Saturday, December 20, 2025

राज्यातील सर्वच महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष लढणार : महादेव जानकर

राज्यातील सर्वच महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष लढणार : महादेव जानकर



मुंबई दि. १८ (आबासो पुकळे) : राज्यातील सर्वच महानगरपालिका निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष लढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एका मराठी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. आझाद मैदान मुंबई येथील राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महासचिव के प्रसन्नाकुमार, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा उपस्थित होते.

श्री. जानकर म्हणाले, मुंबई, सोलापूर, नांदेड, सांगली, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड सह राज्यातील सर्वच महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष लढणार आहे. काही ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष महाआघाडी सोबत जाणार आहे. मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लढणार आहे. आम्ही आघाडी युतीसाठी आम्हाला घ्या आम्हाला घ्या म्हणून मागे जाणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कोणाचा प्रस्ताव आल्यास, आम्ही मुंबईतील रासपच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. राष्ट्रीय समाज पक्षाचे मुंबईत ११२ उमेदवार तयार आहेत. मुंबई महानगरपालिकासाठी राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत आहे. राज्यात भाजप सरकारवर जनता नाराज आहे. सर्वसामान्य नागरिकांना जगणे असहाय्य करून टाकले आहे. लोकांना परिवर्तन हवे आहे. 


लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाजप सोडून आम्ही कोणाशीही युती, आघाडी करू, पण भाजप सोबत जाणार नसल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पंधरा हजार रुपये वाटले, मंत्रीच वाटत होते. महानगरपालिका निवडणुकीत लाखो रुपये सुद्धा देतील, त्यांच्याकडे शक्तिपीठ, कोस्टल रोड, अदानी , अंबानी सारखे उद्योगपती असे त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, काही कमी नाही, असा टोला जानकर यांनी लगावला. लोक त्यांचा पैसा घेतील, मात्र मत आम्हालाच देतील असा विश्वास आहे. आम्ही तळागाळात जाऊन काम करणारे नेते आहोत. राष्ट्रीय समाज पक्ष नगरपालिका निवडणुकीत यश मिळवेल. जागतिक स्तरावर रुपयाचे अवमुल्यन झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात रुपया तेजीत होता. राज्यात शेतकरी नाराज आहेत. युवक नाराज आहेत. जातीय सलोखा बिघडला आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले म्हणून सांगता, पण दुसरीकडे वीज बिल वाढवले. सोन्याचा तोळ्याचा दर लाख रुपये पेक्षा जास्त वाढला, पण कापूस, कांदा, सोयाबीनला दर नाही. सत्ताधारी मीडियातून लोकांवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील, मात्र आम्ही थेट जनतेत जाऊन निवडणुकीचे बिगुल वाजवू, असे सांगितले.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय समाज पक्ष व अखिल भारतीय कोळी समाज तर्फे डॉ. संतोष (डीटी) व राम अवतार कोळी यांचा सत्कार

राष्ट्रीय समाज पक्ष व अखिल भारतीय कोळी समाज तर्फे डॉ. संतोष (डीटी) व राम अवतार कोळी यांचा सत्कार कलबुर्गी : समाजसेवा, संघटना आणि राजकारणाच्य...