राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा निवडणुकीवर लक्ष, लोकसभा मतदारसंघ प्रभारी नियुक्त्या जाहीर
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष ५०० जागावर लढवणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिल्लीत जाहीर केले आहे. महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशात लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मिशन लोकसभा ठरवत प्रत्यक्ष बूथ बांधणी यावर रासपने जोर दिला आहे. त्याअनुषंगाने माढा, बारामती, सांगली लोकसभा मतदार संघात रासपच्या प्राथमिक बैठका पार पडल्यात. २२ सप्टेंबर रोजी रासपने लोकसभा प्रभारिंची पहिली नियुक्ती यादी जाहीर केली आहे.
लोकसभा मतदारसंघ प्रभारी व मतदारसंघक्षेत्र पुढीलप्रमाणे
- एड. संजय माने, बबनदादा वीरकर - माढा
- सोमनाथ मोटे, सुनील बंडगर - सोलापूर
- पंडित घोळवे, गिरीधर ठोंबरे - बारामती
- बाळासाहेब कोकरे - पुणे
- भाऊसाहेब वाघ, वैशालीताई विरकर - सातारा
- कालिदास गाढवे, उमाजी चव्हाण - सांगली
- बाळासाहेब बंडगर - हातकणंगले
- संजय वैद्य, विशाल सरगर - कोल्हापूर
- महावीर वाघमोडे - उत्तर मुंबई
- संतोष ढवळे - रायगड
- नितीन कोळेकर - उत्तर पूर्व मुंबई,
- शिवकुमार पाल - उत्तर मध्य मुंबई,
- उमाजी जाधव - दक्षिण मध्य मुंबई,
- जीवन बघेल - दक्षिण मुंबई
- डॉक्टर शिवाजीराव शेंडगे - उस्मानाबाद
- ओमप्रकाश चितळकर - औरंगाबाद
- प्राध्यापक भास्कर टेकाळे - जालना
- दत्ताजी सुरनर - हिंगोली
- दादासाहेब करपे - नांदेड
- ज्ञानेश्वर ताटे - परभणी
- रवींद्र कोठारी - अहमदनगर
- सय्यदबाबा शेख, डॉ. प्रल्हाद पाटील - शिर्डी
- राजाभाऊ पोथारे - नाशिक
- डॉक्टर प्रेमकुमार पळशीकर - रावेर
- शरद बाचकर - जळगाव
- भरतसिंग पाटील - भिवंडी
- रुपेश थोरात - कल्याण
- डॉक्टर अनंत नासणुरकर - नागपूर
- प्राध्यापक रमेश पिसे - रामटेक
- राजेंद्र पाटील - गडचिरोली
- सचिन गुरव, अंकुश देवडकर - शिरूर
- भगवान ढेबे, आप्पासाहेब सुतार - मावळ
- दादासाहेब आखाडे - रत्नागिरी सिंधुदुर्ग
No comments:
Post a Comment