प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार काजल माने यांना विजयी करा : बाळकृष्ण लेंगरे मामा
कळंबोली : प्रस्थापित पक्षाकडून उपेक्षित समाजातील माणसांना ऐन निवडणुकीत उमेदवारी अर्ज दिले जात नाहीत. तेच ते चेहरे आणि तेच ते उमेदवार याला जनता आता कंटाळली आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने होतकरू नेतृत्वास संधी दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या, आपला हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते असे आनंदा माने सरकार यांच्या पत्नीस राष्ट्रीय समाज पक्षाने संधी दिली आहे. पुरस्कृत उमेदवार अक्षय हाके या उमद्या तरुणास संधी दिली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याची वाट पाहणाऱ्या मतदारांना, मत शक्तीची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. प्रभाग क्रमांक दहा मधील मतदारांनी काजलताई माने यांच्या रिक्षा या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करावे, तसेच पुरस्कृत उमेदवार अक्षय हाके यांना खटारा या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कोषाध्यक्ष सुदामशेठ जरग, राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष अरुणशेठ झिमल, शरद दडस, आण्णासाहेब वावरे, सदाशिव जानकर, नितीन शेळके, मच्छिंद्र मोरे, आनंद मोटे, गोरक्षनाथ कोकरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री. लेंगरे मामा पुढे म्हणाले, महानगर म्हणजे काय? महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना ज्या सुविधा पोहचायला पाहिजे, त्या पोहोचताना दिसत नाहीत. पनवेल महानगरपालिका ही मुंबई शहराचे गेट आहे. पनवेल महानगरपालिकेचे बजेट 3 हजार कोटी झालेले आहे, हे पैसे कुठे खर्च करतात हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे? महागाईमुळे सर्वसामान्य जनता नाराज आहे. बेरोजगारीमुळे सर्वसामान्य कुटुंबातील युवक युवतींना तटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. लोकांचे हक्क आणि अधिकार डावलून लोकशाहीचा गळा घोटन्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. पनवेल महानगरपालिकेत उमेदवारावर दबाव आणून बिनविरोध निवडणूक करून नागरिकांना मताधिकारापासून वंचित ठेवण्याचे पाप, घडले आहे. काजलताई माने व अक्षय हाके यांना लोकशाही भारतात एक बहुमूल्य मत देऊन कळंबोलीतील प्रभाग 10 मधील मतदारांना बदल घडवून आणण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे. मतदार बंधू भगिनींनी येत्या १५ तारखेला बदल घडवून आणावा, असे आवाहन श्री. लेंगरे मामा यांनी केले.
उमेदवार काजल ताई माने म्हणाल्या, कळंबोली शहरातील नागरी समस्या सोडवण्यात सत्ताधारी लोक अपयशी ठरल्यामुळे, प्रभागात बदलाचे वारे वाहत आहे. माझ्या प्रचाराची जबाबदारी जनतेने हातात घेतली आहे. उमेदवार अक्षय हाके म्हणाले, नागरी समस्यांकडे कानाडोळा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनतेने आता उघडे पडले आहे. त्यांच्यावर लोक नाराज असून काजलताई माने व मला लोकांचा पाठिंबा मिळत आहे.
#काजलमाने #आनंदामाने #Kalmboli #प्रभागक्रमांक१० #PanvelMunicipalCorporation #election2026 #pnvelelection2026 #RashtriyaSamajPaksha #mahadevjankar Balkrishna Lengare Mahadev Jankar Official

No comments:
Post a Comment