नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार विजयी
अंबड, बारामती नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे खाते उघडले
मुंबई (२१/१२/२०२५) : राज्यात झालेल्या नगरपंचायत/नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने यश मिळवले. राष्ट्रीय समाज पक्षाने लढत देण्याचा बारामती नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार वनिता अमोल सातकर यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून विजय मिळवला. वनिता सातकर यांना 2348 मते मिळाली तर विरोधी राष्ट्रवादीच्या उमेदवार पागळे ऋतुजा यांना 1876 मते मिळाली. ४७२ मताच्या फरकाने राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवाराने विजय मिळवून बारामती नगरपालिकेत प्रवेश केला. अंबड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ६ अ मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सचिन खरात यांना १६७५ मते मिळाली तर काँग्रेसचे विरोधी उमेदवार अक्रम सय्यद यांना ७३३ मते मिळाली. सचिन खरात यांनी ९४२ मताच्या फरकाने विजय मिळवला. तर प्रभाग क्र. 6-ब मधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार शेख बद्रुन्निसा बेगम खुर्शिद अहेमद यांना 1550 मते मिळाली तर विरोधी काँग्रेस उमेदवार नौशाद अनिस सैय्यद यांना 812 मते मिळाली. शेख बद्रुन्निसा बेगम खुर्शिद अहेमद यांनी 738 मताच्या फरकाने विजय मिळवला.
राष्ट्रीय समाज पक्षाने नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्रपणे उमेदवार उतरवले होते. काही ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षाशी युती करून निवडणूक लढवली होती. सत्ताधारी यांच्यापुढे ताकदीने चांगली लढत देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय समाज पक्षाच्या झुंजार कार्यकर्त्यांनी केला. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रचारात स्वतः सहभागी होऊन उमदेवारांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे निवडणूक लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या सर्वाचे अभिनंदन.



No comments:
Post a Comment