Thursday, August 25, 2022

राणी चेन्नमा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या स्वप्नातील भारत घडवू : एस एल अक्किसागर

राणी चेन्नमा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या स्वप्नातील भारत घडवू : एस एल अक्किसागर

कलबुरगी येथे पत्रकार परिषदेत बोलताना श्री. एस एल अक्किसागर,  शिवलिंगप्पा कीन्नुर, गोविंदराम शुरणर, धर्मंन्ना तोंटापुर, सी देवेंद्र 

गुलबर्गा (कलबुरगी)- कर्नाटक : राष्ट्र भारती द्वारा, भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक रत्नांनी प्राणाचे बलिदान दिले होते, मात्र त्यांचे कार्य उपेक्षित राहिले,  अशा क्रांतीकारकांचा सन्मान करून बहुमान वाढवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे. क्रांतिवीर संगोळी रायण्णा राज्याभिषेक करून वार्षिकोत्सव राष्ट्रीय समाज पक्ष दरवर्षी करत असतो. राणी चेन्नमा, संगोळी रायण्णाच्या स्वप्नातील भारत रासप घडवेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर यांनी केले. श्री. अक्किसागर कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कलबुर्गी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका मांडली.

श्री. अक्किसागर पत्रकार परिषदेत म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे बोलले जाते, मात्र रासपचे नेते शिवलिंगप्पा किन्नुर यांनी मजबूत संघटन तयार करून, लवकरच जेडिएस पक्षाला मागे सारून तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होईल असे सांगितले. मला विश्वास आहे कर्नाटक राज्यातील रासप कार्यकर्ते तिसऱ्या क्रमांकाची पार्टी बनवतील. भारतातील सामाजिक, आर्थिक, शिक्षण, आरोग्य, राजकीय व अन्य क्षेत्रातील विषमता गाढण्यासाठी महात्मा फुले यांच्या विचारधारेवर देशात राष्ट्रीय समाज पक्ष पाळेमुळे रुजवत आहेत. महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वात रासपने प्रत्येक राज्याची विधानसभा आणि लोकसभा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 

गुलबर्गा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे कमीत कमी १ हजार सभासद आहेत. गुलबर्गा जिल्ह्यात ७ तालुक्यात आम्ही ताकद वाढवत आहे. आम्ही आमच्या ताकदीच्या जोरावर काम करीत आहे. संघटनशिवाय काहीही साध्य होत नाही. मी कर्नाटकचा भूमिपुत्र आहे. राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन झाला त्यावेळी कोळी समाज जोडला गेला. कोळी समाज राष्ट्रीय समाज पक्षाचा बेस्ड समाज आहे. कर्नाटकमध्ये पक्ष स्थापनेनंतर १ लोकसभा जागा लढवली होती. आगामी निवडणुकीत विधानसभेच्या २२४ जागा आणि लोकसभेच्या २८ मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. देशात पहिला संगोळी रायन्ना राज्याभिषेक राष्ट्रीय समाज पक्षाने केला. संगोळी रायन्ना यांच्या आशीर्वादाने रासपचा पहिला आमदार जिंकला. भारत प्रजासत्ताक राष्ट्र आहे बोलताात, मात्र प्रजेची सत्ता नाही.  तमाम भारतीय जनतेच्या हातात सत्ता यावी, यासाठी आमचा लढा आहे. १३ राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन आहे, तर १७ राज्यात पक्ष पोहचला आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष जिंकणारी पार्टी बनली आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नुर, राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष धर्मांन्ना  तोंटापूर, कलबुर्गी जिल्हाध्यक्ष सी. देवेंद्र, के एस पुजारी, जताप्पा टोने, आदी उपस्थित होते. 

पत्रकार परिषदेत.....











व्हिडिओ पहा>>  

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025