शिक्षणाचे बाजारीकरण झालय ..? : शरद दडस
शिक्षक दीन कार्यक्रमात बोलताना रासपचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरद दडस, फुले पीठावर भगवान ढेबे, दीपांकी जाधव, कुंभार सर, दत्ता अनुसे सर व अन्य. |
रासप कळंबोली शहर शाखेतर्फे शिक्षक दीन साजरा
कळंबोली : डी. एस. म्हात्रे
आज सर्वत्र शिक्षण व्यवस्था पहिली तर शिक्षणाचे बाजारीकरण झालेय. शिक्षणसम्राटांनी बाजारीकरण केलेले आहे, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांनी हल्लाबोल केला. श्री. दडस कळंबोली रासप शहर शाखेतर्फे आयोजित शिक्षक दीन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी महत्मा फुले पीठावर रासपचे राज्य कार्यकारणी सदस्य श्री भगवान ढेबे, पनवेल तालुका महिला आघाडी अध्यक्षा दिपांकी जाधव, कळंबोली शहर अध्यक्ष आण्णासाहेब वावरे, शहर संघटक पवनकुमार काळे, शहाजी शिंदे, शहर सचिव देवानंद मोटे, मच्छिद्र मोरे, शशिकांत मोरे, सुधाकर गोयकर, शिवाजी खटके, सिध्दीकी कुरेशी, ऋषिकेश जरग, दत्ता अनुसे सर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
श्री. दडस पुढे म्हणाले, रासपच्या मंचावर बोलण्याचं धाडस शिक्षकांमुळे आहे, शिक्षकांनी घडवले म्हणून येथे बोलण्याचा धाडस करतोय. शिक्षण सम्राटांनी बाजारीकरण केलेले आहे. बाजारीकरणामुळे विद्यार्थी, पालक व तटपुंज्या मानधनात काम करणारे शिक्षक त्रासलेले आहेत. कोरोना महामारीच्या काळात खाजगी - सरकारी शिक्षण संस्था बंद होत्या, पण लाखो रुपये फी वसुली केली, पण कोणीही एक रूपया विद्यार्थ्यांसाठी कमी केलेला नाही, पण तिथेच काम करणारे शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले, काहीना अर्धा पगार देण्यात आला. व्यवस्थेने जरी शिक्षणाचे बाजारीकरणाचा धंदा चालू केला असला तरी, विद्यार्थी पालक शिक्षकांच्या हितासाठी रासपची विद्यार्थि आघाडी हे खपवून घेणार नाही. ग्रामीण भागात बारावी पर्यंतच्या मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास प्रवासाची योजना होती, परंतु एसटी कोरोना काळात बंद होत्या. शिक्षणात खंड पडल्यामुळे शिकायचं वय असूनदेखील मुलींना शिकता आले नाही, त्यांची लग्न लावून देण्यात आले याला जबाबदार कोण ? असा सवाल राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थ्या आघाडी प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांनी केला. पुढील उच्च शिक्षण करण्यासाठी शैक्षणिक कागदपत्र हे शिक्षणातले अडथळे ठरत आहेत का, असे आम्हाला शंका येतेे. वेगवेगळ्या महसूल यंत्रणांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे कागदपत्र उपलब्ध करून दिली पाहिजेत. राष्ट्र बळकट करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाला ताकद देण्याचे काम विद्यार्थी आघाडी करेल. माथाडी कामगारांच्या मुलांनी उच्चस्तरीय अधिकारी झाले पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची इच्छा आहेे. विद्यार्थ्यांचा जोपर्यंत स्वाभिमान जागा करत नाही, तोपर्यंत मनात क्रांती होत नाही, तोपर्यंत कोणत्या प्रकारची क्रांति होत नाही. विद्यार्थ्यांच्या कोणत्याही न्याय हक्कावर गदा येत असेल तर त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी खंबीरपणे लढल्याशिवाय राहणार नाही.
राजकीय पक्षाकडून आंदोलन राजकीय मोर्चे राजकीय सभा असे कार्यक्रम केले जातात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे फंडे वापरले जातात सहसा कोणीही कोणताही पक्ष विद्यार्थ्यांसाठी फार काही करताना दिसत नाही परंतु राष्ट्रीय समाज पक्ष कळंबोली शहर शाखेतर्फे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला. याबद्दल येथील कार्यकारणीस धन्यवाद.
No comments:
Post a Comment