Friday, August 5, 2022

महादेव जानकर दिल्लीत कडाडले, जातनिहाय जनगणना करा नाहीतर संसदेत घुसेन

महादेव जानकर दिल्लीत कडाडले, जातनिहाय जनगणना करा नाहीतर संसदेत घुसेन

दिल्ली: जंतर मंतर येथे बोलताना महादेव जानकर 

आबासो पुकळे 

दिल्ली : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात दिल्लीत जंतर मंतर येथे भर पाऊसात आंदोलन करण्यात आले. जातनिहाय जनगणना करण्याच्या प्रमुख मुद्द्यावरून महादेव जानकर यांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. महादेव जानकर यांनी जनगनणेचा मुद्दा उपस्थित करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व भाजपला खिंडीत गाठले आहे. महाराष्ट्रात भाजप नेते ओबीसीचे प्रश्नावरून श्रेयवाद घेण्यासाठी खटाटोप करत असताना, आता राष्ट्रीय समाज पक्षाचे दिल्लीतील जनगणना आंदोलनामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांची अडचण झाली आहे. महादेव जानकर यांनी ओबीसी समाजाचे ३४० वे कलम मृत ठरल्याचे सांगत दिल्लीतून तोफगोळे सोडले. ओबीसीसह सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करा, अन्यथा संसदेच्या सभागृहात घुसेन असा सज्जड दम भरला.

 दिल्लीत आंदोलन का करताय असे विचारले असता, श्री. जानकर म्हणाले, मी आंदोलन मुंबईत घेऊ शकलो असतो, पण दिल्लीत राजा राहतो, तर महाराष्ट्रात सुभेदार राहतो. .राजा देऊ शकतो, म्हणून दिल्लीत आलोय.  मला मुळसकट उपटायच आहे. सर्व समाजाचा डाटा गोळा करून जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी मिळाली पाहिजे. उच्चवर्णीयातल्या काही जातीवर अन्याय झालेला आहे, त्यांनादेखील न्याय मिळाला पाहिजे.  सर्वच समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे. 

महादेव जानकर मोर्चात बोलताना म्हणाले, जोपर्यंत जनगणना होणार नाही, तोपर्यंत ओबीसींचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विकास होणार नाही. आम्ही ओबीसी समाजाची जनगणनेची वारंवार मागणी करतोय, तुम्ही म्हणाल.., ते देणार नाहीत, पण मी त्यासाठी मजबूर करेन, असा गर्भित इशारा महादेव जानकर यांनी दिला.

श्री. जानकर पुढे म्हणाले, ही लढाई कोण्या जाती, धर्माची, पार्टीची नसून सर्व समाजाची आहे. या देशात हिंदूचे राजकारण केले जाते, मात्र आम्ही हिंदू असून आमची जनगणना का होत नाही हा माझा प्रश्न आहे. तुम्ही आमच नाटक कराल तर तुमच नाटक केल्याशिवाय राहणार नाही या शब्दात काँग्रेस भाजपला महादेव जानकर यांनी सुनावले. माझ्या मागे पुढे कोणी नाही, याचा विचार करू नका. माझा इतिहास मागे पुढे राहणार आहे. 

डाव्या आघाडीतील पक्ष आपल्या संपर्कात असल्याचा गौफ्यस्फोट महादेव जानकर यांनी यावेळी केला. आपली केवळ आमदारकीसाठी लढाई नसून दीर्घकालीन लढाई आहे. सत्तेच्या जोरावर उपेक्षित वर्गाला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घनाघाती आरोप केला.  संविधान बचावासाठी ताकद लावू. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा कट मोठ्या राजकीय पक्षाकडून होत आहे. मला माहित आहे , आमची रेषा पुसण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही त्यांना संपवण्यासाठी योजना तयार करू असा इशारा महादेव जानकर यांनी यावेळी बोलताना दिला. नेहरू पासून मोदीं पर्यंत जातनिहाय जनगणना करण्यास टाळत आहेत. मोदींना सर्व समाजाची जनगणना करून आंबेडकर बनन्याची संधी आहे. त्यांनी मागणी मान्य करावी अशी विनंती करण्यासाठी दिल्लीत आलोय. 

या आंदोलनात महाराष्ट्र उत्तर प्रदेश येथील खासदारांनी पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी देशभरातून उत्स्फूर्तपणे रासप पदाधिकारी/कार्यकर्ते व विविध मान्यवर उपस्थित होते.

मोर्चात कुठे आणि काय व कसे घडले क्षणचित्रे













व्हिडिओ पहा : जंतर मंतर दिल्ली 

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...