कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवा, अन्यथा महामार्ग रोखण्याचा राष्ट्रीय समाज पक्षाचा इशारा
शाहूवाडी तालुका तहसिलदार यांना निवेदन देताना रासपचे तालुकाध्यक्ष अभिजित पाटील व अन्य रासप पदाधिकारी. |
कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर मलकापूर ते आंबा दरम्यान पडलेले खड्डे महामार्ग विभागाने आठ दिवसात न बुजवल्यास निळे ता- शाहूवाडी येथील खड्याजवळ महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने तहसीलदार गुरु बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला.
कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्ग हा प्रवाशांचा मृत्यूचा सापळा बनला असून, 4 दिवसात 2 मोठे अपघात होऊन, वालुर मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तरीही स्थानिक प्रशासनाने कानाडोळा केला होता, म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने शाहूवाडी तहसीलदार कार्यालयामध्ये तालुका पदाधिकारी यांनी निवेदन दिले. तहसीलदार यांच्यासोबत त्या रस्त्यावर 1 तासात कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली. अन्यथा चक्काजाम रास्तारोको करून संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आंदोलन करणार अशी मागणी करन्यात आली. निवेदनावर तालुकाध्यक्ष अभिजित पाटील, विधानसभा मतदार क्षेत्र अध्यक्ष सुमित आपटे, महेश सावंत, अमित शिसाळ, अर्थव मिरजे यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment