मला सर्व समाजाला सोबत घेऊन जायचे आहे : महादेव जानकर
हैदराबाद (तेलंगणा) : V 5 News Telugu या स्थानिक वृत्त वाहिनिशी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, तेलंगणात कुरुमा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन उभे केले तर राष्ट्रीय समाज पक्ष पाठिंबा देईल, परंतु मला सर्व समाजाला सोबत घेऊन जायचे आहे. राष्ट्रीय समाज पक्ष सर्व समाजाची पार्टी आहे. कुरमा, कुरवा, भटक्या ओबीसी समाजाला विनंती आहे, दुसऱ्याच्या महालात राहण्यापेक्षा स्वत:च्या झोपडीत राहावे, कारण महालात कधीही हटवले जाऊ शकते. झोपडीतून कुणीही हटवू शकत नाही म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष आपली झोपडी आहे. आरक्षणामुळे संधी मिळते.
No comments:
Post a Comment