बाणसागर धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष संघर्ष करणार : अशोक सिंह
सागर ( २६/११/२०२५) : बाणसागर धरणामुळे शहडोल, सतना, मैहर, कटनी आदि जिल्ह्यातील विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्ष संघर्ष करणार असल्याचा इशारा, मध्यप्रदेश रासप अध्यक्ष अशोक सिंह यांनी दिला. धरणाच्या किनाऱ्यावर उभे राहून अशोक सिंह यांनी समाज माध्यमातून प्रतिक्रिया दिली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रणवीर सिंह चौहान, प्रदेश महासचिव रामविशाल सिंह पाल, बिंद क्षेत्र महासचिव राम पाल सिंह, रीवा संभाग अध्यक्ष रामेश्वर सिंह पाल आदी होते.
श्री. अशोक सिंह म्हणाले, बाणसागर धरण परिसर भ्रमण केला. येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो, हजारो एकर जमीन यासाठी वापरली आहे. बाधित शेतकऱ्यांना त्यांची भरपाई मिळायला पाहिजे होती. नोकरी मिळायला पाहिजे होती. पण ती मिळालेली नाही. आजही बाधित कुटुंबीय ठोकरा खात आहेत, हे लोकांमध्ये गेल्यानंतर मला समजले. सरकारकडे मी अपील करतो, लाखो लोकांसाठी तुम्ही काम केले, सर्वत्र पाणी पोहचले. ज्यांनी ज्यांनी आपले गाव सोडले, जमीन दिली. विस्थापित झाले. त्याची सर्वप्रथम व्यवस्था व्हायला पाहिजे होती. वंचित, दलीत, आदिवासी, ओबीसी समाजाला उपेक्षित ठेवत आहे. राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे संपूर्ण राज्यात फिरून लोकांकडून माहिती घेत आहे. शेतकऱ्याना खत मिळवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळ पर्यंत रांग लावूनही खत मिळत नाही. शेतकऱ्यांनी खते मागितली तर सरकारने खते न देता शेतकऱ्यांना लाठी काठीने मारले. अतिवृष्टीने पिके मातीमोल झाली, अद्याप सरकारने सर्वेक्षण केले नाही. मध्य प्रदेश सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना सोबत घेऊन भोपाळला राज्य सरकारला घेराव घालेल.

No comments:
Post a Comment