Sunday, August 28, 2022

कळंबोलीत आज राष्ट्रीय समाज पक्षाची सन्मान रॅली

कळंबोलीत आज रासपची सन्मान रॅली 

कळंबोली : राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आज दिनांक २८/०९/२०२२ रोजी सायंकाळी ठीक : ५ वाजता भव्य दुचाकी सन्मान रॅली काढण्यात येणार आहे.   उद्या दिनांक २९ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापन दिन आहे.  वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला कळंबोली शहर राष्ट्रीय समाज पक्षातर्फे भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याने पनवेल महानगर पालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरणात हवा भरली जात आहे. कळंबोलीत राष्ट्रीय समाज पक्षाची लक्षणीय ताकद आहे. नुकत्याच झालेल्या दिल्लीतील जातनीहाय जनगणंना आंदोलनासाठी कळंबोलीतून शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वात प्रेम करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या दुचाकीसह सहभागी होऊन सन्मान रॅली यशस्वी करावी, असे आवाहन कळंबोली शहर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आन्नासाहेब वावरे यांनी केले आहे. रॅली पार पडल्यानंतर कळंबोली शहर कार्यकारणी घोषित केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025