Saturday, September 24, 2022

रासप सैनिकांनो मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा : कुमार सुशील

रासप सैनिकांनो मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा : कुमार सुशील

मुंबई रासप कार्यालयात स्व. हरिओम बाबू यांना अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुक स्वबळावर लढवणार आहे, रासप सैनिकांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी केले. दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय समाज पक्ष' मरीन ड्राइव्ह  कार्यालय येथे मुंबई प्रदेश आढावा बैठकीचे आयोजन केले होते. उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्षाची पाळेमुळे रुजवणारे उत्तर प्रदेश संयोजक स्व. हरीओम बाबूजी यांच्या ४ थ्या स्मृतीदिवसानिमित्त त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

पदाधिकारी आढावा बैठकीत कुमार सुशील म्हणाले, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत २२८ वार्डमध्ये सर्वच उमेदवार उभे करणार आहोत, त्यासाठी पदाधिकारी यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे काम जोमाने केले पाहिजे, किंबहुना आजपासून वार्डनिहाय १ बुथ १० यूथ अशी बांधणी करून, पक्ष घरोघरी पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम करावे लागेल. वार्डअध्यक्षपासून ते जिल्ह्यातील प्रमुखापर्यंत खूप मेहनत करा. पक्षाचे काम तळागाळातील लोकांना दिसेल तेंव्हाच ते आपल्याला मत देतील.  त्यासाठी आपण त्यांची छोटी छोटी कामे केली पाहिजेत, तसेच पक्षातर्फे विविध समाज हिताची कामे  त्या-त्या वार्डात केली पाहिजेत. राजकीय कार्यक्रम राबवले पाहिजेत.  महानगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच प्रयत्नशील राहावे. 'सब समान तो देश महान' यानुसार राष्ट्रनायक महादेव जानकर यांचे हात बळकट करावेत. आपले मुंबई फिल्टर पाडा पवई येथील कै.सिद्धेश्वर सलगर सन २००४ साली राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभेसाठी (आमदार की) साठी उभे राहिले होते. त्यांच्याप्रति श्रद्धांजली वाहिली. 

मुंबई प्रदेशातील आढावा बैठकित ६ जिल्हाअध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील आढावा सांगितला व पुढील येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार असे सर्वांनी मिळून एकमताने ठाम निर्णय घेतला आहे, कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून हर घर कार्यकर्ता, हर घर रासप याप्रमाणे काम करून पक्षाचा काम सामान्यातील असामान्य लोकांपर्यंत पक्ष पोहोचविण्यासाठी सदस्य जोडो अभियान उभारणार, अशी भूमिका सर्व मुंबईतील पदाधिकारी यांनी एकमुखी घेतली आहे. 

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे मुंबई प्रदेश राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य सचिव जिवाजी लेंगरे, मुंबई रासप युवा सचिव विठ्ठल यमगर, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष जिवन बघेल, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष- सुरेश एडगे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष ललन पाल, ईशान्य मुंबई जिल्हा निरीक्षक नितिन कोळेकर, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रकाश डांगे, उत्तर मध्य मुंबई जिल्हाअध्यक्ष संजय कोलापटे, उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष कोंडीबा पिंगळे, उत्तर पश्चिम मुंबई लक्ष्मण कांबळे, उत्तर मुंबई निरीक्षक महावीर वाघमोडे, उत्तर मुंबई जिल्हा शहर अध्यक्ष भीमराव लवटे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष स्वप्नील ठावरे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रामधारी पाल, कांदिवली महासचिव प्रकाश बोर्ले, मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा महिला आघाडी अध्यक्ष जयश्री केंगार, मानखुर्द शिवाजी नगर, विधानसभा प्रभारी नवनाथ सूर्यवंशी, डॉ. दिलिप पाल, गुलाब पाल, चारकोप, लालचंद पाल  आदी उपस्थित होते.

1 comment:

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...