Thursday, August 4, 2022

राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक ; उद्या दिल्लीत संसदेवर धडक

राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक ; उद्या दिल्लीत संसदेवर धडक

जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून महादेव जानकर केंद्र सरकारला घेरणार ?

मुंबई : राष्ट्रभारती द्वारा,  आबासो पुकळे 

'जय भारत बोलो, ५ ऑगस्ट दिल्ली चलो' अशी आरोळी राष्ट्रीय समाज पक्षाने दिली होती. गत एक महिन्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाने 'ओबीसींची जातनिहाय जनगणने'च्या प्रमुख मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्याची जोरदार तयारी करत असल्याची चर्चा रासप कार्यकर्त्यात होती.  

जनगणना कधी, केव्हा आणि काय झाले?

  • १८७२ मध्ये ब्रिटिशांनी पहिली जनगणना केली
  • १८८१ मध्ये देशात जनगणनेस सुरुवात
  • १९३१ मध्ये शेवटची जातनिहाय जनगणना
  • १९५१ मध्ये स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना
  • १९५१ ते २०११ पर्यंत एससी, एसटी ची फक्त जतनिहाय जनगणना 
  • १९३१ च्या जनगणनेवरून ५२% ओबीसींची लोकसंख्या
  • २०११ च्या जनगणनेत जातनीहाय जनगणना पण आकडे जाहीर करण्यास केंद्र सरकारचा नकार

राष्ट्रव्यापी प्रमुख मुद्द्यावरून महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्ष खूप दिवसानंतर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणनेचा मुद्दा २०२० पासून देशभरात धुमसत आहे, आता महाराष्ट्रात एनडीएचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने थेट दिल्लीवर चाल करून हवा भरल्याने ओबीसी जनगणेवरून आगामी काळात चांगलेच वातावरण तापणार आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ, बिहार आदी राज्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उद्याच्या आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलनास देशभरातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. ओबीसी समाजाच्या संघटना, विचारवंत, प्रमुख नेते दिल्ली आंदोलनास हजेरी लावतील असा, आशावाद रासपचे बुजुर्ग नेतृत्व एस. एल. अक्कीसागर यांनी राष्ट्र भारती प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. 

काय आहेत प्रमुख मागण्या ?

  1. जातनिहाय जनगणना करने
  2. ओबीसी आरक्षण कायम करने
  3. नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करने
  4. 50 टक्के सिलींग हटवा
  5. सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करने
  6. न्याय व्यवस्थामध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे
  7. सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करने
  8. धान्य मालाला हमीभावानं खरेदीची हमी
  9. महागाई थांबविण्यासाठी ठोस पावले उचलावी
  10. संपूर्ण मोफत शिक्षण द्यावं
  11. मोफत आरोग्य सुविधा द्यावी
  12.  संपूर्ण मंडल कमिशन लागू करणे
अशा प्रमुख मागण्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. या मागण्यांवरुन राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाला आहे. संसदेवर हा मोर्चा काढन्यात येणार आहे. त्यामुळं मोठ्या संख्यनं नागरिकांना या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीनं करण्यात आलं आहे. त्यामुळं आता या मोर्चाला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि सरकार या मोर्चावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, हितचिंतक, कार्यकर्ते विमान, बस, रेल्वे, खासगी वाहनाने दिल्लीकडे रवाना >>
रायगड - महाराष्ट्र 

रायगड - महाराष्ट्र

मुंबई - महाराष्ट्र

वडोदरा - गुजरात

बारामती- महाराष्ट्र

कुर्डुवाडी,पंढरपूर - महाराष्ट्र

अक्कलकोट - महाराष्ट्र 

जावली, फलटण - महाराष्ट्र

मिर्झापूर - उत्तर प्रदेश 

पुणे - महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड - महाराष्ट्र

टीकमगढ - मध्य प्रदेश 

सुरत - गुजरात 

अहमदाबाद - गुजरात 

कर्नाटक




तमिळनाडू 

केरळ

रत्नागिरी - महाराष्ट्र 

उस्मानाबाद - महाराष्ट्र 

सातारा - महाराष्ट्र 


मंगळवेढा, सोलापूर - महाराष्ट्र 



भानाराम देवासी - राजस्थान 

अहमदनगर - महाराष्ट्र 

राहुरी - महाराष्ट्र 

कर्जत - जामखेड - महाराष्ट्र

हिंगोली - महाराष्ट्र



No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...