून ते दीड दोन टक्के मते मिळवत त्यांनी सत्ता हस्तगत केली. मात्र नंतर सत्तेची घमंड त्यांच्या डोक्यात शिरली. जो तो त्याचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो, राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात फिरवून जनतेत जाऊन मते आजमावत आहे, आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ओबीसी घटकातील काही जातींना शून्य टक्के आरक्षण आहे. त्यांचे कोण बघणार आहे.? हे ताकदवान आहेत, त्यांचेच ऐकले जाणार असेल तर, लहान गटांचे काय? "जिसकी जितनी संख्या, उसकी उतनी भागीदारी" असायला हवी. त्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मांडली. जातनिहाय जनगणनेशिवाय कोणत्याही समाजाची किती लोकसंख्या आहे हे समजणार नाही. आज राज्यात 52 टक्के ओबिसी समाज राहतो. मात्र 9% देखील आरक्षण त्यांना मिळालेले नाही. हे अपयश सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांचे आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जागा लढविणार : महादेव जानकर

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जागा लढविणार : महादेव जानकर 

नागपूर : पत्रकार परिषदेत रासपची भूमिका मांडताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर बाजूस विदर्भातील रासपचे पदाधिकारी

अमेरिका प्रमाणे ईव्हीएम बंदी करा 

नागपूर (२२/२/२४) : काँग्रेस, भाजप सारखे सर्वच पक्ष लहान पक्षांचा शिडी सारखा वापर करतात, अशी टीका करीत राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची माहिती, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

आ. जानकर म्हणाले, विदर्भात पक्षाचे समर्थन वाढवण्यासाठी दौरा करण्यात येत आहे. मूल, शिंदेवाही, नागभीड, पवनी, चंद्रपूर, भंडारा येथील दौरा आटोपला आहे. यात अनेक ठिकाणी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन, कार्यकर्ता मिळावे घेण्यात आले. 23 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला जाईल. अकोला, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये पक्षाला चांगले बहुमत मिळेल असा विश्वास आहे. सध्या कोणत्याच राजकीय पक्षाकडून निवडणुकीत चांगला वाटा देण्याचा प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याची आम्ही तयारी केली आहे. पक्षाची १७ राज्यात ताकद वाढेल. आमच्या हातात सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज उरणार नाही. नागपूर या उपराजधानीत सर्व प्रकारच्या सोयी - सुविधा उपलब्ध असून, वेगळे विदर्भ राज्य दिल्यास विदर्भाचा विकास होईल. तसेच भारतात अमेरिकेप्रमाणे ईव्हीएम बंदी करण्याची मागणी केली. पत्रकार परिषदेला विदर्भ अध्यक्ष एड. रमेश पिसे, देविदास आगरकर, डॉ. तौसिफ शेख, पुरुषोत्तम कांबळे आदी उपस्थित होते.

सर्वांना सोबत घेऊन मुंबई प्रदेश रासपमय बनवू : यमकर

सर्वांना सोबत घेऊन मुंबई प्रदेश रासपमय बनवू : यमकर

'भांडुप'मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांची बैठक संपन्न 

मुंबई (२०/०२/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनिर्वाचित मुंबई प्रदेश अध्यक्ष विठ्ठल यमकर यांच्या नेतृत्वात भांडुप येथे राष्ट्रीय समाज पक्ष मुंबईतील जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. श्री. यमकर यांची मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्षानी त्यांचे अभिनंदन केले व मुंबई शहर प्रदेशाध्यक्ष यांच्या समवेत एकजुटीने काम करू असा निश्चय केला. 

"पक्ष श्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थितरीत्या पार पाडू. लवकरच मुंबई शहरातील समस्यांना घेऊन मोठे जनआंदोलन उभारून, जनतेचे हित साधण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष कटीबध्द असेल. जुन्या व नव्या पदाधिकारी या सर्वांना सोबत घेऊन, मुंबई प्रदेश रासपमय बनवू, असा विश्वास मुंबई प्रदेश अध्यक्ष विठ्ठल यमकर यांनी व्यक्त केला. श्री. यमकर पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी जानकर साहेब यांच्याप्रमाणे काम करावे. जानकर साहेब कुणासाठी थांबत नाहीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी यांनी मनापासून काम केले तर लवकरच पक्षाला चांगले दिवस येतील. 

यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव जिवाजी लेंगरे, मुंबई प्रदेश महासचिव संतोष ढवळे-धनवीकर, मुंबई उपाध्यक्ष रामधारी पाल, मुंबई उपाध्यक्ष प्रकाश डांगे, मुंबई उत्तर भारतीय आघाडी सचिव इकबाल अन्सारी, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष वसंत कोकरे, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश यादव, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष लल्लन पाल, ईशान्य मुंबई युवा जिल्हाध्यक्ष विजय जयस्वार, उत्तर पश्चिम मुंबई व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष युसुफ कुरेशी, शिवाजीनगर युवा अध्यक्ष आरिफ कुरैशी, ईशान्य मुंबई वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, विश्वास यमकर आदी उपस्थित होते.

कलबुर्गी येथे राष्ट्रीय समाज पक्षात नागरिकांनी केला प्रवेश

कलबुर्गी येथे राष्ट्रीय समाज पक्षात नागरिकांनी केला प्रवेश

कलबुर्गी (१९/२/२४) : राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांची कलबुर्गी पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकीचा आढावा घेण्यात आला. कलबुर्गी, बिदर, रायचूरसह राज्यातील इतर सर्वच लोकसभा मतदारसंघात स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवणार आहे. लोकसभा निवडणूक तयारीसाठी पक्ष पदाधिकारी यांचे मत जाणून घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर होते.



दरम्यान, अंबिका एस. बंडगारा, विजयकुमार बोरगी, लक्ष्मण पट्टादरा, मल्लिकार्जुन ठिकाकर, सायबन्ना अरलगुंडगी, विविध तालुका आघाडी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आज कलबुर्गी शहरातील राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात पक्षात स्वागत करण्यात आले. या बैठकीसाठी राज्य महासचिव शरणबसप्पा दोडमणी, मनुबाई मुक्का, कल्याण कर्नाटक विभाग अध्यक्ष शरणप्पा पुजारी, बी. एम. रावूर, बी. व्ही. कट्टीमणी, मादेवस. दोडमणी, कलबुर्गी जिल्हाध्यक्ष देवेंद्र चिगरअल्ली, श्रीमंत मावनूर, लक्ष्मण पट्टेदरा, रमेश शहाबादा आदी उपस्थित होते.

...तर शिवसेना (उबाठा)व काँग्रेसला विरोध करणार : महादेव जानकर

 ...तर शिवसेना (उबाठा)व काँग्रेसला विरोध करणार : महादेव जानकर 

खामगाव : आमचं लक्ष केवळ दिल्लीची संसद आहे. राज्यात आम्हाला रस नाही. त्यामुळे पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. सध्या एकला चलो रे ची भूमिका असली तरी रा.काँ शरदचंद्र पवार गटाने एक जागा देऊ केली. त्याचा विचार केल्यास इतर जागांवर असलेल्या- शिवसेना (उबाठा), काँग्रेसच्या उमेदवारांसमोर निवडणूक लढवली जाईल, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी सांगितले. खामगाव येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शासकीय विश्रामगृहात पक्ष पदाधिकाऱ्यांनी महादेव जानकर यांचा सत्कार केला. यावेळी जानकर यांनी लोकसभा निवडणूकिबाबत भूमिका मांडली. पक्षासाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. राज्याच्या निवडणुकीचा विचारच करत नाही. दिल्ली काबीज करण्यासाठी आमची वाटचाल आहे. ही निवडणूक लढण्यासाठी अद्याप कोणाशी बोलणी झालेली नाही. महायुती किंवा महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी जागांच्या संदर्भात कोणतीही बोलणी झाली नाही. त्यामुळे आमची एकला चलो रे ही भूमिका आहे. या दौऱ्यात चांगली माणसे मिळत आहेत. त्यामूळे पक्षाचे बळही वाढत आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाने लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले

राष्ट्रीय समाज पक्षाने लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले

माढा लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात बोलताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर बाजूस अन्य पदाधिकारी.

माढा लोकसभा मतदार क्षेत्रात रासपची लढत भाजप बरोबर होणार : महादेव जानकर

फलटण (१७/२/२४) : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची लढत भाजप बरोबर होईल, असा खणखणीत इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी फलटणमध्ये विजय निर्धार सभा घेत पक्षाची भूमिका स्पष्ट करून विरोधकावर निशाण साधला. महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, मेळाव्यासाठी साडे तीन लाख रुपये गोळा झाले. आणि खर्च जेवणासह २ लाख १० हजार रुपये झाला. हाच कार्यक्रम जर भाजप किंवा काँग्रेसला घ्यायचा असता तर १ कोट रुपये खर्च केले असते. मी निवडणुकीत उभा राहिलो आणि 'खासदार झालो तर तुमच्या सोन्याच्या चुली होतील असे काही नाही'. परंतु मला खासदार होणे का गरजेच वाटतंय? हे सांगण्यासाठी आज हा मेळावा घेतला आहे. मी कधीच आमदारकी लढली नाही आणि लढणार देखील नाही. मी झालो तर खासदारच होणार आहे. माझी भूमिका हि मेणबत्ती सारखी आहे. मी जळत राहिलो पण प्रकाश मात्र शेतकऱ्याला मिळत राहील, असे जानकर यांनी म्हटले.

रासप नेते आ.जानकर पुढे म्हणाले की, मी कुठल्या पक्षाचं तिकीट मागायला जाणार नाही, तर तिकीट देणारा मी नेता आहे. या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी देखील केले. ते पुढे जाऊन नेते बनले. परंतु मला सुदैव असं मिळालं कि मला पक्ष बनून मला त्याच पक्षाचा आमदार, खासदार होण्याचं भाग्य मिळाल, हा माझा आणि यशवंतराव यांच्यातील फरक आहे.

आ. जानकर पुढे म्हणाले, आपल्याला आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि कोणत्याही खात्याचे मंत्री होता येतंय, पण कोणत्यातरी पक्षाचा झेंडा घेऊन. पण मी तुमच्या स्वाभिमानावर तुमच्या तना, मनावर पक्षाचा झेंडा तयार केला. तो महात्मा फुले यांच्या गावात तयार केला आणि तो अखेरपर्यंत घेऊन जाण्याचा मी विढा उचललेला आहे. मला माढयातून १ लाख मते दिली. परंतु तुम्ही म्हणाल, मी पंधरा वर्षात काय केलं? कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत हा तुमचा झेंडा देशाच्या गादीपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी मंत्री असताना तीन खाती होती, पण खाती असताना मी १ रुपयांचा भ्रष्टाचार कधी केलेला नाही, हि शपथ घेऊन सांगतो, असे जानकर यांनी यावेळी म्हंटले. आजही मी आझाद पंछी फकीर आहे, फकीर म्हणूनच राहणार. आज मंत्री असतो शेतकऱ्यांचा दुधाला १०० रुपये लीटर दर केला असता.

माढा लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात जनतेत बसलेले महादेव जानकर व उपस्थित जनता.

आ. जानकर पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा झाला नाही तरी, महाराष्ट्र रासपचे नेते काशिनाथ शेवते यांना विचारल्याशिवाय मुख्यमंत्री ठरला जाणार नाही. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाबरोबर न जाता स्वतंत्रपणे लढणार आहे. कार्यकर्त्यांनी आपल्याला कोणीतरी पाठींबा देईल या भ्रमात पडू नये. माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाची भाजप बरोबर लढत होईल. इथले खासदार माझे मित्र आहेत, ते राष्ट्रीय नेते होऊ शकत नाहीत, ते कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्याला मत देणार की, नेत्याला मत देणार हे ठरवा. मला राष्ट्रीय नेता होण्याची संधी द्या. मी तुमचा आहे. पक्ष तुमचा आहे. खटाव - माण, फलटण - कोरेगाव मधून दोन लाखाचे लीड द्या. मागीच्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात त्यांना जिंकून देऊनही भाजपने आमच्याशी कटकारस्थान केले. विधानसभेच्यावेळी आदल्या दिवसापर्यंत माझ्याबरोबर सभा घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पक्षाचा बी फॉर्म ऐवजी भाजपने त्यांचा बी फार्म दोन ठिकाणी दिला. या कपटनीतीचा महादेव जानकर बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. महादेव जानकर यांचे काय मेरिट आहे, हे दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जानकर यांनी दिला. भाजपची काँग्रेस झाली असून, मूळ भाजपचे कार्यकर्ते मला आशिर्वाद देतील. 

राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य कार्यकारणी सदस्य सैय्यदबाबा शेख, राज्य सरचिटणीस तथा नगर दक्षिण लोकसभा मतदार क्षेत्राचे उमेदवार रवींद्र कोठारी, युवा नेते अजित पाटील यांची भाषणे झाली. वाराणसी - काशी येथून पदयात्रेने काही कार्यकर्ते सभास्थळी हजर झाले होते, महाराष्ट्र रासप पक्षाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. मेळाव्यात राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मनोज निगडकर, राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य कार्यकारणी सदस्य बबनदादा विरकर, अश्रूबा कोळेकर, बाळासाहेब कोकरे, प्रदेश उपाध्यक्षा वैशालीताई विरकर, राज्य सरचिटणीस सोमनाथ मोटे, राज्य सचिव जिवाजी लेंगरे, भाऊसाहेब वाघ, राज्य कोषाध्यक्ष सुदामशेठ जरग, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरद दडस, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित सुळ, इंजी. दादासाहेब दोरगे, आप्पासाहेब पुकळे, कोकण महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकूर, पुजाताई घाडगे, निशाताई माने, एड. विलास चव्हाण, खंडेराव जगताप, मुंबई प्रदेश सचिव संतोष ढवळे, रासेफ राज्य महासचिव जयसिंग राजगे, महादेव कुलाळ, एड. संजय माने, विनायक रुपनवर, तुकाराम गावडे, डॉ. बी. के. यादव यांचेसह निरनिराळ्या प्रांतातून पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. श्री. पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक रासपचे फलटण तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण यांनी केले तर आभार निलेश लांडगे यांनी मानले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिखर शिंगणापूर येथील शंभूमहादेवाचे दर्शन घेऊन चारचाकी वाहनांची रॅली काढली. शिंगणापूर- कोथळे- जावली- मिरडे- वडले- सोनवडी- सोनवडी बुद्रुक- कोळकीमार्गे ही रॅली मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होत निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यास मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Friday, April 12, 2024

संपूर्ण राष्ट्रीय विकास व समान भागीदारी हाच राष्ट्रीय समाज पक्षाचा अजेंडा : सिद्धप्पा अक्कीसागर

संपूर्ण राष्ट्रीय विकास व समान भागीदारी हाच राष्ट्रीय समाज पक्षाचा अजेंडा : सिद्धप्पा अक्कीसागर

सिध्दप्पा अक्कीसागर

बेळगावी : राष्ट्र भारती द्वारा  

'संपूर्ण राष्ट्रीय विकास व समान भागीदारी', हाच राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर यांनी बेळगावी येथे पत्रकार परिषदेत केले. कन्नड साहित्य भवन येथे कर्नाटक रासप तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 

राष्ट्रीय विकास होत असताना, राष्ट्रातील सर्व समाजाला समान भागीदारी दिली जात नसल्याचा घणाघात करत, राष्ट्रातील सर्वांना समान भागीदारी हा रासपचा अजेंडा असल्याचे अक्कीसागर यांनी स्पष्ट केले. 2003 साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली. 2004 साली सार्वत्रिक पहिली लोकसभा निवडणुक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात लढवली होती. सत्यशोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्र संघटन ही रासपची त्रिसूत्री आहे. देशात लोकशाहीचा उत्सव होत आहे, राष्ट्रीय समाज पक्षाचे कमी अधिक प्रमाणात देशभर संघटन उभे केले आहे. 2019 ला सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सहा राज्यात लढवली होती. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळ, दिल्ली आदी राज्यात विधानसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाने लढवले आहेत. 

महाराष्ट्रात भाजपप्रणीत एनडीए महायुतीत रासप सहभागी झाले आहेत. परभणी लोकसभा मतदार संघातून रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत आरबीआयच्या कार्यक्रमाला आले असता, त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ महादेव जानकर यांची 18 व्या लोकसभेत वाट पाहत आहे असा संदेश दिला आहे. महाराष्ट्र राज्य बाहेर कर्नाटकात 28 जागावर राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढवण्याचा मानस असून, पाच जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे. चिक्कोडी, बागलकोट, बेळगांव, विजयपुर, रायचूर, कोप्पळ आदी मतदार संघात लढण्याची तयारी झाली आहे. कर्नाटकात काँग्रेस व भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे बोलले जाते. लोकशाही धोक्यात आली असून, नेत्यांना राष्ट्रांशी, जनतेशी, समाजाशी काही देणे घेणे नाही. सर्वसामान्य नागरिकांना या देशाची सत्ता मिळावी, हे रासपचे उद्दिष्ट आहे. कर्नाटकातील जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन करत आहे.

सिद्धप्पा अक्कीसागर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना हिंदी व कन्नड मधून सडेतोड उत्तर देऊन, राष्ट्रीय समाज पक्षाची बाजू भक्कमपणे जनतेसमोर मांडली.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...