Friday, August 26, 2022

३ डिसेंबर पर्यंत निर्णय घ्या.....अन्यथा बहुजन समाज १२ डिसेंबर ला काळा दिवस पाळणार !

३ डिसेंबर पर्यंत निर्णय घ्या.....अन्यथा बहुजन समाज १२ डिसेंबर ला काळा दिवस पाळणार !

यशवंत ब्रिगेडचे शरद पवार यांना निवेदन

बारामती- महाराजा यशवंतराव होळकर यांचे  जन्मस्थान असलेला वाफगांव तालुका. खेड जिल्हा पुणे येथे असलेला भुईकोट किल्ला गेल्या ६५ वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे व रयत शिक्षण संस्थेकडून या किल्ल्याचा वापर होत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्या किल्ल्याची कोणतीही डागडुजी केलेली नाही, त्यामुळे किल्ल्याची खूप मोठ्या प्रमाणावर पडझड सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील बहुजन समाजातील अनेक संघटनांनी यावर आवाज उठवलेला आहे. परंतु यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.

साहेब आम्ही अनेकवेळा आपल्याला समक्ष भेटून व चर्चा करूनही वाफगावचा किल्ला राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यासाठी व रयत शिक्षण संस्थेकडे अनेकवेळा पाठपुरावा केला, परंतु त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई कार्यवाही झालेली नाही. वाफगाव किल्ला हा शूर पराक्रमी महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या लढाया झाल्या, त्यामध्ये एकाही लढाईमध्ये त्यांचा पराभव झालेला नाही. असा दिग्विजय राजाचे जन्मस्थान हे ऐतिहासिक स्थळ आहे त्यामुळे रयत शिक्षण संस्थेने हा किल्ला राज्य शासनाकडे तीन डिसेंबर 2022 पर्यंत हस्तांतरित करावा. कारण या दिवशी महाराजा यशवंतराव होळकर जयंती आहे वारंवार मागणी करूनही जर यावर कोणताही ठोस निर्णय होत नसेल तर  १२ डिसेंबर २०२२ रोजी यशवंत ब्रिगेडच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बहुजन समाज व होळकर प्रेमींच्या वतीने काळा दिवस पाळण्यात येणार आहे

याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती करणार असल्याचे यशवंत ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर, यांनी सांगितले निवेदनावर, संपतराव टकले, adv गोविंद देवकाते, वसंतराव घुले यांच्या सह्या आहेत

2 comments:

  1. जर किल्ला सोडत नसतील तर यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून खाली पाडले पाहिजेत

    ReplyDelete
  2. आमचा या कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...