Wednesday, September 28, 2022

करंबेळीतील्या वस्तिवरची हाक ऐकताय ना ??

 करंबेळी

ग्रुप ग्रामपंचायत गांगवली, तालुका माणगाव , जि. रायगड. गेल्या अनेक पिढ्या ही अवस्था आहे. अनेकदा याच नदीच्या पाण्याने गायी, म्हैशी, बैल, रेडे व शेळ्या-मेंढ्या वाहून गेल्या व जात आहेत. १८/८/२०११ रोजी यांचे वडील देखील याच नदीच्या पाण्यात वाहून गेले आहेत.









Monday, September 26, 2022

राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा निवडणुकीवर लक्ष, लोकसभा प्रभारी नियुक्त्या जाहीर

राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा निवडणुकीवर लक्ष, लोकसभा मतदारसंघ प्रभारी नियुक्त्या जाहीर

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष ५०० जागावर लढवणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिल्लीत जाहीर केले आहे. महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशात लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.  मिशन लोकसभा ठरवत प्रत्यक्ष बूथ बांधणी यावर रासपने जोर दिला आहे. त्याअनुषंगाने माढा, बारामती, सांगली लोकसभा मतदार संघात रासपच्या प्राथमिक बैठका पार पडल्यात. २२ सप्टेंबर रोजी रासपने लोकसभा प्रभारिंची पहिली नियुक्ती यादी जाहीर केली आहे. 

लोकसभा मतदारसंघ प्रभारी व मतदारसंघक्षेत्र पुढीलप्रमाणे 

  • एड. संजय माने, बबनदादा वीरकर - माढा 
  • सोमनाथ मोटे, सुनील बंडगर - सोलापूर 
  • पंडित घोळवे, गिरीधर ठोंबरे - बारामती 
  • बाळासाहेब कोकरे - पुणे 
  • भाऊसाहेब वाघ, वैशालीताई विरकर - सातारा 
  • कालिदास गाढवे, उमाजी चव्हाण - सांगली 
  • बाळासाहेब बंडगर - हातकणंगले 
  • संजय वैद्य, विशाल सरगर - कोल्हापूर 
  • महावीर वाघमोडे - उत्तर मुंबई 
  • संतोष ढवळे - रायगड 
  • नितीन कोळेकर - उत्तर पूर्व मुंबई, 
  • शिवकुमार पाल - उत्तर मध्य मुंबई, 
  • उमाजी जाधव - दक्षिण मध्य मुंबई, 
  • जीवन बघेल - दक्षिण मुंबई 
  • डॉक्टर शिवाजीराव शेंडगे - उस्मानाबाद 
  • ओमप्रकाश चितळकर - औरंगाबाद 
  • प्राध्यापक भास्कर टेकाळे - जालना 
  • दत्ताजी सुरनर - हिंगोली 
  • दादासाहेब करपे - नांदेड 
  • ज्ञानेश्वर ताटे - परभणी 
  • रवींद्र कोठारी - अहमदनगर
  • सय्यदबाबा शेख, डॉ. प्रल्हाद पाटील - शिर्डी
  • राजाभाऊ पोथारे - नाशिक
  • डॉक्टर प्रेमकुमार पळशीकर - रावेर 
  • शरद बाचकर - जळगाव
  • भरतसिंग पाटील - भिवंडी 
  • रुपेश थोरात - कल्याण
  • डॉक्टर अनंत नासणुरकर - नागपूर 
  • प्राध्यापक रमेश पिसे - रामटेक 
  • राजेंद्र पाटील - गडचिरोली 
  • सचिन गुरव, अंकुश देवडकर - शिरूर 
  • भगवान ढेबे, आप्पासाहेब सुतार - मावळ 
  • दादासाहेब आखाडे - रत्नागिरी सिंधुदुर्ग

राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी नियुक्त्या जाहीर

राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी  नियुक्त्या जाहीर

कळंबोली/ नवी मुंबई : राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांनी रायगड, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, धुळे, जळगाव, वाशीम जिल्हा अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. 

रायगड जिल्हाध्यक्षपदी पेण येथील विजय उघडे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षपदी चर्चगेट येथील आकाश सरिक, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी बांद्रा पश्चिम येथील आकाश जगताप, धुळे जिल्हाध्यक्षपदी पाडलदे येथील लहू हाके, जळगाव जिल्हाध्यक्षपदी मेहरून येथील ऋषिकेश वाघ, वाशीम जिल्हाध्यक्षपदी असोला जहागीर येथील शरद बर्डे यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर निवडी एक वर्षासाठी असतील.   या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी अभिनंदन केले आहे.

अट्टल देवऋषी ते अंधश्रद्धा विरोधी : जगूबाबा गोरड

अट्टल देवऋषी ते अंधश्रद्धा विरोधी : जगूबाबा गोरड 

जगु बाबा गोरड पूर्वा आयुष्यातील एक बाबा.बुवाबाजी करणारा प्रसिद्ध बुवा. छान छोकीत राहणारा. बुवाबाजी करण्यासाठी भक्ताच्या खर्चातून विमानातून प्रवास करणारा. भक्तांच्या वर प्रभाव पाडण्यासाठी अफलातून चमत्कार करणारा. म्हणजेच स्मशानात लोकांना गोळा करून जळती ज्योत या झाडावरून त्या झाडावर स्वतःच्या दैवी मंत्रशक्तीने पळवायला लावणारा. जगू बाबा यांच्या अंगात देवी शक्ती असल्याने बाबाचा दरारा इतका की कोंबडीचं अंड पण बाबाच्या आदेशाने हवेत उडतात उडू लागत. अशा जगू बाबाची गाठ एकदा पडली ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत. चमत्कार झूट असतात, असे सांगणारे डॉ नरेंद्र दाभोळकर पण जगू बाबाचे चमत्कार बघून आश्चर्यचकित झाले. पण डॉ दाभोलकर पण कसलेले खेळाडू होते. शेवटी त्यांनी जगूबाबाचा भांडाफोड करून, जगू बाबाला लोळवलंच. खरंतर डॉ नरेंद्र दाभोलकर म्हणजे विवेकी विचारांचा परिसस्पर्शचं. ज्यांना ज्यांना या परिसाचा स्पर्श झाला. त्यांच्या त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. आयुष्याला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला.जगू बाबाचं पण झालं तसंच. दोन-चार चर्चेमध्येच जगू बाबा डॉक्टर दाभोलकर यांच्या प्रेमातच पडला. आणि या जगू बाबा गोरडचा, बुवाबाजी करणारा जगू बाबा चा, आता अंनिस चा सक्रिय कार्यकर्ता मध्ये रूपांतर झाले. आणि महाराष्ट्रभर आणि बुवा बाबांचे भांडाभोड करून, बहारदार असे चमत्कार करून अंनिसचा विचार तळागाळापर्यंत नेला. जगू बाबा करीत चमत्कार बघून लोक आश्चर्यचकित व्हायचे. पण नंतर जगू बाबा त्याचे शास्त्रीय कारणे सांगितल्यानंतर लोकांना हातोहात फसले असल्याची जाणीव व्हायची. जसं वर जळत्या जोतिचा आणि अंड्याचा चमत्कार सांगितला. आता जळत्या ज्योतीचाच चमत्कार घ्या. अंधाऱ्या रात्री लोकांना स्मशानात नेऊन एक सरडा धरून सरड्याला काळाकुट्ट कलर देऊन सरड्याच्या शेपटीला आग लावून सरडा सोडून द्यायचा. लोकांना सरडा तर दिसायचा नाही पण इकडून तिकडून या झाडावरून त्या झाडावर पळणारी ज्योत मात्र दिसायची. आणि तो तरंगणारा अंडा. अंडा फोडून त्याच्यामध्ये भुंग्याला टाकून पद्धतशीर चिटकून टाकायचा. आणि या अंड्याला जगू बाबा आदेश द्यायचा जरी उड. की अंडे हवेत तरंगायचे. जगु बाबांचा प्रवास देवऋषि करणारा, लोकांना फसवणारा बुवा ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रबोधन करणारा विवेकी सहकारी हा प्रवास आश्चर्यकारक असाच आहे. असाच सर्व समाजाचा प्रवास तिमिरातून तेजाकडे होवो या अपेक्षेसह जगू बाबांना विनम्र आदरांजली.

 - फारूक गवंडी, तासगाव

============================================

जगूबाबा गोरड  (पूर्वार्ध)

हा माणूस आज जिवंत आहे की नाही, माहीत नाही. पण एका आयुष्यात काय काय जगून घ्यावं, हे या माणसाकडून शिकावं. उंच, किडकिडीत शरीर, दाढी मिशाच्या जंजाळात हरवलेला उभट चेहरा. धोतर अन तीन गुंड्याची पैरण. भुंग्यासारखे, बारिक लुकलुकणारे डोळे, ज्यात एखाद्याने डोकावून पाहिले की तो अडकलाच. नजरबंदी करणारी, गांजाच्या कैफात धुंदावलेली, त्याची पारखी नजर एका क्षणात पुढच्या माणसाचं पाणी जोखायची

दोन्ही हात भाजल्याने, बोटं वाकडी झाली होती, तरी त्या वाकड्या बोटांनी गांजा मळन्यापासून ते चिलीम भरून झुरका मारेपर्यंत त्याची नजाकत बघत राहावी.

कसलं अफाट आयुष्य जगला हा माणूस ! माण तालुक्यातलं, घाटाच्या वरचं “विरळी “हे एक खेडं, पण या पठ्ठ्या मुळे “मुंबई -विरळी “ही एस. टी. सुरू झाली होती. या आडाणी माणसाला मोठ मोठे बागायतदार, सधन व्यापारी, उद्योजक विमानाने फिरवत होते. अलिशान गाड्यातून न्हेत होते. हवेल्या, बंगल्यात त्याची बडदास्त ठेवत होते. सेवा करत होते …

लहानपणी जगू बाबाचा जीव शाळेत कधी रमलाच नाही. शेरंडं गुरं वळणे हाच जगूबाबा चा छंद. निसर्गात भटक भटक भटकायचा. दुधातुपाचं खावून, मोकळ्या हवेत फिरून जगूबाबाचं शरीर फोकासारखं चिवट आणि लवलवीत झालं होतं. हा कधी माणसात रमत नव्हता. पण माळरानाशी, झाडाझुडपाशी, शेरडा करडांशी एकरूप झाला होता. रानातल्या पाखरांची भाषा त्याला उमगू लागली होती. काही तरी अफाट करायचं हे वेड त्याच्या डोक्यातून जात नव्हतं ……

बारमाही ओल असणारी, चारी दिशांनी वाहून येणारं पाणी, कवेत घेणारी एक “ओघळ “त्याने हेरली होती. त्या ओघळीत तीन चार फुटाची सपाट जागा होती. त्यात झाडी झुडपं गच्च वाढली होती. गुरामागच्या सवंगड्यामुळे जगूबाबा गांजाची नशा करायला शिकला. गांजामुळे बुवा, बाबांशी संबध येवू लागला. आसपासच्या तांत्रिक,मांत्रिक, देवरूष पण करणाऱ्या लोकांशी जगूबाबा चा संबध येवू लागला. कष्ट न करता कोंबडं, बकरं नारळ, अंडी अन गांजाला पैसा मिळवणारया त्या मांत्रिकांचं त्याला अफाट कौतुक वाटायचं. त्यांची हवी ती सेवा करायला जगू बाबा एका पायावर तयार असायचा …..

चार पाच वर्षाने एकदम अचानक जगू बाबाच्या “अंगात “आलं. “माझा जीव गुदमरतोय, कुणी तरी मला बाहेर काढा, मला सावली द्या, नाहीतर मी गावाचं वाट्टोळं करीन …… “हात पाय झाडंत जगू बाबा, आदळा आपट करत धाडकन भुईवर डोकं आपटू लागला, कपाळाला बारीक खोक पडून रक्ताची धार कपडे लाल करू लागली. कुणी तरी जखमेत हळद भरून चिंधी बांधली. सगळं गाव गोळा झालेलं. जाणती, शानीसुरती माणसं विचारू लागली. “मला बाहेर काढा “…म्हणत उठून जगूबाबा माळाकडं पळंत सुटला, सगळा गाव त्याच्या मागं वरात काढल्या सारखा निघाला. “फावडी घ्या ..टिकाव घ्या …. “जगूबाबा बडबडत आदळत आपटत बसत उठत गावाच्या पुढं चालला होता. “ओघळीत आल्यावर जगूबाबा थांबला. वाळूत, खडकात शरीर झोकून देवू लागला. जमीनीवर हात आपटून खोदायचा इशारा करू लागला. मनगटागत जाडीच्या, झुडपांच्या गचपणात जगूबाबा जागा दाखवू लागला. बघता बघता झाडं तोडून जागा मोकळी केली गेली. मला वर काढा …जगूबाबा किंचाळू लागला. लगेच कुदळी टिकावाचे हात भीडले, माती उपसली जावू लागली. कंबरभर खोदल्यावर मुळांच्या गुंतावळ्यात अडकलेली सुबक आकारात घडवलेली देवीची दगडी मुर्ती दिसली. सगळ्या गावाने जल्लोष केला. वाजत गाजत देवीला अन जगूबाबाला गावात आणलं …एक देखणं मंदिर बांधन्यात आलं ..अन जगूबाबा “देवाचा माणूस “झाला. लोकांचं दुखलं खुपलं ..उपचार करणारा, बाहेरची बाधा बघणारा, कोडी सोडवणारा “देवऋषी “म्हणून पंचक्रोशीत प्रसीद्ध झाला ……

जगूबाबा चा दरबार भरू लागला. लांबून लोक येवू लागले. पोटापाण्याचा प्रश्न सुटला. पण जगूबाबा समाधानी नव्हता. एके दिवशी “घरातले, मंतरलेले गोटे “काढून टाकन्याचं काम घेवून गावातीलच एक जण जगूबाबा कडे आला. त्याचं घराणं आणि पुर्वज अघोरी उपासनेसाठी प्रसीद्ध होते. या पीढीकडे पण लोक संशयाने बघत होते. तो गडी वैतागून गेला होता. ही ब्याद घरातून निघाली तर मोकळा श्वास तरी घेता येईल, असा त्याने विचार केला. घराच्या भिंतीच्या फडताळात लाल कापडावर ठेवलेले, शेंदराने रंगवलेले आठ नऊ दगडी गोटे होते. सगळेजण त्याला “पितरं “म्हणत. जगूबाबाने होय नाही करत हे आव्हान स्विकारले. डोक्यात शेजारच्या गावातील देवऋष्याची मदत घ्यावी हा ही विचार होताच …

पण त्या देवरूष्याने कानावर हात टेकले. आसलं आवघड काम आपण कधी केले नाही, गोटे उलटले तर जीव घेतील, तु पण या भानगडीत पडू नको, असा सल्ला त्या देवरूष्याने जगूबाबाला दिला. पण जगूबाबा च्या इज्जतीचा सवाल होता. शेवटी जगूबाबाने धाडस करायचे ठरवले. बातमी गावभर, गावातून पंचक्रोशीभर झाली. बघायला गर्दी झाली. मनातून जगूबाबा घाबरलेला होता पण आता माघारी फिरता येत नव्हतं. अंगात धाडस येण्यासाठी जगूबाबाने हातभट्टीची पहील्या धारेची लावली. अन काय होईल ते होवू दे म्हणून कैफातच त्या घरात घुसला ….

लाल रेशमी फडके जमीनीवर अंथरले आणि गावदेवीचा धावा करून फडताळात हात घातला. हाताला गोट्यांचा थंडगार स्पर्श झाला. भीतीची एक लहर शरीरभर पसरत गेली. सगळ्यांचे डोळे जगूबाबा वर खिळलेले. जगूबाबाने तिरमिरीतच एक गोटा उचलला अन जमीनीवर अंथरलेल्या लाल रेशमी फडक्यावर ठेवला. लोकांनी निश्वास टाकला. आता दुसरा गोटा ‍..उचलला ठेवला. काहीच घडत नव्हते. अन जगूबाबाच्या खरा प्रकार लक्षात आला. कार्य येवढं सहज, सोपं झाल्यावर त्यात लोकांना काय विशेष वाटणार. तीसरा गोटा छातीवर घेवून जगूबाबा अचानक खाली कोसळला. गोटा छातीपासून ओढून काढायचा प्रयत्न करू लागला. गडाबडा लोळू लागला. जोरजोराने न कळणारे मंत्र म्हणू लागला. शेवटी कसा तरी तो गोटा निर्जीव करून, त्या भारलेल्या रेशमी फडक्यावर ठेवला. त्यानंतर प्रत्येक गोट्याबरोबर त्याची जीवघेणी लढाई होत होती. शेवटी सगळे गोटे निष्प्रभ करून, घामाघूम होवून गोटे बांधलेले रेशमी फडक्याचे गाठोडे घेवून भेलकांडत जगूबाबा घराबाहेर आला. लोकांनी जल्लोष करून जगूबाबा चा जयघोष केला. आता खरया अर्थाने एका देवऋष्याचा जन्म झाला होता ……येथून पुढे जगूबाबा यशाची अन प्रसीद्धीची शिखरे काबीज करत जाणार होता…


जगूबाबा गोरड ……(उत्तरा्र्ध )

………. जगूबाबा पंचक्रोशीभर जालीम देवऋषी म्हणून प्रसीद्ध झाला. बाकीचे देवऋषी त्याचा सल्ला घेवू लागले. जगूबाबा ची किर्ती सातारा, कोल्हापूर, पुणे करीत मुंबई पर्यंत पोहचली. अलिशान गाड्या जगूबाबा चा माग काढत विरळी ला येवू लागल्या. शरीर भोगाची अन मानसिक रोगाची जुनाट प्रकरणे जगूबाबा कडे येवू लागली. जगूबाबा त्यावर उपाय तोडगे सांगू लागला. जगू बाबा च्या हाताला जसा गुण येवू लागला, तसे लोक त्याच्या पायावर नतमस्तक होवू लागले. त्याच्या पुढ्यात धनाच्या राशी ओतू लागले. हळू हळू जगूबाबा हमखास गुण देणारा म्हणून महाराष्ट्र भर झाला. मुंबई ला गेलेले चाकरमाने गावाकडे आले की जगूबाबा ची महती अैकून दिपून जायचे, त्यामुळे मुंबईत जगूबाबा चे नाव झाले. मुंबई करांची गर्दी वाढू लागली. एस. टी. खात्यातील एका वरिष्ठ अधिकारी भक्ताने मुंबई -विरळी ही गाडी चालू केली. भक्तांनी खचाखच भरून गाडी रोज गावात येवू लागली. अनेक शिष्य तयार झाले. जगूबाबा ला आता लोक बाहेर घेवून जावू लागले. विमानातून, अलिशान गाड्यातून फिरवू लागले ……..

पैशाला तोटा नव्हता. जगूबाबाने घर बांधले, जमीन घेतली. जगूबाबा आता भारतभर फिरत होता. प्रापंचिक विवंचना, असाध्य आजार, जुने मानसिक रोग, हेवे दावे, सुडबूद्धी, गुप्तधनाची लालसा ….असणारया लोकांना जगूबाबा ची गरज पडायची. जगूबाबा उपाय सांगायचा, यश आले तर जगूबाबा चे, नाही आले तर देवाची मर्जी …….बरं चाललं होतं जगूबाबाचं.

……………..

कोणत्या तरी शहरात डॉ.नरेंद्र दाभोळकरांचे अंधश्रद्धा निर्मुलन वर व्याख्यान चालू होते. तेवढ्यात एक फाटका माणूस जवळ आला आणि मला दोन शब्द बोलू द्या म्हणाला. स्टेजवर आल्यावर त्याने स्वतः ची ओळख करून दिली. “मी जगूबाबा गोरड “…एक प्रसिद्ध देवऋषी. इतकी वर्षे हा धंदा कसा करत होतो. कुणाकुणाला मी कसे फसवत गेलो. लोकांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा, अंधश्रद्धेचा गैरफायदा कसा घेत होतो. याच गावात कीतीजणावर उपचार केले तेही सांगू लागला. कीती पैसा कमावला, पण घर जळालं, बायकापोरं गेली, पैसा भस्मसात झाला, हात जळाले, आयुष्याचा कोळसा झाला…………..

आता बस्स …… आता पश्चात्ताप होतोय. आता उर्वरित आयुष्य दाभोळकरांच्या चळवळीत…… जगूबाबा तुफान बोलंत होता. आपल्या आयुष्याचा पट उलगडत होता. एक एक किस्सा सांगत होता. त्याने सांगीतले, डॉक्टर, वकिल अन देवऋषी हे सख्खे भाऊ असतात. केस आली की डॉक्टर विचारतो, अंग दुखतंय का ताप येतो का, थंडी वाजून येते का, खाण्यात काय आलं का ? …वकिल ही प्रश्न विचारणार सात बारयाला कुणाचं नाव आहे, वहीवाट कुणाच्या नावावर आहे, शेतसारयाच्या पावत्या आहेत का ? वगैरे वगैरे. देवऋषी ही तसंच विचारणार रात्री आमक्या झाडाकडे गेलता का, वाईटावर कोण आहे का, अमक्या देवाला विसरला का,नवस फेडायचा राहीला का ? अशुभाची भीती घालून प्रश्नाचा अंदाज घेणार. लोकांची भीती हेरणार, तोडगे सांगणार. पण बाबांनो देवऋष्याच्या अंगात काही शक्ती नसते. सगळा भीतीचा बागूलबुवा असतो. औषधाने आलेला गुण देवऋष्याच्या नावावर खपतो. मनातली भीती निघाली की बाधा दुर होतात …….

जगूबाबाने त्या दिवसापासून अंधश्रद्धा निर्मुलन चे काम सुरू केले. लोकांना तो त्यांच्या भाषेत यातील फोलपणा समजावून सांगायचा. लोकांना ते चटकन पटायचं, लवकर भावायचं. जगूबाबा गावोगावी त्याचे अनूभव कथन करत लोकांच्या अंधश्रद्धा दूर करत फिरायचा. मानधन मिळालं, ठीक. नाही मिळालं ठीक. दाभोळकरांनी “सामाजिक कृतज्ञता निधी “तून दरमहा पाचशे रूपये मानधन त्याला चालू केले होते .जगूबाबा चे अनूभव कथन अतिशय प्रभावी व्हायचे. पण हा गडी चळवळीच्या कार्यकर्त्या बरोबर रमलाच नाही. दाभोळकर व्यसनमुक्ती ची पण चळवळ चालवायचे. जगूबाबाचे देवऋषी पण सुटले पण गांजाचे व्यसन काही सुटले नव्हते. गांजासाठी तळमळायचा, चोरून व्यसन करायचा …..कधी समितीचा निरोप आला की कार्यक्रमा ला हजर व्हायचा.

……..असाच फलटण च्या कॉलेजातील एक किस्सा जगूबाबाने सांगीतला. फलटण च्या कॉलेज मध्ये जगूबाबा चा आत्मकथनाचा कार्यक्रम ठेवला होता. कॉलेज ची पोरं भल्या भल्या प्राध्यापकांची दांडी उडवन्यासाठी ख्यातनाम. एखादा “बोअर “करायला लागला की संपलाच. त्यात जगूबाबा चा असला अवतार.दिसायला आडाणी, बोलनं गांवढळ. सभागृह खचाखच भरलेलं, पोरं पोरी, प्राध्यापक, स्टाफ, शिपाई, सगळ्यांची गर्दी झालेली. जगूबाबा उठला तसा पोरांचा अपेक्षाभंग झाल्यासारखा झाला. त्यांनी जगूबाबा ची टर उडवायला सुरूवात केली. जगूबाबाने पण सुरूवात केली ….

“पोरांनो, तुम्ही शीकलेली माणसं, मी आडाणी, आंगठे बहादूर मी तुम्हाला शहाणपण काय सांगणार …..जगूबाबाने त्याची कहानी सुरू केली, अन सगळे मंत्रमुग्ध झाले. जगूबाबा ची वेळ संपून गेली तरी जगूबाबा बोलतच होता ….

…….. कॉलेजच्या पोरीचीच गोष्ट सागतो. तरूण पोरगी, बाप पोलीस खात्यात मोठ्या हुद्द्यावर, पोरगी कॉलेजला जाता जाता खंगू लागली, अन्न पाण्यावरची तीची वासना उडाली, दिवसभर निरर्थक चाळे करू लागली.घुम्यासारखी बसून राहू लागली. सगळे उपाय झाले, बाहेरची बाधा आहे ही, सगळे सांगायचे, पण बाधा निघत नव्हती. पोरीचा बाप वेडापीसा होवून सगळीकडे चौकशी करायचा. माझं नाव त्यांच्या कानावर गेलं होतं, त्याने माझे पाय धरले. काय पण करा पण पोरीला बरं करा. लग्नाची पोर आहे, म्हणला. मी त्याच्या घरी गेलो. पोरीला पाहिलं,बाधा झालेल्या, लागीर झालेल्या मानसाच्या डोळ्यात एक वेडसर झाक दिसते. जगूबाबाच्या सराईत नजरेस ती दिसली नाही. त्याने सगळ्यांना सांगीतलं, मी उपाय करीन पण पोरीला एकटं सोडावं लागेल. पोरीला एका खोलीत सोडून सगळी बाहेर निघून गेली, अगदी बंगल्याच्या बाहेर.जगूबाबा सांगत होता ” मी पोरीच्या खोलीला आतून कडी लावून घेतली. पोरगी थरथरत उभी होती, मला पहात होती. मी एका झटक्यात तीच्या कपड्यांना हात घातला.” बरं झालं, मी बरेच दिवस उपाशी होतो, आज तुझा मी भोग घेणार,” असे म्हणून मी तीच्या अंगाला झोंबायला लागलो. पोरीला वाटलं हा बाबा आता आपली इज्जत लूटल्याशिवाय रहात नाही. पोरगी गयावया करायलालागली,रडायला, भेकायला लागली. “खरं सांग, तु ढोंग का करतेस “मी तीला दरडावून विचारले तशी पोरगी घडाघडा बोलायला लागली.” माझे एकावर प्रेम आहे, पण घरातले माझे लग्न दुसरीकडे जूळवायच्या प्रयत्नात आहेत म्हणून मी हे नाटक करत होते. पोरगी रडून मोकळी झाल्यावर मी तीला सांगीतले, पोरी मी तुझ्या बा सारखा, खरे हुडकून काढन्यासाठी मला पण कधी कधी असं खोटं वागावं लागतं.

पोरीला बाहेर आणल्यावर सगळ्यांना सांगीतलं हीची बाधा दूर झालीय, पण वर्षभर तरी पोरीच्या लग्नाचा विचार करू नका. सगळ्यांना वाटलं देवऋष्याच्या जालीमपणामुळे बाधा दूर झाली. पण खरं काय ते मला अन त्या पोरीलाच माहीती होतं ” ……..जगूबाबाने ती सभा जिंकली होती.

………..

जगूबाबा कधी सातार्‍यात आला की आमच्याकडे (मुक्तांगण ) ला मुक्कामी राहायचा. त्यावेळी रात्र रात्र आम्ही त्याच्या आयुष्याची विदारक कहानी अैकत राहायचो.पैसा, प्रसिद्धी भोगलेला जगूबाबा भणंग पणे दिवस काढताना कासाविस व्हायचा, त्याच्या वेदना त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसायच्या. मग पुर्वीची पापं, आठवणी, बायकापोरांचे दुख: तो गांजाच्या नशेत खोल खोल गाडू पाहायचा. बोलता बोलता एकदम गप्प होवून जायचा.

कॉलेज संपलं तसा चळवळीशी असलेला संपर्क तुटला पण संबंध संपला नाही. वैयक्तिक कार्य करतो पण संघटनेसाठी वेळ देता येत नाही ….त्यानंतर जगूबाबा ची कधी भेट झाली नाही. कधीतरी बारामतीला येईन म्हणायचा, पण आला नाही. त्याचे अनेक किस्से, घटना अजूनही मनात घर करून आहेत ….त्या अवलिया जगूबाबा सह……असलाच तर भेट होईलही …कुणी सांगावं …!


नरेंद्र दाभोलकर यांचे अनुयायी जगुबाबा गोरड यांचे निधन

 नरेंद्र दाभोलकर यांचे अनुयायी जगुबाबा गोरड यांचे निधन

नरेंद्र दाभोलकर यांचे अनुयायी जगुबाबा गोरड यांचे निधन

म्हसवड  : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे माणदेशी क्रियाशील ज्येष्ट कार्यकर्ते जगूबाबा गोरड रा. कापुसवाडी ता.माण यांचे हृदविकाराच्या  झटक्याने काल रविवारी सायंकाळी पाच वाजता कापुसवाडी येथे निधन झाले. दिवंगत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमाने श्री जगूबाबा गोरड यांनी राज्यभर दौरे करुन बुवाबाजी, देवऋषीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेची जी फसवणूक करुन लुट केली जात होती, त्याबाबत जनजागृती मोहिमेत त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता.

श्री जगूबाबा गोरड : विशेष बाब म्हणजे पुर्वआयुष्यात ते स्वत: देवरसपण बुवाबाजीच  करीत होते. बुवाबाजीत ग्रामीण व शहरी भागातीलही अनेकजणांची आपणांकडूनच फसणूक होत असल्याचे त्यांच्या मनास पटत नव्हते. हि प्रामाणिक खंत त्यांना सात्याने वाटू लागली. गावोगावी मोठ्या संख्येने बुवाबाजी व देवऋषीमुळे भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक थांबली पाहिजे, यासाठी त्यांनी बुवाबाजीस रामराम करुन डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रध्दा समितीत सहभागी झाले.

गेली 32 वर्षे मी बुवाबाजी कशी केली, लोक कसे फसत होते, बुवाबाजी सह देव, भूत विशेत: ग्रामीणभागातील अशिक्षित महिलांच्या अंगात येणे हेच थोतांड आहे, याच विषयावर त्यांनी राज्यभर दौरे करुन जनतेत जनजागृती करुन अंधश्रध्दा विरोधात मोहिम राबविली. त्यांच्या पश्च्यात त्यांचे समाजकार्याची निश्चितच इतिहासात नोंद राहिल.

Saturday, September 24, 2022

विश्वाचा यशवंत नायक : जुलै २०२२

 विश्वाचा यशवंत नायक : जुलै २०२२






रासप सैनिकांनो मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा : कुमार सुशील

रासप सैनिकांनो मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा : कुमार सुशील

मुंबई रासप कार्यालयात स्व. हरिओम बाबू यांना अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुक स्वबळावर लढवणार आहे, रासप सैनिकांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी केले. दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय समाज पक्ष' मरीन ड्राइव्ह  कार्यालय येथे मुंबई प्रदेश आढावा बैठकीचे आयोजन केले होते. उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्षाची पाळेमुळे रुजवणारे उत्तर प्रदेश संयोजक स्व. हरीओम बाबूजी यांच्या ४ थ्या स्मृतीदिवसानिमित्त त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

पदाधिकारी आढावा बैठकीत कुमार सुशील म्हणाले, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत २२८ वार्डमध्ये सर्वच उमेदवार उभे करणार आहोत, त्यासाठी पदाधिकारी यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे काम जोमाने केले पाहिजे, किंबहुना आजपासून वार्डनिहाय १ बुथ १० यूथ अशी बांधणी करून, पक्ष घरोघरी पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम करावे लागेल. वार्डअध्यक्षपासून ते जिल्ह्यातील प्रमुखापर्यंत खूप मेहनत करा. पक्षाचे काम तळागाळातील लोकांना दिसेल तेंव्हाच ते आपल्याला मत देतील.  त्यासाठी आपण त्यांची छोटी छोटी कामे केली पाहिजेत, तसेच पक्षातर्फे विविध समाज हिताची कामे  त्या-त्या वार्डात केली पाहिजेत. राजकीय कार्यक्रम राबवले पाहिजेत.  महानगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच प्रयत्नशील राहावे. 'सब समान तो देश महान' यानुसार राष्ट्रनायक महादेव जानकर यांचे हात बळकट करावेत. आपले मुंबई फिल्टर पाडा पवई येथील कै.सिद्धेश्वर सलगर सन २००४ साली राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभेसाठी (आमदार की) साठी उभे राहिले होते. त्यांच्याप्रति श्रद्धांजली वाहिली. 

मुंबई प्रदेशातील आढावा बैठकित ६ जिल्हाअध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील आढावा सांगितला व पुढील येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार असे सर्वांनी मिळून एकमताने ठाम निर्णय घेतला आहे, कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून हर घर कार्यकर्ता, हर घर रासप याप्रमाणे काम करून पक्षाचा काम सामान्यातील असामान्य लोकांपर्यंत पक्ष पोहोचविण्यासाठी सदस्य जोडो अभियान उभारणार, अशी भूमिका सर्व मुंबईतील पदाधिकारी यांनी एकमुखी घेतली आहे. 

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे मुंबई प्रदेश राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य सचिव जिवाजी लेंगरे, मुंबई रासप युवा सचिव विठ्ठल यमगर, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष जिवन बघेल, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष- सुरेश एडगे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष ललन पाल, ईशान्य मुंबई जिल्हा निरीक्षक नितिन कोळेकर, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रकाश डांगे, उत्तर मध्य मुंबई जिल्हाअध्यक्ष संजय कोलापटे, उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष कोंडीबा पिंगळे, उत्तर पश्चिम मुंबई लक्ष्मण कांबळे, उत्तर मुंबई निरीक्षक महावीर वाघमोडे, उत्तर मुंबई जिल्हा शहर अध्यक्ष भीमराव लवटे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष स्वप्नील ठावरे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रामधारी पाल, कांदिवली महासचिव प्रकाश बोर्ले, मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा महिला आघाडी अध्यक्ष जयश्री केंगार, मानखुर्द शिवाजी नगर, विधानसभा प्रभारी नवनाथ सूर्यवंशी, डॉ. दिलिप पाल, गुलाब पाल, चारकोप, लालचंद पाल  आदी उपस्थित होते.

Friday, September 23, 2022

रासप गुजरात राज्यकार्यकारणी व राष्ट्रीय कार्यकारणी संयुक्त बैठक पार

रासप गुजरात राज्यकार्यकारणी व राष्ट्रीय कार्यकारणी संयुक्त बैठक पार

वडोदरा  : २९/०८/२०२२ रोजी वडोदरा येथे वर्धापन दिवस कार्यक्रम साजरा केल्यानंतर हॉटेल एप्पल ग्रँड येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व गुजरात राज्य कऱ्यकरणीची संयुक्त बैठक पार पडली. सार्वत्रिक गुजरात विधानसभा निवडणुक : २०२३ च्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. 

या बैठकीत भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर, गुजरात राष्ट्रीय प्रभारी तथा राष्ट्रीय महासचिव के प्रसन्नाकुमार, कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरेमामा, गोविंदराव शुरणर, राष्ट्रीय खजिनदार मोहनराव माने, नवनिर्वाचित गुजरात राज्य अध्यक्ष दिलीपसिंह गोहिल बापू, महासचिव संदीप गढवी, गुजरात प्रभारी सुशील शर्मा, युवा अध्यक्ष महेंद्र राठोड, वडोदरा शहराध्यक्ष प्रकाश पटेल उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व लोकसभा निवडणुक स्वःबळावर लढण्याची तयारी करा- महादेव जानकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व लोकसभा निवडणुक स्वःबळावर  लढण्याची तयारी करा- महादेव जानकर
मराठवाडा विभागीय स्तरीय पदाधिकारी चर्चासत्रात बोलताना रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर, मंचावर एस एल अक्कीसागर, पंडित घोळवे, गोविंदराम शुरनर, काशिनाथ शेवते,  माऊली सलगर, प्रा. विष्णू गोरे व अन्य 


नांदेड (१८/०९/२२) : राष्ट्रिय समाज पक्षातर्फे मराठवाडा विभागिय कार्यकर्ता चर्चासत्र घेण्यात आले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रनायक महादेवजी जानकर म्हणाले, राष्ट्रिय समाज पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व लोकसभा निवडणूका स्वःबळावर लढणार आहे .त्यासाठी कार्यकर्त्यांनी बुथपातळीवर कामाला लागावेत. सब समान तो देश महान या म्हणीप्रमाणे पक्षात सर्व उपेक्षित समाजाला सामावून घेवून सर्व आघाड्यांवर कामाला लागावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात माजी राष्ट्रिय अध्यक्ष सिद्दपा अक्कीसागर, राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर, पंडित घोळवे, महाराष्ट्र अध्यक्ष काशीनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शरद दडस, मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णु गोरे, मराठवाडा महिलाध्यक्ष पुष्पाताई मुंडे यांची भाषणे झाली. कंधारचे‌ निवृत मुख्याध्यापक भगवान मुंढे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. त्यांची नांदेड जिल्हा दक्षिण विभागाचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा शिवाजी इंदूरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तर सुत्र संचलन डॉ. प्रा . बाबुराव श्रीरामे यांनी केले. मराठवाड्यातून पाचशे कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा युवाध्यक्ष नितीनसापनर, बालाजी नाईक, मदनेश्वर शूरनर, अविनाश नाईक, बंदखडके, राम गोरे यांनी परिश्रम घेतले.

रासपतर्फे भिवडीत आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

रासपतर्फे भिवडीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

भिवडी (७/९/२०२२): भिवडी ता- पुरंदर जिल्हा पुणे येथे राष्ट्रीय समाज समाज पक्षातर्फे आद्य क्रांतिवीर राजीव उमाजी नाईक यांच्या 231 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. भारत देशातली पहिली आद्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक जयंती राष्ट्रीय समाज पक्षाने साजरी केली असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते यांनी व्यक्त केले.  अभिवादन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते, मुख्य महासचिव माऊली नाना सलगर, प.महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने पाटील, प.महाराष्ट्र समन्वयक सचिनजी गुरव, पुणे जिल्हाध्यक्ष विनायक मामा रूपनवर, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव आण्णा सरक, सोलापूर जिल्हाध्यक्ष- पै.रणजित सुळ, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश आण्णा देवडकर , पुणे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील मेमाणे, पुणे शहराध्यक्ष बालाजी दादा पवार, रासप नेते तानाजीशेठ शिंगाडे, निलेशजी लांडगे, पुरंदर तालुकाध्यक्ष संतोष खोमणे पाटील, जेजुरी शहराध्यक्ष नवनाथ खोमणे पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सिल्वासा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक

सिल्वासा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक

सिलवासा (यशवंत नायक प्रतिनिधी) :  दिनांक २८ /०८/२०२२ रोजी सायं ९ :०० वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव प्रसन्नाकुमार यांची सिलवासा अध्यक्ष अनुपकुमार सिंग यांनी भेट घेतली. सिलवासा हा केंद्रशासित प्रदेश आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले दादरा नगर हवेली आणि दीव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशाची राजधानी सिलवसा आहे. येथे गुजराती, हिंदी, मराठी भाषिक राहतात. आदिवासी बहुल भाग आहे, परंतु आदिवासींचा नागरी विकास झालेला नाही. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल व आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जागावर उमेदवार लढतील, असा विश्वास अनुपकुमार सिंग यांनी यावेळी व्यक्त केला. सिल्वासाच्या राजकारणावर राष्ट्रीय समाज पक्षाचे रणनीतीवर चर्चा करण्यात आली.  या बैठकीसाठी यशवंत नायक प्रतिनिधी आबासो पुकळे, संदीप पांडे (आझमगड) उपस्थित होते.

कर्नाटक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय देवराज आरस यांची १०७ वी जयंती साजरी

कर्नाटक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय देवराज आरस यांची १०७ वी जयंती साजरी 



गुलबर्गा (२१/०८/२०२२, कर्नाटक) : येथील अनन्या डीग्री कॉलेज, पाण्याच्या टाकीजवळ, जुना जेवरगी रोड, गुलबर्गा  येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय देवराज आरस यांची १०७ वी जयंती साजरी करण्यात आली. हिंदवुळद (ओबीसी) कर्मचारी संघटना आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर यांनी केले. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले.

क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण

 क्रांतिवीर सिंदूर लक्ष्मण 

सिंदूर लक्ष्मण यांच्या हौतात्म्यास १५ जुलै २०२२ राेजी शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या स्मृतीशताब्दीस यशवंत नायक व रासप परिवार तर्फे विनम्र अभिवादन..!

महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सिंदूर नावाचं जत-अथणी या आंतरराज्य रस्त्यावरच छोटंसं खेडं. गावात मराठी भाषक कमी अन‌् कानडी बोलणारे जास्त. गावचे व्यवहार महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात जास्त. देशातील इतर सर्व खेड्याप्रमाणे विकासापासून लांब अंतरावर असलेलं हे गाव. शेती हाच मुख्य व्यवसाय; पण सगळी शेती कोरडवाहू. निसर्गाच्या लहरीवर आणि शासनाच्या बेभरवशावर कसंबसं जगणारी माणसं. अशा एका दुर्गम भागातील ओसाड गावात रामोशी समाजात मे १८७८ मध्ये वीर लक्ष्मणचा जन्म झाला. उमाजी नाईक, बाज्या बैज्या, सिंदूर लक्ष्मण यांच्यासारखे क्रांतिकारक रामोशी समाजाने दिले. मात्र रामोशी समाज राजकारणात उपेक्षित राहिल्याचे दिसून येते. कर्नाटकातील प्रथेप्रमाणे माणसाच्या नावाआगोदर त्याच्या गावचे नाव लिहिले जात असे. त्यामुळे त्यांना सिंदूर लक्ष्मण असे संबोधित केले असावे. त्याकाळात ब्रिटिशांचे राज्य होते. राजकीय व्यवहार इंग्रज त्यांच्या कायद्याप्रमाणे चालवत होते; परंतु सामाजिक व्यवहार मात्र मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे चालत होते. राजकीय आणि सामाजिक अशी दोन्ही प्रकारची गुलामी आणि शोषण या विरुद्ध लक्ष्मणने सशस्त्र बंड केले होते. ते फक्त जुलमी राजवटी विरुद्ध लढत होते असं नाही, तर त्यांचा लढा हा राजकीय आणि सामाजिक गुलामगिरी व शोषण या दोन्ही आघाड्यावर होता. ब्रिटिशांनी कायदा करूनच बेरड, रामोशी या समाजास गुन्हेगार जमात म्हणून जाहीर केले होते. या समाजासहित समस्त बहुजन समाज हा शिक्षणापासून वंचित होता. मनुस्मृतीने कावेबाजपणे लेखणी अभिजनांच्या हातात दिली होती. त्यामुळे त्या अभिजन इतिहासकारांनी सिंदूर लक्ष्मणाला दरोडेखोर ठरविले. जे उमाजी नाईक यांच्या बाबतीत झालं, तेच सिंदूर लक्ष्मण यांच्याही बाबतीत झालं. जी अवहेलना उमाजी नाईक यांच्या वाट्याला आली होती, तीच अवहेलना सिंदूर लक्ष्मणच्या वाट्याला आली होती. 


ब्रिटिश सत्तेविरुद्ध सिंदूर लक्ष्मण लढला; पण इतिहासाने त्याना जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवले. ते जर फक्त अन‌् फक्त ब्रिटिशांविरुद्ध लढले असते, तर कदाचित त्यांची दखल घेतली गेली असती; परंतु ते भांडवलदार, सावकार या शोषकांच्या विरुद्ध लढत होते, म्हणूनच त्यांची दरोडेखोर अशी संभावना केली गेली. सिंदूर लक्ष्मण यांनी सशस्त्र क्रांतिकारकांची फौज उभारली होती. त्यात कर्नाटकात राहणाऱ्या त्यांच्या तीन भाच्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी क्रांतिकारकांची फौज सांभाळणे ही काय साधी सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी जुलमी सावकार, भांडवलदार, जमीनदार यांची संपत्ती लुटली. हे खरे असले तरी त्या संपत्तीचा वापर त्यांनी शोषित व उपेक्षित समाज घटकासाठी केला असल्याने त्यांना दरोडेखोर या संज्ञेत आणता येणार नाही. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कारवाया रोखण्यासाठी त्यांना इनाम लावून ब्रिटिशांनी अटक केली होती. त्यांना जतच्या तुरुंगात ठेवले होते. त्यांनी अत्यंत शिताफीने व प्रचंड धाडसाने जतचा तुरुंग फोडला व पलायन केले. काही दिवसांनी त्यांना पकडून जमखंडीच्या तुरुंगात ठेवले. तो जेलही त्यांनी फोडला आणि तिथून निसटले, तिसऱ्या वेळी ब्रिटिश सरकारने त्यांना बेळगाव जवळच्या हिंडलगा तुरुंगात डांबले. जत व जमखंडी या तुरुंगातून दोनदा ते तुरुंग फोडून निघून गेलेच्या पार्श्वभूमीवर त्यांना हिंडलग्याच्या दणकट सुरक्षा कवच असलेल्या जेलमध्ये ठेवले होते. सिंदूर लक्ष्मणने त्यांचे सर्व कौशल्य पणाला लावून तोही तुरुंग फोडला आणि ते आपल्या साथीदारासह बाहेर पडले. अशा प्रकारे तीन वेळा जेलफोडीचं रेकॉर्ड असणारा अन्य एकही स्वतंत्र सैनिक नाही; पण इतिहासकारांनी त्यांना उपेक्षित ठेवले. त्या सर्व कलमकसायाना इतिहास कधीही माफ करणार नाही. 

१५ जुलै १९२२ या दिवशी कर्नाटक प्रांतात त्यांना विश्वासघाताने पकडले आणि त्यांना गोळ्या घालून मारले गेले. एका क्रांतिकारक व लढवय्या स्वातंत्र्यवीराचा शेवट झाला. कर्नाटकात कानडी भाषेत सिंदूर लक्ष्मणच्या कर्तृत्वाचे पोवाडे रचले गेले. त्यांच्यावर बरीच नाटके लिहून सादर केली गेली. त्यांच्यावर चित्रपट काढले गेले. लिखित स्वरूपात असणारे साहित्य जसे आहे, तसेच मौखिक साहित्याचीही कानडीत रेलचेल आहे. पहाटे उठून जात्यावर दळण दळणाऱ्या महिला गेली १०० वर्षे सिंदूर लक्ष्मणच्या ओव्या आणि गाणी म्हणत आल्या आहेत; मात्र हे फक्त कर्नाटकात झालं. त्यांची जन्मभूमी असलेल्या मराठी मुलखात त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. उपेक्षित स्वातंत्र्य सैनिकांना नव्याने जनतेसमोर आणण्याची गरज आहे. यशवंत नायकने मात्र उपेक्षित समाजाचे नायक उपेक्षित राहिल्याने तो समाज उपेक्षित राहिल्याचे ठणकावून सांगितले.

मला सर्व समाजाला सोबत घेऊन जायचे आहे : महादेव जानकर

मला सर्व समाजाला सोबत घेऊन जायचे आहे : महादेव जानकर 

हैदराबाद (तेलंगणा) : V 5 News Telugu या स्थानिक वृत्त वाहिनिशी बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, तेलंगणात कुरुमा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन उभे केले तर राष्ट्रीय समाज पक्ष पाठिंबा देईल, परंतु मला सर्व समाजाला सोबत घेऊन जायचे आहे.  राष्ट्रीय समाज पक्ष सर्व समाजाची पार्टी आहे. कुरमा, कुरवा, भटक्या ओबीसी  समाजाला विनंती आहे, दुसऱ्याच्या महालात राहण्यापेक्षा स्वत:च्या झोपडीत राहावे, कारण महालात कधीही हटवले जाऊ शकते. झोपडीतून कुणीही हटवू शकत नाही म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष आपली झोपडी आहे. आरक्षणामुळे संधी मिळते.

Thursday, September 22, 2022

दुष्काळी भागाचा कायापालट करणारे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णा

दुष्काळी भागाचा कायापालट करणारे डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णा 

सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा अतीदुष्काळी तालुका आहे. याच दुष्काळी तालुक्यातील देवापुर गाव. येथील नांगरतास महादेव मंदिर इतिहास प्रसिद्ध आहे. तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणारे म्हसवड शहरापासून पाच किलमीटरवर  राजेवाडी तलावकाठी ते वसले आहे. तलावाच्या पाण्याचा उपयोग हा सोलापूर जिल्ह्यातील गावांना होतो. सांगली जिल्ह्यातील गावांना होतो मात्र सातारा जिल्ह्यातील गावांना होत नाही. या भागात अत्यंत कमी पाऊस पडतो. परतीच्या मान्सूनवर अवलंबून राहून शेती करावी लागते. तोही वेळेवर पडला तर ठीक, नाहीतर १०० टक्के दुष्काळ पडनारच. दिवाळी संपली की लोकांना परमुलखात पोटासाठी जावे लागते. गावात म्हातारे, लहान मुले व त्यांना सांभाळणारी बाईमंडळी तेवढीच राहतात. या दुष्काळी पट्ट्यात कर्मवीर आण्णा आले, त्यांनी जाणले, या भागातील लोकांना हमखास जमीन कसण्यास मिळण्याचा एक मार्ग होता, तो म्हणजे राजेवाडी तलावाकाठची जमीन. तलावाचे पाणी जसजसे कमी होत जाईल, तसतशी ती जमीन त्यांना खंडाने कसण्यास मिळे.  शासन या जमिनीचा कसण्यासाठी दरसाल लिलाव करत होते.  हा लिलाव धनिक लोक घेत व या गावच्या लोकांना फारच चढ्यादराने कसण्यास देत. या गावातील कर्मवीर आण्णांनी लोकांची साधी घरे (झोपड्या)  व गरीब स्थिती पाहून तेथे त्यांनी मराठी शाळा सुरू केली. या भागात मराठा, धनगर, सणगर व रामोशी, लोणारी या लोकांची वस्ती जास्त आहे. असा भाग पहिला म्हणजे कर्मवीर आण्णाना त्यांची सेवा करण्याचे आव्हानच मिळाले. कर्मवीर अण्णांनी हे आव्हान स्वीकारून आपल्यापरीने कामास लागले. मराठी सातवीची मुले बाहेर पडल्यावर हायस्कूल व पूज्य ठक्कर बाप्पांच्या नावाने वसतिगृह सुरू केले. परंतु या भागातील गरिबीमुळे पालकांना मुलांना शाळेत पाठवणे शक्य होत नव्हते. गुरे राखणे, मेंढरे राखणे, जळणकाटुक गोळा करणे, लहान मुलांना सांभाळणे इत्यादी कामामुळे या लोकांना इच्छा असूनही मुले शाळेत पाठवता येणे शक्य होत नव्हते. यामुळे शाळेत हजेरी कमी भरायची. विद्याखाते ग्रँट देण्यास नाखुश असायचे. यामुळे कर्मवीर अण्णांनी शासनाकडून कोर्ट कमिटेड मुले मिळवली व येथील वसतीगृहात ठेवली. हळूहळू लोकांना शिक्षणाचे महत्व पटू लागल्याने या भागातील मुलांची संख्या वाढू लागली.

येथील गोरगरीब मुलांना 'कमवा व शिका'  योजनेसाठी वसतीगृहाच्या मदतीसाठी तसेच कॉलेजच्या मुलांना दिवाळीचे व उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काम करून पैसे मिळवण्यासाठी कर्मवीर आण्णांनी शासनाकडून राजेवाडी तलावाकाठची सव्वाशे एकर जमीन खंडाने मिळविली. या शेतीमध्ये निरनिराळी पिके व भाजीपाला, मका ऊस लावण्यास सुरुवात केली. आता पंधरा-वीस एकर उस येथे असतो. या जमिनीला काळा पट्टा म्हणून ओळखला जातो. येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने विद्यालय व सायन्सचे ज्युनिअर कॉलेज आहे. या कॉलेजात ॲनिमल सायन्स अँड डेरी डेव्हलपमेंट, क्रॉप सायन्स, हॉर्टिकल्चर शाखा शिकवल्या जातात. प्रत्यक्ष शेतीत नेऊन विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल चे धडे दिले जातात. तेथे शेतीसाठी ट्रॅक्टर आहे. आज काल हे सेंटर स्वावलंबी झाले आहे.  देवापुर हे शिक्षण केंद्र म्हणून उदयास आले आहे. येथे सोलापूर सांगली या जिल्ह्यातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात. रयत शिक्षण संस्था पाहण्यास कोणीही आले तर कर्मवीर आण्णा हे देवापूर केंद्र दाखवल्याशिवाय राहत नसत. देवापूर येथे शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा प्रतिकूल परिस्थितीत कस राहावं, कसं जगावं याचेही व्यवहारिक शिक्षण घेत असतो. 

कर्मवीरांनी 1953 साली सर दोराबजी टाटा ट्रस्ट रुरल वेल्फेअर बोर्डाने दुष्काळी माण तालुक्यात ग्रामीण विकासाचे काम हाती घ्यावे यासाठी कर्मवीर आण्णानी प्रयत्न केले. आण्णांच्या प्रयत्नानुसार बोर्डाने माण तालुक्यात काम करण्याचे ठरवले. देवापुर, गंगोती, हिंगणी, जांभुळणी, पानवन, पुळकोटी, पळसावडे, शिरताव गावे दत्तक घेतली. येथील लोकांना रयत शिक्षण संस्थातर्फे शिक्षण मिळाले व टाटा ट्रस्ट तर्फे भरपूर मदत मिळाली, यामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावले. खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णा यांनी दुष्काळी भागाचा कायापालट केला. कर्मवीर आण्णा यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

- आबासो पुकळे

Wednesday, September 21, 2022

काँग्रेस भाजपने जे केले नाही ते काम राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण करेल : महादेव जानकर

काँग्रेस भाजपने जे केले नाही ते काम राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण करेल : महादेव जानकर

वर्धापन दिन सोहळ्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, एस एल अक्कीसागर यांना पुष्पहार घालून भव्य दिव्य स्वागत करताना दिलीपसिंह गोहिल, संदीप गढवी, प्रकाश पटेल, सुशील शर्मा, किर्णसिंह सोलंकी.

संस्कारनगरी वडोदरा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापनदिवस धूमधडाक्यात साजरा

वडोदरा/ गुजरात : आबासो पुकळे

काँग्रेस भाजपने जे काम केले नाही ते काम राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण करणार आहे. त्यांच्यापासून शिल्लक राहिलेले सर्व काम राष्ट्रीय समाज पार्टी पूर्ण करेल. आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, महागाई या प्रमुख मुद्द्यावर लढू. गुजरातचा विकास झाल्याचा गळा काढला जातो, परंतु येथील पंतप्रधान असूनही म्हणावा, तितका विकास झालेला नाही. विकासाची सर्वात भारी ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे आहे, गुजरातच्या जनतेने आम्हाला सत्ता द्यावी असे आवाहन महादेव जानकर यांनी केले.

दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापन दिवस वडोदरा येथील दीनदयाळ उपाध्याय हॉल येथे साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रीय कार्यकारणीच्या प्रमुख उपस्थितीत धूमधडाक्यात वर्धापन दिवस पार पडला.

वर्धापन दिनानिमित्त महादेव जानकर मार्गदर्शन करताना म्हणाले, आज १९ वर्षाचा राष्ट्रीय समाज पक्ष झाला. वेगवेगळ्या राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिवस साजरा केला जातो. गोहिल बापूनी गुजरातला वर्धापन दिवस साजरा करायचा असे म्हंटले. आज येथे सण असल्यामुळे गर्दी कमी असली तरी रॅलीस चांगला प्रतिसाद मिळाला. १९ वर्षापूर्वी सुरवात केली होती, त्यावेळेस चार पाच लोक होते. अक्कीसागर साहेब सारखी निवडक माणसे सोबत होती. कारवा बनत गेला. आज कमीत कमी १८ राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष चांगल्या प्रकारे काम करत आहे. महाराष्ट्र, गुजरात, आसाम राज्यात विजय मिळवला. सरपंच, नगरसेवक, सभापती, जिल्हा/तालुका पंचायत आमदार पर्यंत जिंकले. संसद सदस्य जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत आमचे विजयाचे चक्र पूर्ण होणार नाही. कॅबिनेटमंत्री बनलो असलो तरी, अजून संसद सदस्य बनलो नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्येविरुद्ध अत्यलप मताने पराभव झाला. पुढच्यावेळेस रासपातून खासदार होईनच, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

श्री. जानकर पुढे म्हणाले, राज्यातील जिल्हा, तालुका, गावपातळीवर संघटन बनवावे. माहोल तयार होतो पण संघटनात्मक नसेल तर माहोल बिघडतो. कामगार, युवक, शेतकरी, महिलांचे संघटन उभा करा. ५०% महिलांना पक्षात स्थान द्या. जोशी साहेब आणि मी चर्चा करत होतो. ते लेबर पार्टी चालवतात. थोडासा प्रेशर केला तर ते रासपात येतील. रासपचे मार्गदर्शक होतील. 

२० वर्षापूर्वी काँग्रेसचा माहोल होता, काँग्रेसने दगड उभा केला तर तो जिंकला जायचा. पण आता लोक म्हणतात, काँग्रेस नजरेस पडत नाही. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत भाजप आहे. घाबरू नका, भाजपचे जास्त दिवस चालणार नाही. ज्या दिवशी आमची एन्ट्री होईल त्या दिवशी ते संपतील, असा दावा श्री. जानकर यांनी केल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट करून जनेतेतून स्वागत केले. महाराष्ट्रात भाजप नव्हती, आम्ही भाजप सोबत युती केली, भाजप सत्तेत आली. आम्ही ज्याच्यासोबत राहतो ते पावरफुल बनतात. आपल्याला गुजरातमध्ये ही आपली ताकद वाढवावी लागेल. इथे संजय वाघमोडे, सपकाळ सारखे जुने कार्यकर्ते आहेत. नलिनी मेहता, संजय वाघमोडे यांनी चांगलं काम केलं, पण मधल्या काळात माझ्यावर राग ठेवून राष्ट्रवादीत गेले. आता तुम्ही काही दिवस कार्यकर्ता म्हणून काम करा, नंतर तुम्हाला पक्षात चांगले फळ मिळेल. नवीन पदाधिकारी यांनी जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे. तर तुम्हाला चांगले दिवस येतील. वडोदऱ्यात आमचे नगरसेवक जिंकले. कर्जन पालिकेत, पादरा पालिकेत रासपचे नगरसेवक आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाने आतापर्यंत चार आमदार जिंकले. आता मी एमएलसी आहे. एस एल अक्किसागर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष असताना, त्यांनी मला ए बी फार्म दिला होता. आम्ही भीक मागणारे नाही तर देणारे आहोत. तुम्ही म्हणाल वीज मोफत देत आहेत. ही मोफतची भाषा सोडून द्या, आपण स्वतः खरेदी करू इतके सक्षम बना. तुम्ही देणारे कोण आहे ? बोलतील वीज मोफत, शिक्षण मोफत, राशन मोफत पाहिजे आणि तुम्ही आमच्यावर राज्य करा आणि आम्हाला मोफतची भाषा करा, हे आता बंद करा. आम्ही इतके सक्षम बनू, आम्हाला मोफत राशन नको तर प्रधानमंत्र्याची खुर्ची पाहिजे, याचा विचार करून पुढे चालले पाहिजे. मोफत ची भाषा करून ते राज्य करत आहेत आणि आपल्याला उल्लू बनवत आहे. देशाला पुढे घेऊन जात आहे. आमचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील म्हणाले, गरीबीत गुजरात २५व्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये पाच आमदार रासपाचे आले तर गुजरातचा मुख्यमंत्री कोणाला करायचं हे गढवी साहेबांनी गोहील साहेब ठरवतील. हे सर्व तुमच्या हातात राहील. माझी आपल्याला विनंती आहे महिन्यातून चार वेळा गुजरात मध्ये येईन. आजच्यासारखी रॅली सुरत आमदाबाद, कच्छ येथे ठेवावी. सकाळी येईल आणि संध्याकाळी विमानाने परत जाईल किंवा कसेही जाईल. मी येण्याचा प्रयत्न करेन. गुजरात राज्य कार्यकारणीस सांगू इच्छितो, पक्षाचे सभासद वाढवा. पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्या तयार करा. प्रत्येक माणसाला राजकीय ताकद द्या. भाजपमध्ये एका घरात पाच संघटन असतात. महिला मोर्चा, कामगार मोर्चा सारखे अनेक विंग आहेत मात्र दोघेच मालक आहेत, मोदी आणि अमित शहा बाकी कोणी नाही, आपण बघितले असेल. 

माझा तुम्हाला प्रश्न आहे, धर्माचे नावाने भांडण लावून, कोणताही फायदा होणार नाही. मुसलमान चुकीचे नाहीत. दलित चुकीचे नाहीत, राज्य करणारे चुकीचे आहेत. राजकारण करणारे चुकीचे आहेत. भांडण आपली लावतात. सर्वसामान्यांचे आयुष्य संपते आणि ते राजकीय सत्ता मिळते. Deligation केले पाहिजे. बांधवांनो, Deotion झालं पाहिजे आणि Determination झालं पाहिजे. माझी सर्वसामान्याना विनंती आहे, आम्ही नेता बनलेलो आहे, आपण स्वतःला विकू नका. जोपर्यंत तुम्ही स्वतःला विकणार, तोपर्यंत तुम्ही विकले जाणार. मंत्री, आमदार खासदार विकले जाणार. निवडणुकीच्या काळात दारू, बाटली, गांधी नोटांच्या पैशावर मत देणार, यामुळे सगळीकडे सत्यानाश झालेला आहे. आता भाजप जवळ खूप पैसे आहेत. त्यांच्याकडे मंदिराचा पैसा, उद्योगपतींचा पैसा, सगळीकडचा पैसा येत आहे. आपण बघितला असेल, महाराष्ट्राचे काय हाल झाले, आपण बघताय दिल्लीची अवस्था काय झाली, गो अवस्था काय झाली. जेव्हा न विकणारा समाज निर्माण होईल, तेव्हा न विकणारा नेता पैदा होईल. माझी तुम्हाला विनंती आहे, आपण स्वतःला विकू नका. याचा विचार करा. माझे वडील हिंदू आहेत. हिंदू असूनही आम्हाला भागीदारी का मिळत नाही, हा प्रश्न आहे? मी मंत्री असताना दुधाला पाच रुपये दर वाढवायचा निर्णय घेतला, त्यावेळेस आयएएस अधिकारी म्हणाला, साहेब असं होत नसतं, आपल्याला निर्णय घेता येत नाही, मुख्यमंत्र्यांनाही घेता येत नाही, मग मी त्यांना म्हनालो, मग कोण निर्णय घेतो. तुम्ही माझी बॅग वागवणारी लोक आम्हाला सांगणार. आम्ही भारतावर राज्य करणारे लोक आहोत. थोडे दिवस मी अभ्यास केला आणि आयएएस अधिकाऱ्यांना पदच्युत करण्याची धमकी देऊन, दुधाला लिटरला ५ रुपयेने दर वाढवला. एकाचवेळी लिटरला पाच रुपये दर वाढवणारा भारतातला पहिला मंत्री महादेव जानकर आहे. आयएएस अधिकारी राज्य करतात हे मला माहीत होतं. राजकारण करतात. आयएएस अधिकारी मंत्री बिंत्रीना किंमत देत नाहीत. 

तुम्हाला विनंती आहे, तीन मुलं जन्माला घाला. एकाला आयएस आयपीएस अधिकारी करा तर एकाला आमदार, खासदार करा आणि एकाला उद्योजक करा. किती पैकी काहीतरी बना. तुम्ही शिकले सवरलेले लोक आहात. बुध्दीजिवी लोक आहे. पत्रकार आहेत, राजकारण घाण आहे. आम्ही राजकारणात येणार नाही. राजकारण वाईट आहे असे सांगतात आणि वाईट लोक राजकरण करतात. भाजपला आपण मोठे केला.

काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपसोबत युती केली आहे. पण माझ तूम्हाला आवाहन आहे, देशाच्या हितासाठी भाजपलाही रोखले पाहिजे. चांगल्या दुधात विष बनणारे भाजप पार्टी आहे. त्यानाही थोडं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही आपणास विनंती आहे. आम्हाला गुजरात राज्यात राज्य करण्यासाठी कमीतकमी संधी तर द्या, आम्ही काय करतो ते तर बघा. पुढच्या वेळेस आम्हाला मत देऊ नका. आमच्या आमदाराने चुकीचे केले तर सोडून द्या, दुसऱ्या पार्टीला सत्ता द्या, पण एकवेळा आम्हाला संधी द्या. आम्हाला सत्तेत बसवण्याचा प्रयत्न करा. गुजरातच्या भूमीने माझ्यावर प्रेम केले आहे. आम्हाला मताच्या संख्येनुसार राष्ट्रीय मान्यता मिळाली नसली तरी गुजरात, महाराष्ट्र राज्यात टेक्निकल मान्यता मिळाली आहे. आम्ही गुजरातची कमान दिलीप सिंह गोहिल यांच्यावर सोपवली आहे. सर्वांनी मिळून काम केल्यास पक्षाला चांगले दिवस येतील. कमीत कमी गुजरात राज्यात कींगमेकर बनाल. दीनदयाळ उपाध्याय सभागृहात कार्यक्रम ठेवला चांगलं झालं. संख्या कमी जास्त होत राहते. ज्यावेळेस मोठी क्रांती होते, त्यावेळीस सुरवातीला चार-पाच लोक असतात. राष्ट्रीय समाज पक्षास साथ, वोट, नोट, मदत देण्याचे मी आवहान करतो. गोहिल बापूंनी रोड शो रॅली काढली. कार्यक्रम यशस्वी केलात. त्याबद्दल धन्यवाद देतो. जय गुजरात जय भारत!

महादेव जानकर यांच्यासारखे नेतृत्व देशात नाही : एस एल अक्कीसागर 

वर्धापनदिन प्रसंगी बोलताना एस एल अक्किसागर

एस एल अक्किसागर यांनी विचार मांडताना बोलत होते, येथे उपस्थित असलेले राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य आणि ज्यांनी शानदार कार्यक्रम आयोजित केला असे दिलीप सिंह गोहेल बापू आपणास शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. राष्ट्रीय समाज पक्षास 19 वर्षे झाली. पक्षाचा प्रवास, पक्षाची सुरुवात खूप कठीण परिस्थितीतून झाली. आमचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी सांगितले, राष्ट्र नायक महादेव जानकर यांचा जन्म जंगलात झाला, त्यांनी एक स्वप्न पाहिलं. ते स्वप्न होतं, मी भारतावर राज्य करीन. भारताचा पंतप्रधान होईन. मी त्यांच्यासोबत तेव्हापासून आहे, जेव्हा त्यांनी हे स्वप्न जाहीर केलं होतं. त्यावेळेस काहीही नव्हतं, ऋण शून्य होते. परंतु चालत राहिले, पुढे एक दिवस MLC बनले, एक MLA जिंकून आणला. पुन्हा MLC बनले. कॅबिनेटमंत्री बनले. मी जास्त बोलणार नाही, आज पक्षाचा वर्धापनदिन आहे. गोहिल बापूंनी पत्रकावर लीहलेले आहे, राष्ट्रीय समाज पार्टीचे 19 सफल वर्ष. आज महादेव जानकर यांनी एक दिवस भारताचा पंतप्रधान बनेल, हे शाबीत केले आहे. सांगू इच्छितो, चार पाच दिवसांपूर्वी गुलबर्गा- कर्नाटक येथे होतो. १७ राज्यात पक्ष पोहचला आहे. १३ राज्यात संघटन काम करत आहे. ५ राज्यात ताकद बनली आहे. 

मी आपणा सर्वांना आणि गोहिल यांना विश्वास देऊ इच्छितो, आमच्याजवळ असा महादेव जानकर एक ध्येयवादी धडाडीचा नेता आहे, ज्यांनी ध्येयासाठी स्वतःच जीवन समर्पित केले आहे. आपण सर्वजण गोहिल यांना बापू बोलत आहात, ते गुजरात नायक जरूर बनतील. वडोदरा भूमी महाराजा सयाजीरावची धरती आहे. पाच वर्षांपूर्वी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची एन्ट्री झाली. ९ नगरसेवक निवडून आले. गोहिल यांनी पहिल्याच प्रयत्नात शतक मारले. असेच चांगले काम केले तर लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री बनाल. मुख्यमंत्रीपदाची माळ तुम्हाला घालन्याची संधी मिळेल. महादेव जानकर यांच्यासारखे नेतृत्व देशात नाही. राष्ट्रीय समाज पक्षात दोन शब्द आहेत 'राष्ट्र आहेआणि समाज आहे' राष्ट्र आणि समाज मिळून पार्टी बनली. १५ ऑगस्ट स्वतंत्र झाले. ७५ वर्ष झाले. पण हे स्वातंत्र्य हस्तांतरण आहे. म्हणजे गोरे इंग्रज गेले आणि काळे आले. भारतात आजही विषमता का आहे. एक आदिवासी कोसो दूर जंगलात आहे आणि श्रीमंत माणूस खूप उंचीवर आहे. राष्ट्रीय समाज पक्ष या देशातली विषमता संपवू पाहत आहे. भारत जरूर स्वतंत्र झाला परंतु प्रजासत्ताक नाही बनला. प्रजासत्ताकचा अर्थ प्रजेच्या नागरिकाच्या हातात सत्ता, या देशातल्या प्रत्येकाला राजा बनायला पाहिजे. राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोहिल बापू साथ देतील, असा विश्वास व्यक्त करतो.

रासप शिवाय गुजरातमध्ये सरकार स्थापन करता येणार नाही : दिलीपसिंह गोहिल

राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. दिलीप सिंह गोहिल यांचा अभिनंदन आणि सत्कार करताना  राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी.

रासप गुजरात प्रदेश अध्यक्ष दिलीपसिंह गोहिल बापू म्हणाले, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 182 जागांची तयारी करत आहोत. काँग्रेस भाजप पेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाची पूर्ण राजनीती वेगळी आहे. राष्ट्रीय समाज पक्षाशिवाय गुजरातचे सरकार स्थापन करता येणार नाही, यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू. जिसकी जितनी संख्या भारी, उनकी उतनी भागीदारी या प्रमुख मुद्द्यावर 182 मतदारसंघात आम्ही लढू. आज वडोदरा महानगरात महादेव जानकर दादा आलेत, गुजरात विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होईल, असा विश्वास वाटतो. 

वर्धापनदिन कार्यक्रमासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर विमानाने वडोदरा येथे दाखल झाले. विमानतळावरून त्यांचे वाजत गाजत जंगी स्वागत केले. कार्यक्रमस्थळी जाताना दुचाकी चारचाकी गाडीसह धूमधडाक्यात रॅली काढण्यात आली. महादेव जानकर यांनी ओपन जीपमधून रोड शो द्वारे गुजरात जनतेस अभिवादन केले. रॅलीने वडोदरावासियांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान गुजरात राज्य अध्यक्षपदी दीलीपसिंह गोहिल यांच्या नावाची घोषणा केली, त्यांना राष्ट्रीय महासचिव तथा राष्ट्रीय गुजरात प्रभारी प्रसन्नाकुमार यांनी नियुक्तीपत्र दिले. वर्धापनदिन कार्यक्रमात राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. सयाजीराजे पिठावर राष्ट्रीय महासचिव प्रसन्नाकुमार, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, पंडित घोळवे, राष्ट्रीय खजिनदार मोहनराव माने, गुजरात राज्य प्रभारी सुशील शर्मा, यवा अध्यक्ष महेंद्र राठोड, नेमसिंह बघेल, सदाशिव पाल, वडोदरा जिल्हाध्यक्ष सुजितसिंह गिल, गुजरात संघटक किरनसिंह सोलंकी, महासचिव संदीप गढवी, वडोदरा शहर अध्यक्ष प्रकाश पटेल, दादासाहेब कोडलकर, सुनील पाल टाइगर मिर्जापुर, दक्षाबेन बिस्ट आदी मान्यवर उपस्थित होते. दिलीपसिंह गोहिल यांनी उत्कृष्ट नियोजन व राष्ट्रीय कार्यकारणीसह सर्वाचे आदरातिथ्य जोरदार केले.

 वडोदरा वर्धापन दिन क्षणचित्रे >>

नवनिर्वाचित गुजरात अध्यक्ष दिलीपसिंह गोहिल यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना राष्ट्रनायक महादेव जानकर

वडोदरा रोड शो द्वारे गुजरातच्या जनतेस अभिवादन करताना राष्ट्रनायक महादेव जानकर, सोबत दिलीपसिंह बापू गोहिल

विश्रामगृह येथून कार्यक्रमस्थळाकडे रवाना होताना, राष्ट्रनायक महादेव जानकर सोबत एस. एल अक्किसागर, दिलीपसिंह गोहिल

कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करताना महादेव जानकर, एस एल अक्किसागर, के प्रसन्नकुमार, गोविंदराव शुरणार, बाळकृष्ण लेंगरे

वर्धापनदिन प्रसंगी बोलताना राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे

राष्ट्रीय खजिनदार मोहनराव माने यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहिल

दादा कोडलकर यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहिल

राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांचा सत्कार करताना दिलिपसिंह गोहिल

वडोदरा शहरात रॅलीप्रसंगी रासप पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक





राष्ट्रीय महासचिव तथा गुजरात राष्ट्रीय प्रभारी के प्रसन्न कुमार यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहिल

वर्धापनदिन प्रसंगी हात उंचावून जनतेस अभिवादन करताना एस एल अक्किसागर व गुजरात राज्य पदाधिकारी

वर्धापनदिन प्रसंगी उपस्थित राहिलेले गुजरात मधील रासपप्रेमी

राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहील

माध्यम प्रतिनिधी आबासो पुकळे यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहिल

वडोदरा विमानतळ येथे राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या आगमन प्रसंगी रासप पदाधिकारी

महाराजा सयाजीराव यांच्या कर्मभूमीत राष्ट्रनायक महादेव जानकर यांचे आगमन

हॉटेल एप्पल ग्रँड येथे चर्चा करताना एस एल अक्किसागर, के प्रसन्नाकुमार

गुजरात पाल महासभेचे अध्यक्ष सदाशिव बघेल यांचा सत्कार करताना दिलीपसिंह गोहिल


चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...