Saturday, December 20, 2025

आयएसएस अधिकारी विक्रम विरकर यांच्यावर बिहार सरकारची मोठी जिम्मेदारी

आयएसएस अधिकारी विक्रम विरकर यांच्यावर बिहार सरकारची मोठी जिम्मेदारी 


मुंबई (१३/१२/२०२५) : काल शुक्रवारी बिहारमध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या. महाराष्ट्राचे सुपुत्र IAS अधिकारी विक्रम विरकर यांच्यावर बिहार राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रातली मोठी जिम्मेदारी सोपवली आहे. श्री. वीरकर यांनी मुझफ्फरपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून प्रशासनात गतिमानता आणत आपल्या लोकोपयोगी कामाचा धडाका लावून कार्य केले, असे स्थानिक नागरिक सांगतात. श्री. विरकर हे भारतीय प्रशासन सेवेतील 2019 चे केडर अधिकारी आहेत. सातारा जिल्ह्यातील विरकरवाडी तालुका माणचे मूळ रहिवाशी आहेत.

मुझफ्फरपूर महानगरपालिका आयुक्त विक्रम विरकर यांची प्राथमिक शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विरकरवाडी तालुका माण जिल्हा साताराचे रहिवाशी आहेत. प्राथमिक शाळा शिक्षकाच्या मुलावर बिहार सारख्या राज्याची प्राथमिक शिक्षण विभागाची धुरा हाती आली आहे. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छ्या, त्यांची कारकिर्द लोकहिताची ठरो, अशी अपेक्षा.!

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय समाज पक्ष व अखिल भारतीय कोळी समाज तर्फे डॉ. संतोष (डीटी) व राम अवतार कोळी यांचा सत्कार

राष्ट्रीय समाज पक्ष व अखिल भारतीय कोळी समाज तर्फे डॉ. संतोष (डीटी) व राम अवतार कोळी यांचा सत्कार कलबुर्गी : समाजसेवा, संघटना आणि राजकारणाच्य...