क्रांतिवीर संगोळी रायन्ना भारताचे महानायक : महादेव जानकर
समाज संगम राजयात्रेचा कर्नाटकात समारोप
नंदगड- बेळगाव : राष्ट्र भारती द्वारा
क्रांतिवीर संगोळी रायन्ना केवळ कर्नाटक राज्यापुरते मर्यादीत न ठेवता भारताचे महानायक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी आयोजित क्रांतिवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वर्षिकोतस्व कार्यक्रमाप्रसंगी आ. जानकर बोलत होते.
श्री. जानकर पुढे म्हणाले, या देशातील प्रस्थापित इतिहासकारानी राष्ट्रासाठी काम करणारे राष्ट्रिय समाजातील महापुरूषाना उपेक्षित ठेवले. संगोळी रायन्नानी भारत राष्ट्राच्या स्वराज्यासाठी इंग्रजाबरोबर संघर्ष करून बलिदान दिले, मात्र त्यांची देशपातळीवर इतिहासात नोंद घेतलेली नाही. समाज संगम राजयात्रेद्वारे राष्ट्रिय समाज पक्षाने २६ जानेवारी २००८ ला नंदगड येथे येवून क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांची समाधी शोधून काढली, तो परिसर स्वच्छ करून समाधीवर पहिल्यांदा सात नद्यांच्या जलाने, सात जाती धर्माच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत राज्याभिषेक व दुग्धाभिषेक केला. आज चौदावा राज्यभिषेक आहे. या चौदा वर्षांत कर्नाटक राज्य शासनाकडून विकासकामे करण्यात आली. आता हे स्थळ राष्ट्रीय पर्यटनस्थळ होईल. आजही संगोळी रायन्नानी ज्या आनंद गडावर ( दुर्गागड) सैन्य उभा करून संघर्ष केला, तेथे जाण्यासाठी रस्ता नाही. आम्ही या स्थळाला भेट दिल्यानंतर २००९ ला राष्ट्रिय समाज पक्षाचा पहिला आमदार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आला. आज राष्ट्रीय समाज पक्ष सतरा राज्यात पोहचला आहे. ज्यावेळेस आमच्या पक्षाचे दिल्लीत सरकार येईल, त्यावेळेस प्रधानमंत्री संगोळी रायन्ना भूमिस अभिवादन करण्यासाठी येईल. कार्यकर्त्यांनी समाज संगम यात्रेच्या माध्यमातून देशभरातील सर्व जाती धर्म, भाषिक, महापुरुष व समाज एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन श्री. जानकर यांनी केले.
राष्ट्रिय समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर आपल्या भाषणात म्हणाले, समाज संगम यात्रेच्या माध्यमातून अनेक भाषा, अनेक जाती, धर्म आणि अनेक संत, महापुरुष यांचा संगम घडवून आणण्याचे काम केले आहे. उपेक्षित महापुरुषाना राष्ट्रिय स्तरावर नेण्याचे कार्य या समाज संगम यात्रेतून घडत आहे. सर्व मोहाचा त्याग करून हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबासारखे नेतृत्व मिळाले आहे, त्यांच्या हाकेला प्रतिसाद देवून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.
दिनांक २४ जानेवारी २०२२ चे समाज संगम यात्रेचे वृत्त 'यशवंत नायक'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. पुढील वृत्त : सरूर शाखा मठ आगतिर्थ पिठाचे जगतगुरू रेवनसिध्द स्वामिजीनी समाज संगम यात्रेचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. पुढे ही यात्रा राष्ट्रिय संत कनकदास यांची कर्मभूमी कागीनेली जि. हवेरी येथे पोहोचली. कागीनेली पिठाचे महास्वामी श्रीनिरजानंद यांनी समाज संगम यात्रेचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. ही यात्रा महापुरूष व समाजाला जोडीत, कित्तुरच्या राणी चेन्नमा यांच्या कित्तुर जि. बेळगांव येथील राजवाडा किल्ल्याला भेट देवून, पुतळ्यास अभिवादन केले.
चंदरगी ता. रामदुर्ग जि . बेळगांव येथे "समाज संगम यात्रेचे "प्रमुख नेते राष्ट्रिय समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर व राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर यांचे स्वागत बेळगांव जिल्हाध्यक्ष हानुमंत पुजारी, चंदरगी शाखा अध्यक्ष सोमनगौडा पाटील व ग्रामस्थ मंडळी यल्लप्पा कळगौड, गौडप्पा कट्टी, हिरप्पा हेगडी, हनुमंत कौजलगी, बसवराज दासपगोल, बिरप्पा हेगडी, मलिंगप्पा कट्टी, भीमसी कौजलगी, भास्कर कुंभार यांनी केले.
दि. २५ जानेवारी २०२२ रोजी समाज संगम यात्रा बेळगांव जिल्ह्यात फिरून खानापूर मुक्कामी पोहचली. दि. २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी समाज संगम यात्रा सकाळी ७ वाजता नंदगड ता. खानापूर जि. बेळगाव येथे पोहचली. नंदगड येथे क्रांतीवीर संगोळी रायन्ना समाधीस्थळी राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब, सिद्धप्पा अक्कीसागर, राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर, कर्नाटक प्रभारी धर्मान्ना तोंटापुर यांच्याहस्ते दुग्धराज्यभिषेक करण्यात आला. सकाळी ८ वाजता संगोळी रायन्ना चौकातील पुतळ्याला पुष्पहार घालून राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांच्याहस्ते झेंडावंदन करण्यात आले. श्री. कृष्णानंद स्वामींच्याहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी सिद्धप्पा अक्कीसागर, नंदगड पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर, गोविंदराम शूरनर, शंकर सोनोळी, पत्रकार सुदेश दलाल, सामंत पुजारी, काशीनाथ शेवते, ज्ञानेश्वर सरगर, अजित पाटील व महाराष्ट्र- कर्नाटकचे रासपचे कार्यकर्ते आणि शाळेतील मुले, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. स. १० वाजता क्रांतीवीर संगोळी रायन्ना बलिदानस्थळी रासपचे राष्ट्रिय अध्यक्ष महादेवजी जानकर व त्यांच्या समवेत असणाऱ्या पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी अभिवादन केले. शेकडो लोकांच्या उपस्थितीत जनसभा पार पडली.
दरम्यान कर्नाटक राज्यासाठी राज्याध्यक्ष म्हणून धर्मान्ना तोंटापुर आणि बेळगांव जिल्ह्यात पक्ष संघटन बांधणी करून जास्तीतजास्त आमदार आणण्याची जबाबदारी प्रकाश मुधोळ यांच्यावर देण्यात आली. उतर प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रपाल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्याध्यक्ष म्हणून काशीनाथ शेवते, महासचिव म्हणून ज्ञानेश्वर सलगर यांची नियुक्ती करण्यात आली.
समाज संगम यात्रा समारोपानंतर श्री. महादेव जानकर, श्री. अक्कीसागर साहेब, प्रकाश मुधोळ यांनी बेळगांव येथील जैन आश्रमात जाऊन जैन मुनीजी यांची भेट घेतली. जैन मुनीजी म्हणाले, भारतात अनेक महापुरूष, क्रांतीवीर व राष्ट्रसंत होऊन गेले. परंतू बरेच महापुरूष अज्ञातवासात आहेत, त्यांना राष्ट्रिय समाज पक्षाच्यावतीने "समाज संगम यात्रा" काढून त्यांना राष्ट्रिय पातळीवर घेऊन जाण्याचे कार्य महादेवजी जानकर करत आहेत. या संगम यात्रेतून राष्ट्रिय समाजाची नाळ जोडण्याचे कार्य हे उत्तम कार्य आहे, या कार्यासाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा दिल्या व उपस्थितांना पंचरंगी बस्ती देवून सन्मानित केले. महाराष्ट्रातून सुरुवात झालेल्या समाज संगम राजयात्रेचा समारोप क्रांतिवीर संगोळी रायन्ना समाधीस्थळ व फाशिस्थळास अभिवादन करून पार पडला, असे रासपचे राष्ट्रीय संघटक गोविंदराम शुरनर यांनी 'यशवंत नायक'शी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment