महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ शेवते तर कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदी धर्मांन्ना तोंटापूर, महाराष्ट्र मुख्य महासचिवपदी ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर
नंदगड- बेळगाव येथे महादेव जानकर यांनी केली घोषणा.
मुंबई : राष्ट्र भारती द्वारा |
दरम्यान,राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी क्रांतिवीर संगोळी रायान्ना फाशीस्थळी अभिवादन करताना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी श्री.काशिनाथ शेवते, कर्नाटक प्रदेशाध्यक्षपदी श्री धर्मांन्ना तोंटापूर व महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिवपदी ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर यांची नियुक्ती केल्याचे घोषित केले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य एस.एल. अक्कीसागर, तेलंगणा राज्य प्रभारी गोविंदराम शुरनर, कृष्णानंद स्वामी, प्रकाश मुधोळ( रामदूर्ग), हनुमंत पुजेर, संजय पांढरे, सोमन गौडा, सिद्धू बिसनाळ, रविचंद्रन आदी उपस्थित होते.
श्री. काशिनाथ(नाना) शेवते हे सातारा जिल्ह्यातील मौजे. जावली ता- फलटण येथील रहिवाशी आहेत. श्री. शेवते नाना हे रासपचे बुजुर्ग नेतृत्व असून, महादेव जानकर यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यशवंत सेना ते रासप अशा प्रवासाचे साक्षीदार व भागीदार आहेत. श्री जानकर यांच्या मंत्रिपदाच्या काळात श्री. काशिनाथ शेवते यांनी सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून काम केलेले आहे.
श्री. धर्मांन्ना तोंटापूर हे विजयपुर जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. श्री. तोंटापुर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे गत तीन वर्षापासून कर्नाटक राज्यसंयोजक म्हणून काम करत होते. त्यांच्या नेतृत्वात कर्नाटक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत यश मिळविले आहे. यापूर्वी त्यांनी इंडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यांना सामाजिक व राजकीय जाणिवेची जाण भान आहे.
श्री. ज्ञानेश्वर (माऊली) सलगर हे सोलापूर जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. श्री. सलगर यांनी यशवंत सेनेपासून महादेव जानकर यांच्यासोबत चळवळीत काम केलेले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सच्चे सैनिक म्हणून ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी नव्या उमेदीने शाखा उघडन्याचा धडाका सुरू केला आहे.
पणजी - गोवा येथील पक्ष वर्धापनदीन कार्यक्रमात देशातील विविध राज्यातील पक्ष संघटनेत फेरबदल करण्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी सूतोवाच केले होते.
No comments:
Post a Comment