बिरसा मुंडाने ब्रिटिशांशी लढताना सांगितले, हा देश आमचा हाय, इथे आमचे राज पाहिजे : एस. एल. अक्कीसागर
कटनी (२२/११/२०२५) : बिरसा मुंडाने ब्रिटिशांशी लढताना सांगितले, हा देश आमचा हाय, इथे आमचे राज पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बडवारा जिल्हा - कटनी येथे श्री. अक्कीसागर बोलत होते. यावेळी रासप राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे (मामा), रासप मध्यप्रदेश अध्यक्ष अशोक सिंह, महासचिव रामविशाल पाल, प्रदेश उपाध्यक्ष रणवीरसिंह चौहान, कटनी जिल्हाध्यक्ष एड. नागेश पाल, शहाडोल जिल्हाध्यश चंदू कोल व अन्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.
श्री. अक्कीसागर आपल्या भाषणात म्हणाले, २५ वर्षापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे मला भेटले. ते काहीतरी करतील असे मला वाटले. कोणत्याही प्रदेशाचे, समाजाचे विकास व्हायचा असेल तर नेतृत्व ही मोठी गोष्ट आहे. मध्य प्रदेश राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष, पदाधिकारी/कार्यकर्ते यांचे मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी बिरसा मुंडा १५० जयंती साजरी करन्याचा उपक्रम हाती घेतला. १५ नोव्हेंबर १८७५ ला बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. २५ वर्षाचे ते जीवन जगले, असे कोल साहेब म्हणाले. त्यांनी भारतात क्रांती केली, "तीर कमान आणि उलगुलान हा त्यांचा नारा होता. जल, जमीन, जंगल साठी त्यांनी लढा दिला. त्यांच्या आठवणीमुळे मी कर्नाटकातून पुणे व्हाया मध्यप्रदेश असा आलो आहे. गांधी आफ्रिकेत दुसऱ्यांसाठी लढत होते. त्यांचा कोट उतरवून गांधीना बिरसा मुंडाचा पोशाख करण्यास गोपाळ कृष्ण गोखले यांनी सांगितले. भारतीयांसाठी लढणारा खरा महात्मा बिरसा मुंडा आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधींना महात्मा म्हटले नाही. कारण ते नकली महात्मा होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंचे शिष्य होते. जोतीराव फुले, पेरियार, नारायण गुरु, राजर्षी शाहू महाराज हे सर्व मागास समाजातून आले होते. राजर्षी शाहू राजा होते. त्यांचे गुरू महात्मा फुले. शाहूंनी देशात पहिले आरक्षण दिले. संविधान लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू महात्मा फुले. महात्मा फुले यांना आपण विसरलो. जसा नेता असतो तसा समाज तयार होतो. आमचे नेते महादेव जानकर यांनी लग्न केले नाही. नाते संबंध तयार केले नाहीत. त्यांनी बनवलेल्या पार्टीचे नाव आहे, राष्ट्रीय समाज पार्टी. राष्ट्र ही देव, राष्ट्र ही जाती, राष्ट्र ही धर्म | राष्ट्र बने बलशाली यह भाषासुत्र हमारा || यात सर्व आम्ही एक केले. या देशात सत्य काय आहे? बाबासाहेब म्हणाले, पार्लमेंटची सत्ता काबीज करा. बिरसा मुंडा भगवान नव्हते, ते एक माणूस होते, त्यांनी देशात क्रांती केली.
श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, कांशीराम यांच्या पक्षास पहिले मत दिले आहे. कांशीराम यांनी ८५%, १५% ची बात केली. राष्ट्रीय समाज पक्ष १००% ची बात करत आहे. काँग्रेस आणि भाजपच्या फसव्या राजकारणाला उघडे पाडण्यासाठी फुलेंनी सांगितलेले सत्यशोधन केले पाहिजे. बिरसा मुंडा यांच्यासारखी आज आम्ही पगडी घातलेले अशोकसिंह बघेल मध्यप्रदेशात रासपने नेता दिला आहे. महाराष्ट्र नंतर मध्य प्रदेश राष्ट्रीय समाज पक्षाचे मॉडेल बनेल, असे वाटते. बिरसा मुंडा ब्रिटिशांशी लढले आणि सांगितले, हा देश आमचा आहे, आमचे राज पाहिजे. काँगेस, भाजपने दलाल, चमचे निर्माण केलेत. बिरसा मुंडाने गोरे अंग्रेजना हटविले, राष्ट्रीय समाज पक्ष भाजप, काँग्रेसच्या काळ्या अंग्रेजाना हटवण्याचे काम करेल. आपल्याला त्यागनायक महादेव जानकर यांचे हात बळकट करून, मध्य प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्षाचे शासन आणायचे आहे.

No comments:
Post a Comment