Wednesday, August 3, 2022

राष्ट्रीय समाज पक्ष जातीनिहाय जनगणना आंदोलन ऑगस्ट 2022 घडामोडी

 राष्ट्रीय समाज पक्ष जातीनिहाय जनगणना आंदोलन ऑगस्ट 2022 घडामोडी


जातिनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून जंतर-मंतरवर एकदिवशीय धरणे आंदोलन करणार; बालाजी पवार

आंबेगाव : जातिनिहाय जनगणना व्हावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून पक्षप्रमुख महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर दिनांक ५ ऑगस्ट रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी दिली. या आंदोलनात देशातील ओबीसी समाजातील प्रतिनिधी आणि नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थितत राहून प्रशासनाचे लक्ष वेधून घेणार असून ओबीसीच्या बाबतीत राजकारणात दुजाभाव होतो आहे.त्यामुळे आपसुकच राजकारणतील ओबीसी प्रतिनिधीत्व कमी होत चालले आहे. अशी माहिती पवार यांनी दिली.


दिल्ली येथे होणाऱ्या एक दिवशीय धरणे आंदोलनात, जातनिहाय जनगणना व्हावी,ओबीसी आरक्षण कायम करावे, ओबीसी साठी नॉन क्रिमीलिअरची असणारी जाचक अट रद्द करावी,पन्नास टक्के सिलींग हटविणे, सार्वजनिक संस्थामध्ये संपूर्ण आरक्षण लागू व्हावे, न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये संपू्र्ण आरक्षण लागू करावे,शेतीतील धान्य मालाला हमीभावाने खरेदीची हमी देण्यात यावी.आदी मागण्या करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहराध्यक्ष बाळाजी पवार यांनी दिली. यावेळी,पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सचिन गुरव, कविता जावळे, प्रसाद कोळेकर, राजेश लवटे,वैजनाथ स्वामी,नारायण यमगर, बिरुदेव अनुसे,तुषार तामखेडे आदी उपस्थिती होते.

📝


ओबीसी जनगणनेसाठी रासपचा दिल्लीत मोर्चा


चिपळूण : तहसीलदारांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अशोक पवार, सखाराम गोरे, पंकज नरवणकर आदी. ओबीसी जनगणनेसाठी रासप काढणार दिल्लीत मोर्चासकाळ वृत्तसेवाचिपळूण, ता. ३० ः संपूर्ण देशभरात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील ९ तहसीलदारांना राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने देण्यात आले. जनगणनेच्या मागणीसाठी दिल्ली येथे ५ ऑगस्टला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्यासाठी तालुकानिहाय बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम ठेवणे, नॉन-क्रिमिलिअरची अट रद्द करणे, ५० टक्के सीलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, न्यायव्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, धान्यमालाला हमीभावाने खरेदीची हमी देणे, महागाई थांबवण्यासाठी ठोस पावले उचलणे, संपूर्ण शिक्षण मोफत, मोफत आरोग्यसुविधा पुरवणे आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी शिष्टमंडळासमवेत तहसीलदारांना दिले. या वेळी युवा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पंकज नरवणकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सखाराम गोरे, प्रकाश खरात, राहुल झोरे, श्रुती कोकरे व पदाधिकारी उपस्थित होते.

📝

रासप चे तहसीलदारांना निवेदन

नांदगाव - जातनिहाय जनगणना व्हावी या आशयाचे निवेदन रासप कडून तहसीलदार यांना देण्यात आले ज्यात म्हटले आहे की 5 ऑग रोजी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर संपूर्ण ओबीसी समाज एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहे ज्यात जातनिहाय जनगणना,ओबीसी आरक्षण कायम,नॉन क्रेमिलेयर अट रद्द,सम्पूर्ण शिक्षण मोफत अशा विविध मागण्या आहे.सदर निवेदनावर तालुका अध्यक्ष अशोक लाहिरे व युवा तालुका अध्यक्ष खुशाल सोर आदींच्या सह्या आहे.

📝

जातनिहाय जनगणना करा, रासपची मागणी 

भूम तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी रोहिणी नर्हे यांच्याकडे करण्यात आली. सोमवारी (दि.२५) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर ओबीसी समाज एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहे.

या आंदोलनात सहभागासाठी भूम तालुक्यातील ओबीसी बांधवांसह राष्ट्रीय समाज पक्षाचे हजारो कार्यकर्ते दिल्ली येथे जाणार आहेत. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष विकास, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जावेद शेख, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते नानासाहेब मदने, जिल्हा उपाध्यक्ष पंडित मारकड, भूम तालुका अध्यक्ष गजानन सोलंकर, तालुका संपर्कप्रमुख बंडू लोखंडे, भूम शहराध्यक्ष फिरोज पठाण, नळी वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य श्याम हराळ, वंजारवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश जगदाळे, तानाजी महानवर, पैलवान युवराज हाके व कार्यकर्ते उपस्थित होते.

📝

जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी दिल्ली संसद भवनवर मोर्चा -प्रा. अँड रमेश पिसे

आतापर्यंत जे हि पक्ष सत्तेवरती आले त्या सर्व पक्षांनी आणि त्या सर्व सरकारांनी ओबीसी समाजाची फसवणूक केलेली आहे त्यांच्यात खऱ्या अर्थाने हिम्मत असेल तर ओबीसीच्या बाजूने एकदा उभं राहून बघावं त्यांना कळेल की ओबीसी काय असते? नाहीतर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज हा आपल्या मताचे महत्त्व काय आहे? काय असते? हे निश्चितच दाखवून देणार आहे .त्यासाठीच महादेव रावजी जानकर यांच्या नेतृत्वात मोठ्या मोर्चाचे आयोजन दिल्ली येथे केलेला आहे आणि लवकरात लवकर मोर्चा च्या वेळी मोठी घोषणा महादेवराव जानकर यांच्याकडून केला जाणार आहे जे ही पक्ष आतापर्यंत सत्तेत आलो त्यांनी ओबीसी समाजाची शुद्ध फसवणूक केली त्यामुळे त्यांना स्पष्टीकरण देणे कठीण आहे किमान शक्य तितक्या लवकर ओबीसी प्रवर्गाची जात निहाय जनगणना जर झाली .तर मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटतील.

त्यामुळे जानकर साहेबांनी सर्व पक्ष नेत्यांना आपल्या या मंचकावर बोलावले आहे .आणि त्यांनी आपली ओबीसी विषयी भूमिका स्पष्ट करावी या साठी त्याना निमंत्रण सुद्धा देण्यात आले .असे प्रा पिसे सरांनी पत्रकार परिषदेमध्ये कळवले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे यांचे अध्यक्षतेत मंगलवार दिनांक 2 ऑगस्ट 22 रोजी. सायं 5::30 वाजता टिळक पत्रकार भवन नागपूर येथे रासपच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.अशी माहिती रासप विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांनी दिली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वात शुक्रवार दिनांक 0५ ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली येथे जंतरमंतर मैदानावर जातिनिहाय जनगणनेच्या मागणीकरीता एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या देशव्यापी आंदोलनातील प्रमुख मागण्या 1).जातिनिहाय जनगणनेची मागणी करावी. (2)ओबीसी आरक्षण कायम करावे. (3)नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी. (4)50% सिलिंग हटवावे. (5)न्याय संस्था केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्था मध्ये संपूर्ण आरक्षण लागू करा. (6)शेती धान्य मालाला हमी भावाने खरेदी करा. (7)महागाई हटविण्यासाठी ठोस पावले उचला. (8)संपूर्ण शिक्षण मोफत करा(9). मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करा आदी मागण्या आहेत.

विदर्भ प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असून नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश जनसंपर्क कार्यालय, महालंगी नगर चौक, रिंग रोड नागपूर येथे संपर्क साधावा. असे आव्हान विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा.ऍड. रमेश पिसे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे (9373129563) विदर्भ प्रदेश संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील (8080648563) आणि नागपूर शहराध्यक्ष डॉ.अनंत नासनूरकर (9922298401) यांचे भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा.

या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा. रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील, नागपूर शहराध्यक्ष डॉ.अनंत नासनूरकर, विदर्भ प्रदेश सचिव रामदास माहुरे, विदर्भ प्रदेश कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कामडी, विधि आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष एड. वासुदेव वासे, विदर्भ प्रदेश संघटक हरीकिशन (दादा) हटवार,, नागपूर शहर सरचिटणीस डॉ. प्रशांत शिंगाडे, नागपूर शहर सचिव देविदास आगरकर, नागपूर शहर उपाध्यक्ष डॉ. अरुण चुरड, पूर्व नागपूर शहर संघटक डॉ. दादाराव इंगळे, दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वघरे, नागपूर रासप नेते उत्तम चव्हाण, नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मेश्राम, वाडी शहराध्यक्ष संजय मेश्राम, डॉ. सुवास माहुरे देविदास आगरकर, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

📝


No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...