Wednesday, September 21, 2022

काँग्रेस भाजपने जे केले नाही ते काम राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण करेल : महादेव जानकर

काँग्रेस भाजपने जे केले नाही ते काम राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण करेल : महादेव जानकर

वर्धापन दिन सोहळ्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, एस एल अक्कीसागर यांना पुष्पहार घालून भव्य दिव्य स्वागत करताना दिलीपसिंह गोहिल, संदीप गढवी, प्रकाश पटेल, सुशील शर्मा, किर्णसिंह सोलंकी.

संस्कारनगरी वडोदरा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापनदिवस धूमधडाक्यात साजरा

वडोदरा/ गुजरात : आबासो पुकळे

काँग्रेस भाजपने जे काम केले नाही ते काम राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण करणार आहे. त्यांच्यापासून शिल्लक राहिलेले सर्व काम राष्ट्रीय समाज पार्टी पूर्ण करेल. आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, महागाई या प्रमुख मुद्द्यावर लढू. गुजरातचा विकास झाल्याचा गळा काढला जातो, परंतु येथील पंतप्रधान असूनही म्हणावा, तितका विकास झालेला नाही. विकासाची सर्वात भारी ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे आहे, गुजरातच्या जनतेने आम्हाला सत्ता द्यावी असे आवाहन महादेव जानकर यांनी केले.

दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापन दिवस वडोदरा येथील दीनदयाळ उपाध्याय हॉल येथे साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रीय कार्यकारणीच्या प्रमुख उपस्थितीत धूमधडाक्यात वर्धापन दिवस पार पडला.

वर्धापन दिनानिमित्त महादेव जानकर मार्गदर्शन करताना म्हणाले, आज १९ वर्षाचा राष्ट्रीय समाज पक्ष झाला. वेगवेगळ्या राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिवस साजरा केला जातो. गोहिल बापूनी गुजरातला वर्धापन दिवस साजरा करायचा असे म्हंटले. आज येथे सण असल्यामुळे गर्दी कमी असली तरी रॅलीस चांगला प्रतिसाद मिळाला. १९ वर्षापूर्वी सुरवात केली होती, त्यावेळेस चार पाच लोक होते. अक्कीसागर साहेब सारखी निवडक माणसे सोबत होती. कारवा बनत गेला. आज कमीत कमी १८ राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष चांगल्या प्रकारे काम करत आहे. महाराष्ट्र, गुजरात, आसाम राज्यात विजय मिळवला. सरपंच, नगरसेवक, सभापती, जिल्हा/तालुका पंचायत आमदार पर्यंत जिंकले. संसद सदस्य जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत आमचे विजयाचे चक्र पूर्ण होणार नाही. कॅबिनेटमंत्री बनलो असलो तरी, अजून संसद सदस्य बनलो नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्येविरुद्ध अत्यलप मताने पराभव झाला. पुढच्यावेळेस रासपातून खासदार होईनच, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

श्री. जानकर पुढे म्हणाले, राज्यातील जिल्हा, तालुका, गावपातळीवर संघटन बनवावे. माहोल तयार होतो पण संघटनात्मक नसेल तर माहोल बिघडतो. कामगार, युवक, शेतकरी, महिलांचे संघटन उभा करा. ५०% महिलांना पक्षात स्थान द्या. जोशी साहेब आणि मी चर्चा करत होतो. ते लेबर पार्टी चालवतात. थोडासा प्रेशर केला तर ते रासपात येतील. रासपचे मार्गदर्शक होतील. 

२० वर्षापूर्वी काँग्रेसचा माहोल होता, काँग्रेसने दगड उभा केला तर तो जिंकला जायचा. पण आता लोक म्हणतात, काँग्रेस नजरेस पडत नाही. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत भाजप आहे. घाबरू नका, भाजपचे जास्त दिवस चालणार नाही. ज्या दिवशी आमची एन्ट्री होईल त्या दिवशी ते संपतील, असा दावा श्री. जानकर यांनी केल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट करून जनेतेतून स्वागत केले. महाराष्ट्रात भाजप नव्हती, आम्ही भाजप सोबत युती केली, भाजप सत्तेत आली. आम्ही ज्याच्यासोबत राहतो ते पावरफुल बनतात. आपल्याला गुजरातमध्ये ही आपली ताकद वाढवावी लागेल. इथे संजय वाघमोडे, सपकाळ सारखे जुने कार्यकर्ते आहेत. नलिनी मेहता, संजय वाघमोडे यांनी चांगलं काम केलं, पण मधल्या काळात माझ्यावर राग ठेवून राष्ट्रवादीत गेले. आता तुम्ही काही दिवस कार्यकर्ता म्हणून काम करा, नंतर तुम्हाला पक्षात चांगले फळ मिळेल. नवीन पदाधिकारी यांनी जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे. तर तुम्हाला चांगले दिवस येतील. वडोदऱ्यात आमचे नगरसेवक जिंकले. कर्जन पालिकेत, पादरा पालिकेत रासपचे नगरसेवक आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाने आतापर्यंत चार आमदार जिंकले. आता मी एमएलसी आहे. एस एल अक्किसागर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष असताना, त्यांनी मला ए बी फार्म दिला होता. आम्ही भीक मागणारे नाही तर देणारे आहोत. तुम्ही म्हणाल वीज मोफत देत आहेत. ही मोफतची भाषा सोडून द्या, आपण स्वतः खरेदी करू इतके सक्षम बना. तुम्ही देणारे कोण आहे ? बोलतील वीज मोफत, शिक्षण मोफत, राशन मोफत पाहिजे आणि तुम्ही आमच्यावर राज्य करा आणि आम्हाला मोफतची भाषा करा, हे आता बंद करा. आम्ही इतके सक्षम बनू, आम्हाला मोफत राशन नको तर प्रधानमंत्र्याची खुर्ची पाहिजे, याचा विचार करून पुढे चालले पाहिजे. मोफत ची भाषा करून ते राज्य करत आहेत आणि आपल्याला उल्लू बनवत आहे. देशाला पुढे घेऊन जात आहे. आमचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील म्हणाले, गरीबीत गुजरात २५व्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये पाच आमदार रासपाचे आले तर गुजरातचा मुख्यमंत्री कोणाला करायचं हे गढवी साहेबांनी गोहील साहेब ठरवतील. हे सर्व तुमच्या हातात राहील. माझी आपल्याला विनंती आहे महिन्यातून चार वेळा गुजरात मध्ये येईन. आजच्यासारखी रॅली सुरत आमदाबाद, कच्छ येथे ठेवावी. सकाळी येईल आणि संध्याकाळी विमानाने परत जाईल किंवा कसेही जाईल. मी येण्याचा प्रयत्न करेन. गुजरात राज्य कार्यकारणीस सांगू इच्छितो, पक्षाचे सभासद वाढवा. पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्या तयार करा. प्रत्येक माणसाला राजकीय ताकद द्या. भाजपमध्ये एका घरात पाच संघटन असतात. महिला मोर्चा, कामगार मोर्चा सारखे अनेक विंग आहेत मात्र दोघेच मालक आहेत, मोदी आणि अमित शहा बाकी कोणी नाही, आपण बघितले असेल. 

माझा तुम्हाला प्रश्न आहे, धर्माचे नावाने भांडण लावून, कोणताही फायदा होणार नाही. मुसलमान चुकीचे नाहीत. दलित चुकीचे नाहीत, राज्य करणारे चुकीचे आहेत. राजकारण करणारे चुकीचे आहेत. भांडण आपली लावतात. सर्वसामान्यांचे आयुष्य संपते आणि ते राजकीय सत्ता मिळते. Deligation केले पाहिजे. बांधवांनो, Deotion झालं पाहिजे आणि Determination झालं पाहिजे. माझी सर्वसामान्याना विनंती आहे, आम्ही नेता बनलेलो आहे, आपण स्वतःला विकू नका. जोपर्यंत तुम्ही स्वतःला विकणार, तोपर्यंत तुम्ही विकले जाणार. मंत्री, आमदार खासदार विकले जाणार. निवडणुकीच्या काळात दारू, बाटली, गांधी नोटांच्या पैशावर मत देणार, यामुळे सगळीकडे सत्यानाश झालेला आहे. आता भाजप जवळ खूप पैसे आहेत. त्यांच्याकडे मंदिराचा पैसा, उद्योगपतींचा पैसा, सगळीकडचा पैसा येत आहे. आपण बघितला असेल, महाराष्ट्राचे काय हाल झाले, आपण बघताय दिल्लीची अवस्था काय झाली, गो अवस्था काय झाली. जेव्हा न विकणारा समाज निर्माण होईल, तेव्हा न विकणारा नेता पैदा होईल. माझी तुम्हाला विनंती आहे, आपण स्वतःला विकू नका. याचा विचार करा. माझे वडील हिंदू आहेत. हिंदू असूनही आम्हाला भागीदारी का मिळत नाही, हा प्रश्न आहे? मी मंत्री असताना दुधाला पाच रुपये दर वाढवायचा निर्णय घेतला, त्यावेळेस आयएएस अधिकारी म्हणाला, साहेब असं होत नसतं, आपल्याला निर्णय घेता येत नाही, मुख्यमंत्र्यांनाही घेता येत नाही, मग मी त्यांना म्हनालो, मग कोण निर्णय घेतो. तुम्ही माझी बॅग वागवणारी लोक आम्हाला सांगणार. आम्ही भारतावर राज्य करणारे लोक आहोत. थोडे दिवस मी अभ्यास केला आणि आयएएस अधिकाऱ्यांना पदच्युत करण्याची धमकी देऊन, दुधाला लिटरला ५ रुपयेने दर वाढवला. एकाचवेळी लिटरला पाच रुपये दर वाढवणारा भारतातला पहिला मंत्री महादेव जानकर आहे. आयएएस अधिकारी राज्य करतात हे मला माहीत होतं. राजकारण करतात. आयएएस अधिकारी मंत्री बिंत्रीना किंमत देत नाहीत. 

तुम्हाला विनंती आहे, तीन मुलं जन्माला घाला. एकाला आयएस आयपीएस अधिकारी करा तर एकाला आमदार, खासदार करा आणि एकाला उद्योजक करा. किती पैकी काहीतरी बना. तुम्ही शिकले सवरलेले लोक आहात. बुध्दीजिवी लोक आहे. पत्रकार आहेत, राजकारण घाण आहे. आम्ही राजकारणात येणार नाही. राजकारण वाईट आहे असे सांगतात आणि वाईट लोक राजकरण करतात. भाजपला आपण मोठे केला.

काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपसोबत युती केली आहे. पण माझ तूम्हाला आवाहन आहे, देशाच्या हितासाठी भाजपलाही रोखले पाहिजे. चांगल्या दुधात विष बनणारे भाजप पार्टी आहे. त्यानाही थोडं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही आपणास विनंती आहे. आम्हाला गुजरात राज्यात राज्य करण्यासाठी कमीतकमी संधी तर द्या, आम्ही काय करतो ते तर बघा. पुढच्या वेळेस आम्हाला मत देऊ नका. आमच्या आमदाराने चुकीचे केले तर सोडून द्या, दुसऱ्या पार्टीला सत्ता द्या, पण एकवेळा आम्हाला संधी द्या. आम्हाला सत्तेत बसवण्याचा प्रयत्न करा. गुजरातच्या भूमीने माझ्यावर प्रेम केले आहे. आम्हाला मताच्या संख्येनुसार राष्ट्रीय मान्यता मिळाली नसली तरी गुजरात, महाराष्ट्र राज्यात टेक्निकल मान्यता मिळाली आहे. आम्ही गुजरातची कमान दिलीप सिंह गोहिल यांच्यावर सोपवली आहे. सर्वांनी मिळून काम केल्यास पक्षाला चांगले दिवस येतील. कमीत कमी गुजरात राज्यात कींगमेकर बनाल. दीनदयाळ उपाध्याय सभागृहात कार्यक्रम ठेवला चांगलं झालं. संख्या कमी जास्त होत राहते. ज्यावेळेस मोठी क्रांती होते, त्यावेळीस सुरवातीला चार-पाच लोक असतात. राष्ट्रीय समाज पक्षास साथ, वोट, नोट, मदत देण्याचे मी आवहान करतो. गोहिल बापूंनी रोड शो रॅली काढली. कार्यक्रम यशस्वी केलात. त्याबद्दल धन्यवाद देतो. जय गुजरात जय भारत!

महादेव जानकर यांच्यासारखे नेतृत्व देशात नाही : एस एल अक्कीसागर 

वर्धापनदिन प्रसंगी बोलताना एस एल अक्किसागर

एस एल अक्किसागर यांनी विचार मांडताना बोलत होते, येथे उपस्थित असलेले राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य आणि ज्यांनी शानदार कार्यक्रम आयोजित केला असे दिलीप सिंह गोहेल बापू आपणास शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. राष्ट्रीय समाज पक्षास 19 वर्षे झाली. पक्षाचा प्रवास, पक्षाची सुरुवात खूप कठीण परिस्थितीतून झाली. आमचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी सांगितले, राष्ट्र नायक महादेव जानकर यांचा जन्म जंगलात झाला, त्यांनी एक स्वप्न पाहिलं. ते स्वप्न होतं, मी भारतावर राज्य करीन. भारताचा पंतप्रधान होईन. मी त्यांच्यासोबत तेव्हापासून आहे, जेव्हा त्यांनी हे स्वप्न जाहीर केलं होतं. त्यावेळेस काहीही नव्हतं, ऋण शून्य होते. परंतु चालत राहिले, पुढे एक दिवस MLC बनले, एक MLA जिंकून आणला. पुन्हा MLC बनले. कॅबिनेटमंत्री बनले. मी जास्त बोलणार नाही, आज पक्षाचा वर्धापनदिन आहे. गोहिल बापूंनी पत्रकावर लीहलेले आहे, राष्ट्रीय समाज पार्टीचे 19 सफल वर्ष. आज महादेव जानकर यांनी एक दिवस भारताचा पंतप्रधान बनेल, हे शाबीत केले आहे. सांगू इच्छितो, चार पाच दिवसांपूर्वी गुलबर्गा- कर्नाटक येथे होतो. १७ राज्यात पक्ष पोहचला आहे. १३ राज्यात संघटन काम करत आहे. ५ राज्यात ताकद बनली आहे. 

मी आपणा सर्वांना आणि गोहिल यांना विश्वास देऊ इच्छितो, आमच्याजवळ असा महादेव जानकर एक ध्येयवादी धडाडीचा नेता आहे, ज्यांनी ध्येयासाठी स्वतःच जीवन समर्पित केले आहे. आपण सर्वजण गोहिल यांना बापू बोलत आहात, ते गुजरात नायक जरूर बनतील. वडोदरा भूमी महाराजा सयाजीरावची धरती आहे. पाच वर्षांपूर्वी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची एन्ट्री झाली. ९ नगरसेवक निवडून आले. गोहिल यांनी पहिल्याच प्रयत्नात शतक मारले. असेच चांगले काम केले तर लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री बनाल. मुख्यमंत्रीपदाची माळ तुम्हाला घालन्याची संधी मिळेल. महादेव जानकर यांच्यासारखे नेतृत्व देशात नाही. राष्ट्रीय समाज पक्षात दोन शब्द आहेत 'राष्ट्र आहेआणि समाज आहे' राष्ट्र आणि समाज मिळून पार्टी बनली. १५ ऑगस्ट स्वतंत्र झाले. ७५ वर्ष झाले. पण हे स्वातंत्र्य हस्तांतरण आहे. म्हणजे गोरे इंग्रज गेले आणि काळे आले. भारतात आजही विषमता का आहे. एक आदिवासी कोसो दूर जंगलात आहे आणि श्रीमंत माणूस खूप उंचीवर आहे. राष्ट्रीय समाज पक्ष या देशातली विषमता संपवू पाहत आहे. भारत जरूर स्वतंत्र झाला परंतु प्रजासत्ताक नाही बनला. प्रजासत्ताकचा अर्थ प्रजेच्या नागरिकाच्या हातात सत्ता, या देशातल्या प्रत्येकाला राजा बनायला पाहिजे. राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोहिल बापू साथ देतील, असा विश्वास व्यक्त करतो.

रासप शिवाय गुजरातमध्ये सरकार स्थापन करता येणार नाही : दिलीपसिंह गोहिल

राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. दिलीप सिंह गोहिल यांचा अभिनंदन आणि सत्कार करताना  राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी.

रासप गुजरात प्रदेश अध्यक्ष दिलीपसिंह गोहिल बापू म्हणाले, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 182 जागांची तयारी करत आहोत. काँग्रेस भाजप पेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाची पूर्ण राजनीती वेगळी आहे. राष्ट्रीय समाज पक्षाशिवाय गुजरातचे सरकार स्थापन करता येणार नाही, यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू. जिसकी जितनी संख्या भारी, उनकी उतनी भागीदारी या प्रमुख मुद्द्यावर 182 मतदारसंघात आम्ही लढू. आज वडोदरा महानगरात महादेव जानकर दादा आलेत, गुजरात विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होईल, असा विश्वास वाटतो. 

वर्धापनदिन कार्यक्रमासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर विमानाने वडोदरा येथे दाखल झाले. विमानतळावरून त्यांचे वाजत गाजत जंगी स्वागत केले. कार्यक्रमस्थळी जाताना दुचाकी चारचाकी गाडीसह धूमधडाक्यात रॅली काढण्यात आली. महादेव जानकर यांनी ओपन जीपमधून रोड शो द्वारे गुजरात जनतेस अभिवादन केले. रॅलीने वडोदरावासियांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान गुजरात राज्य अध्यक्षपदी दीलीपसिंह गोहिल यांच्या नावाची घोषणा केली, त्यांना राष्ट्रीय महासचिव तथा राष्ट्रीय गुजरात प्रभारी प्रसन्नाकुमार यांनी नियुक्तीपत्र दिले. वर्धापनदिन कार्यक्रमात राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. सयाजीराजे पिठावर राष्ट्रीय महासचिव प्रसन्नाकुमार, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, पंडित घोळवे, राष्ट्रीय खजिनदार मोहनराव माने, गुजरात राज्य प्रभारी सुशील शर्मा, यवा अध्यक्ष महेंद्र राठोड, नेमसिंह बघेल, सदाशिव पाल, वडोदरा जिल्हाध्यक्ष सुजितसिंह गिल, गुजरात संघटक किरनसिंह सोलंकी, महासचिव संदीप गढवी, वडोदरा शहर अध्यक्ष प्रकाश पटेल, दादासाहेब कोडलकर, सुनील पाल टाइगर मिर्जापुर, दक्षाबेन बिस्ट आदी मान्यवर उपस्थित होते. दिलीपसिंह गोहिल यांनी उत्कृष्ट नियोजन व राष्ट्रीय कार्यकारणीसह सर्वाचे आदरातिथ्य जोरदार केले.

 वडोदरा वर्धापन दिन क्षणचित्रे >>

नवनिर्वाचित गुजरात अध्यक्ष दिलीपसिंह गोहिल यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना राष्ट्रनायक महादेव जानकर

वडोदरा रोड शो द्वारे गुजरातच्या जनतेस अभिवादन करताना राष्ट्रनायक महादेव जानकर, सोबत दिलीपसिंह बापू गोहिल

विश्रामगृह येथून कार्यक्रमस्थळाकडे रवाना होताना, राष्ट्रनायक महादेव जानकर सोबत एस. एल अक्किसागर, दिलीपसिंह गोहिल

कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करताना महादेव जानकर, एस एल अक्किसागर, के प्रसन्नकुमार, गोविंदराव शुरणार, बाळकृष्ण लेंगरे

वर्धापनदिन प्रसंगी बोलताना राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे

राष्ट्रीय खजिनदार मोहनराव माने यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहिल

दादा कोडलकर यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहिल

राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांचा सत्कार करताना दिलिपसिंह गोहिल

वडोदरा शहरात रॅलीप्रसंगी रासप पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक





राष्ट्रीय महासचिव तथा गुजरात राष्ट्रीय प्रभारी के प्रसन्न कुमार यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहिल

वर्धापनदिन प्रसंगी हात उंचावून जनतेस अभिवादन करताना एस एल अक्किसागर व गुजरात राज्य पदाधिकारी

वर्धापनदिन प्रसंगी उपस्थित राहिलेले गुजरात मधील रासपप्रेमी

राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहील

माध्यम प्रतिनिधी आबासो पुकळे यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहिल

वडोदरा विमानतळ येथे राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या आगमन प्रसंगी रासप पदाधिकारी

महाराजा सयाजीराव यांच्या कर्मभूमीत राष्ट्रनायक महादेव जानकर यांचे आगमन

हॉटेल एप्पल ग्रँड येथे चर्चा करताना एस एल अक्किसागर, के प्रसन्नाकुमार

गुजरात पाल महासभेचे अध्यक्ष सदाशिव बघेल यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहिल


4 comments:

  1. Good job 👍👏👏👏 you

    ReplyDelete
  2. राष्ट्रीय समाज पक्ष जिंदाबाद,माननीय - राष्ट्र नायक श्री महादेव जानकार साहब जिंदाबाद!

    ReplyDelete
  3. अभिनंदन pukale साहेब जय रासप जय भारत 💐💐💐💐💐

    ReplyDelete
  4. Congratulations Pukale sir🌹🌹🌹🌹👌👌👍👍👍👍👍

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...