Saturday, August 27, 2022

सगळीकडे एकच चर्चा; राष्ट्रीय समाज पक्षाचा गुजरातकडे मोर्चा

सगळीकडे एकच चर्चा; राष्ट्रीय समाज पक्षाचा गुजरातकडे मोर्चा 

संस्कारनगरी बडोद्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापन दिन

मुंबई : राष्ट्र भारती द्वारा : येत्या २९ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा १९ वा वर्धापन दिन सोहळा दुपारी २ वाजता ' पंडित दीनदयाळ हॉल अजवा रोड, वडोदरा येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष के. शिवलिंगप्पा, राष्ट्रीय महासचिव के प्रसन्नाकुमार, कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, गोविंदराव शूरनर, पंडित घोळवे बापू, राष्ट्रीय खजिनदार मोहनराव माने व राष्ट्रीय कार्यकारणीतील नेते उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचा १८ वा वर्धापन दिन पणजी गोवा येथे पार पडला होता. वडोदरा शहर हे गुजरात राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०१४ साली वडोदरा लोकसभा मतदासंघांतून लोकसभेत जाणाऱ्या नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रीय समाज पक्षाने २०१५ च्या महानगरपालिका निवडुकीत जोरदार मुसंडी मारली होती. ब्राम्हण, मराठा, दलीत, मुस्लिम अशा विविध घटकाना उमेदवारी देत निवडून आणले होते. गुजरात राज्यातील सयाजिगंज व लिंबायत विधानसभा मतदासंघात दिलेली लक्षवेधी टक्कर पाहता गुजरात विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षाची एन्ट्री होईल असे चित्र निर्माण झाले होते. आनंद, अहमदाबाद, नवसारी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रीय समाज पक्षाने निवडणूक लढवली आहे. करजन व पादरा नगरपालिकेत जिथे काँग्रेसला खाते उघडता आले नाही तिथे राष्ट्रीय समाज पक्ष प्रमुख राजकीय विरोधी पक्षाची खमकी भूमिका पार पाडत आहे.  

'जय राष्ट्रीय समाज पक्ष - जय गरवी गुजरात' असा नारा देऊन गुजरात राज्य रासप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रनायक महादेव जानकर यांना साहेब हा शब्द न वापरता ' दादा' असा उल्लेख करून मराठी माणसाचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नंतर  महत्व अधोरेखित केले आहे.  वडोदरा महानगरवासियांना श्री. जानकर यांच्या नेतृत्वात होत असलेल्या वर्धापन दिन सोहळ्याची उत्सुत्कता लागली आहे. गुजरात राज्य कार्यकारणी घोषित करणे व आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची घोषणा तसेच राष्ट्रीय कार्यकारणी सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. 

महाराष्ट्रात प्रत्येक गावात स्वत:च्या घरावर झेंडा फडकवने व तालुक्यात दोन शाखा उद्घघाटन करून वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. तर महाराष्ट्र राज्यात बारामती येथे वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याचे पत्रक महाराष्ट्र रासपचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी प्रसिद्ध केले आहे.  उत्तर प्रदेशात प्रत्येक जिल्ह्यात वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त जाहीर मेळावे व कार्यक्रम आयोजित केल्याचे अवध प्रांत रासप अध्यक्ष चंद्रपाल यांनी सांगितले. गुजरात राज्य कार्यकारणीने राष्ट्रीय स्तरावरील वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुजरात राज्य संयोजक दीलीपसिंह गोहिल, गुजरात प्रभारी सुशील शर्मा, गुजरात महामंत्री संदीप गढवी, गुजरात युवा अध्यक्ष महेंद्र राठोड, संघटनमंत्री किरणसिंह सोलंकी, सुजितसिंह गील, प्रकाशभाई पटेल आदी मेहनत घेत आहेत.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...