राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी नियुक्त्या जाहीर
कळंबोली/ नवी मुंबई : राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांनी रायगड, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, धुळे, जळगाव, वाशीम जिल्हा अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
रायगड जिल्हाध्यक्षपदी पेण येथील विजय उघडे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षपदी चर्चगेट येथील आकाश सरिक, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी बांद्रा पश्चिम येथील आकाश जगताप, धुळे जिल्हाध्यक्षपदी पाडलदे येथील लहू हाके, जळगाव जिल्हाध्यक्षपदी मेहरून येथील ऋषिकेश वाघ, वाशीम जिल्हाध्यक्षपदी असोला जहागीर येथील शरद बर्डे यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर निवडी एक वर्षासाठी असतील. या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment