वडोदरा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक
वडोदरा (१/११/२५) : गुजरात राज्यातील वडोदरा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव के प्रसन्नाकुमार हे गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आले होते. वडोदरा शहर कार्यकारणी व पक्ष विस्तार करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. यापूर्वी गुजरात मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने महानगरपालिकेत चांगले काम केले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरसेवक यांनी विरोधी पक्षाची भूमिका घेऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. पुन्हा एकदा नव्या उमेदीने राष्ट्रीय समाज पक्षाने वडोदरा महानगरपालिका निवडणुक लढवावी, असे निर्देश राष्ट्रीय महासचिव के प्रसन्नाकुमार यांनी दिले. या बैठकीसाठी गुजरात रासपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष प्रकाश शाह, गुजरात राज्य माजी महामंत्री एड. संजय वाघमोडे, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र संचनीया, राज्य महासचिव किरण सिंह, सोनालबेन, जिग्नाशाबेन, विल्यम भाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment