Saturday, December 20, 2025

वाराणसीत राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

वाराणसीत राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

उत्तर प्रदेश राज्य कार्यकारणीसह सर्व आघाड्या बरखास्त 

मुजफ्फरनगर (४/१२/२०२५) शरद पाल : उत्तर प्रदेश राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन काशी मेरेज लॉन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते. यावेळी रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, उत्तर भारतीय आघाडी संयोजक संजय उपाध्याय, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राजू पाल, अजय राय, लखनऊ मंडल अध्यक्ष सरवन पाल, रुपाली श्रीवास्तव, कमलकांत त्रिपाठी, नंदिनी शर्मा, सुमित सिंह, मुकेश पाल व अन्य मंचावर उपस्थित होते.

रासपा अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्षाला शून्यातून सुरुवात करावी लागेल. उत्तर प्रदेशसाठी वेळ देऊ. आज आमदार, खासदार जिंकण्याची भाषा करणार नाही. लवकरच संघटनात्मक काम उभे करण्यासाठी लखनऊ येथे बैठक आयोजित करू. कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये, कारण मीही पाचवेळा लोकसभा निवडणुकीत हारलो, म्हणून लढायचे सोडले नाही. माझे आमदार वाढत गेले. पक्ष वाढत गेला. दहा पासून दहा लाखापर्यंत लोक एकत्र करू शकतो. सुमित पांडे यांनी चांगले काम केले. तुम्ही युवकांची आघाडी उभी करा. पूर्वांचल, उत्तरांचल, प्रयागराज, झांशी, कानपूर प्रत्येक विभागातून वेगवेगळे पदाधिकारी असतील. सतीश उपाध्याय तुम्ही उत्तर प्रदेशात थोडे लक्ष द्या. लवकरच नवीन जिल्हा कार्यकारणी व जिल्हाध्यक्षांची नियुक्ती कार्यक्रम घेऊ. आजच्या मेळाव्यास आलेल्या सर्वांना धन्यवाद देईन. 

२६ जानेवारीला मोठी घोषणा करणार

दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी कर्नाटकातील नंदगड जिल्हा बेळगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा करण्याचे संकेत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी वाराणसी येथे बोलताना केले आहेत. २६ च्या कार्यक्रमात जानकर साहेब कोणती घोषणा करणार? याची उत्सुकता लागली आहे.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय समाज पक्ष व अखिल भारतीय कोळी समाज तर्फे डॉ. संतोष (डीटी) व राम अवतार कोळी यांचा सत्कार

राष्ट्रीय समाज पक्ष व अखिल भारतीय कोळी समाज तर्फे डॉ. संतोष (डीटी) व राम अवतार कोळी यांचा सत्कार कलबुर्गी : समाजसेवा, संघटना आणि राजकारणाच्य...