Saturday, August 30, 2025

गुलाब पुकळे यांचे निधन ! गजी नृत्याचा कलाकार हरपला

गुलाब पुकळे यांचे निधन ! गजी नृत्याचा कलाकार हरपला

श्री. गुलाब दाजी पुकळे यांचे काल अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पुकळेवाडीतील गजी नृत्याचा कलाकार हरपला. काही दिवसांपूर्वी त्यांचा कनिष्ठ चिरंजीव लक्ष्मण पुकळे यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर श्री. गुलाब दाजी पुकळे यांचे मुंबईत रूममध्ये केलेले बाहारदार गजी नृत्य पाहून अनेकजण भारावले. त्यांच्याबद्दल अनेकांनी त्यावर भरभरून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मीही त्यावर माझे मत व्यक्त केले. 

गुलाब पुकळे यांचा खरा परिचय झाला, तो रेठरे कारखाना परिसरात मेंढरामागे. कारण त्याच दरम्यान कधीतरी त्यांचा ज्येष्ठ चिरंजीव दाजी हा परागंदा झाला होता. त्याचा खूप शोध घेतला गेला, पण तो अद्याप मिळाला नाही.

गुलाब पुकळे यांना अफाट बुद्धीमत्ता लाभली होती. त्यांना बोलता येत नसले तरी, अगदी लहान मुलाला देखील चटकन समजेल, अशा सोप्या भाषेत एखादी गोष्ट सांगण्यात ते तरबेज होते. गावगाड्यातील सर्वांना ते ओळखायचे. लहान थोर सर्वांची माहिती त्यांना असायची. प्राण्यांबद्दल त्यांना आपुलकी होती.  चुकीची गोष्ट आपण करत असू तर त्यांच्या पद्धतीने ते आपल्याला सावध करायचे. गुलाब पुकळे यांच्याबद्दल श्रद्धांजली लेख लिहावा यासाठी प्रा. आनंद पुकळे सर यांचे फोनवर बोलणे झाले. त्यांनीही गुलाब पुकळे यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पुकळेवाडी ग्रामस्थ यांच्याकडून हळहळव्यक्त होत आहे. गुलाब पुकळे  यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांच्या स्मृतीस भावपुर्ण श्रद्धांजली..!

💐

Friday, August 22, 2025

गेवराईत राष्ट्रीय समाज पक्षाचे शिबिर; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

गेवराईत राष्ट्रीय समाज पक्षाचे शिबिर; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या 



गेवराई (१५/८/२५) : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे मार्गदर्शन शिबिर व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. नव उद्योजक कार्यकर्त्यांना सन्मानित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्ष हा 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धर्तीवर चालत आहे. सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे. जानकर साहेबांच्या विचारानुसार आम्ही नऊ उद्योजकांना सन्मानित केले आहे. समाजामध्ये अनेक तरुण उद्योजक झाले पाहिजेत, अनेक तरुण क्लास वन अधिकारी झाली पाहिजेत, अनेक तरुण आमदार खासदार झाले पाहिजेत ही शिकवण जानकर साहेबाची आहे .

जानकर साहेबांकडे दूरदृष्टी आहे आणि समाजात येणारे संकट त्यांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे ते सर्वसामान्य तरुणास प्रेरित करून स्वतःच्या पायावर उभा रहा असे सांगत आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष ताकतीने उतरणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण संघटन बांधणी चांगल्या प्रकारे झाली आहे. अनेक तरुण राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून उभा राहण्यास तयार आहेत आणि काम करण्यासही तयार आहेत.

मार्गदर्शन शिबिरास प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे, मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर, बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर, लोकसभा अध्यक्ष विक्रम सोनसळे, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष भगवान माने, साईनाथ विग्ने, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष काशीद परशुराम,युवक जिल्हाध्यक्ष केदार मधुकर, शिवाजी चांगण आदी उपस्थित होते. अविनाश काकडे (तालुकाध्यक्ष), बालाजी सातपुते (तालुका अध्यक्ष), अशोक हप्ते (विधानसभाध्यक्ष), कृष्णा धापसे (युवकाध्यक्ष), शंकर गायकवाड (चकलांबा सर्कल प्रमुख) यांना नियुक्ती देण्यात आली.

शेतकरी हक्क परिषदेत रासपचे अजित पाटील म्हणाले, रामाचं नव्हे तर बळीचं राज्य हवे

शेतकरी हक्क परिषदेत रासपचे अजित पाटील म्हणाले, रामाचं नव्हे तर बळीचं राज्य हवे


पुणे (८/८/२५) : रामाचं नव्हे, तर बळीचं राज्य हवे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील यांनी शेतकरी हक्क परिषदेत मांडले. स्वाभिमानी शेतकरी संघटचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू, राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील, भारतीय किसान सभेचे अजित नवले, शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ पुणे येथे शेतकरी हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती.

परिषदेतल्या पहिल्या सत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस श्री. अजित पाटील बोलताना म्हणाले, "आपले युवक दिवसभर शेतात राबत असले तरी त्यांच्या उत्पन्नाची स्थिती समाधानकारक नाही. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्यांकडे वळणे गरजेचे आहे. दूध उत्पादन, रेशीम शेती, मधमाशी पालन यांसारख्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित केल्यास आर्थिक स्थैर्य वाढेल आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही." श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कर्जप्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. CIBIL स्कोअरच्या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. "कर्ज देताना या अटी रद्द कराव्यात आणि शेतकऱ्यांना विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे."

राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पाटील म्हणाले, "राज्यात लोकशाही जिवंत नाही, विरोधी पक्षनेता निवडलेला नाही, हे दुर्दैवी आहे." "स्वयंसहाय्यता गट फक्त बचत करण्यापुरते नकोत, तर त्यातून व्यवसायवृद्धी व्हावी. महिलांना मार्केटिंग आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण मिळावे, त्यामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग मोकळा होईल. रामाचं नव्हे, तर बळीचं राज्य हवे.

खासगीकरणाने आरक्षण धोक्यात, खासगी क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे : महादेव जानकर

खासगीकरणाने आरक्षण धोक्यात, खासगी क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे : महादेव जानकर 

पणजी (७/८/२५) : खासगीकरणामुळे आरक्षण धोक्यात आले आहे, त्यामुळे खाजगी क्षेत्रात देखील आरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशनात बोलताना केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10 वे अधिवेशन पणजी येथे पार पडले. मंचावर प्राचार्य बबनराव तायडे, महासचिव सचिन राजूरकर व देशभरातील प्रमुख ओबीसी पक्षाचे नेते, अन्य मंत्री उपस्थित होते.

श्री. जानकर म्हणाले, ओबीसी समाज मोठा असला तरी त्यांच्याकडे थिंक टँक किती आहे, याचा विचार केला पाहिजे. ज्या लोकांनी सामाजिक आर्थिक मागास ठेवले तेच लोक पुढे पुढे करत आहेत. सामाजिक आर्थिक राजकीय प्रगती करायची असेल तर थिंक टॅंक लोकांची संख्या वाढली पाहिजे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसीला जागृत करण्याचे काम करत आहे. त्यांना दिशा दाखवली पाहिजे. दशा आणि दिशा सांगितली पाहिजे. ओबीसीनी सहारा घ्यावा, पण कुणाचा बेसहारा नको. ओबीसींनी मुख्यमंत्री आणि मंत्र्याकडे धावत जाणारी मानसिकता बदलली पाहिजे. ६२ टक्के ओबीसींना प्रत्येक क्षेत्रात भागीदारी मिळाली पाहिजे. लोकसंख्येच्या हिशाबाने ओबीसींसाठी तमिळनाडू राज्य चांगले आहे. आम्ही आमच्या राज्यात भीक मागणारे आहोत. मागणारा समाज राजा कधी बनत नाही. आम्हाला राजा बनवायचे असेल तर आमचे संघटन चांगलं बनवलं पाहिजे. इथे दोन राजकीय पक्षांचा बोलबाला आहे काँग्रेस आणि भाजप. तुमचे काही नाही, हे बदला. डोके ही त्यांचे आणि पायही त्यांचे. ओबीसींची प्रगती कशी होईल, याचा विचार करावा. ज्यांचे मत कमी ते राज करतात आणि ज्यांचे मत जास्त ते भीक मागतात. 

ओबीसींनो, जोपर्यंत तुमचा पक्ष बनणार नाही, तोपर्यंत ओबीसी बेदखलच राहणार. देशाचा पंतप्रधान ओबीसी नेत्यांकडे आला पाहिजे, असे संघटन व्हावे. आरएसएसचे स्टेजवर एक माणूस असतो आणि आमच्या स्टेजवर हजारो माणसं आणि समोर कोणी नसतं हा बदल केला पाहिजे. ओबीसींसाठी महाज्योती बनवताना कॅबिनेट मंत्री होतो. मात्र ओबीसीला बजेट मिळत नाही. दुग्ध विकासमंत्री असताना ओबीसी मुलांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी डेअरीच्या जागा दिल्या. मात्र बाकीच्या मंत्र्यांनी काय दिले याचा विचार केला पाहिजे.  खासगीकरणामुळे आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे ओबीसीला खासगीकरणात देखील आरक्षण पाहिजे. देशात ओबीसींचा एकही उद्योजक नाही. सुप्रीम कोर्टात एक ही  जज नाही,  प्रशासनात एकही चीफ सेक्रेटरी नाही. तुमचा कोणी अधिकारी नाही. ओबीसीनी राजकारण केले पाहिजे, पण कोणाचा चमचा बनून नाही.

उमरगा लोहारा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक उत्साहात

उमरगा लोहारा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक उत्साहात 

उमरगा (२८/७/२५) : सोमवारी उमरगा लोहारा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक उत्साहात पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक नियोजनार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मराठवाडा अध्यक्ष माननीय अश्रुबा कोळेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती.  येणाऱ्या सर्वच्या सर्व निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवन्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसचे जिल्हा परिषद गट निहाय पक्ष निरीक्षक नेमण्यात आले. संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी सुधाकर पाटील यांची तर जिल्हा संपर्कप्रमुखपदी भागवत मदने, उमरगा तालुका उपाध्यक्षपदी महादेव सुर्यवंशी, शहर अध्यक्षपदी सागर कागे यांची निवड करण्यात आली. बैठक अतिशय उत्साहात पार पडली. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष यशाच शिखर गाठल्यशिवाय रहाणार नाही, हे या बैठकीत दिसुन आले. बैठकीसाठी मळगी ग्रामपंचायतचे सरपंच राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी गावडे बुवा, जिल्हाध्यक्ष सचिन देवकते, अशोक पानढवळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुहासिनी पाटील, उमरगा तालुका अध्यक्ष सहादेव यमगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे : महादेव जानकर

मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे : महादेव जानकर 

पुणे (१ ऑगस्ट २०२५) : मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात बोलताना केले. मातंग समाज तर्फे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते, महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

श्री. जानकर आपल्या भाषणात म्हणाले, आण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने मातंग समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं मी अभिनंदन करतो. आण्णाभाऊ साठे आपल्यासाठी भरपूर काय करून गेले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या समाजाची काय प्रगती झाली आहे याचा आत्मचिंतन केलं पाहिजे. डीजे वाजवून धागड धिंगाना घालून समाजाचं भलं होत नाही, समाजाचं भलं करायचं असेल तर काय केलं पाहिजे याचं चिंतन झालं पाहिजे. मुक्ता साळवे यांनी लिहिलेले पत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे. आज आम्ही महात्मा फुलेचे वारसदार समजतो पण महात्मा फुले यांची खरी जिवंत कहाणी कोणी ठेवली असेल तर त्याच नाव आहे लहुजी वस्ताद साळवे. मातंग समाजाचे बहुजन समाजावर उपकार आहेत. ज्यावेळी या देशातली व्यवस्था महात्मा फुलेंना संपवण्यासाठी निघाली होती, त्यावेळी मातंग समाजाचा एक महात्मा फुलेंच्या पाठीमागे खंबीरपणे होते. आज मातंग समाजाची भागीदारी कुठे आहे? आयएएस, आयपीएस, मंत्री नाहीत. आमचे गणेश लोंढे यांची मुलगी पाहील न्यायाधीश झाली, ती समाजाची भूषण आहे. मातंग समाजाच्या मुलाने मेल्यानंतर जागा मिळावी अशी मागणी केली, पण मातंग समाजाने राज्य करणारी जागा पाहिजे, असे मागावे. मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे. कुणाचे चमचे बनून, एक दोन मंत्री बनून भला होणार नाही. समाजातले शिक्षण वाढवावे लागेल. मुला मुलींसाठी होस्टेल बनवावी लागतील. मातंग समाजाची मुले अधिकारी झाली पाहिजेत, यासाठी समाजातील विचारवंतानी विचार केला पाहिजे. एक मुलगी जज बनवून चालणार नाही, सुप्रीम कोर्टाचा देखील जज बनला पाहिजे. ज्यांची मते कमी आहेत, ते आमच्यावर राज्य करतात. ज्यांची मते जास्त आहेत ते भीक मागत फिरतात, हे बदलले पाहिजे. 

श्री. जानकर पुढे म्हणाले, लोकशाहीच्या शासन, प्रशासन, न्यायालय, पत्रकारिता या चारही स्तंभात मातंग समाजाची भागीदारी नाही. देशाच्या व्यवस्थेला हादरवणाऱ्या माणसाला लहुजी  वस्ताद यांनी साथ दिली होती, आणि त्यांचे स्मारक बनवण्यासाठी आमच्या पोरांना लढा उभा राहू लागतो? बापजाद्यांसाठी त्यांना दहा मिनिटात पाहिजे ते मिळतं, यासाठी आम्ही राज्यकर्ते बनले पाहिजे. आपल्या समाजातील चमचे लोक तिथे आहेत, म्हणून समाजाचे वाटोळे झालेला आहे. आता एका सरांनी सांगितले संविधान बदललं, सत्तेत बसलेले संविधान बदलायला बसलेत, त्यात त्यांचं नुकसान नाही, आपले नुकसान आहे. पण आम्ही त्यांना बदलू देणार नाही, यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय. मागून हक्क मिळत नाही ते हिसकावून घ्यायचे ताकद ठेवावी लागेल. आण्णाभाऊ साठे ना वंदन करण्यासाठी मुख्यमंत्रीच इथे आला पाहिजे. मातंग समाजाची संख्या खूप आहे, सकाळपासून तरुण पोरं पेठेत फिरत आहेत. यात उद्योजक झाले पाहिजेत. बिल्डर झाले पाहिजेत. उच्चभ्रू सोसायटीत राहिला पाहिजे. आम्ही विधानसभेला मातंग समाजाला 22 तिकीट दिले पैसेही दिले. आताचे सरकार हक्क आणि अधिकार चोरणारे सरकार आहे. मातंग समाजातील धनवान लोकांनी गरीब मुला-मुलींना आयएएस आणि आयपीएससाठी दत्तक घ्यावे. आम्ही मेंढर राखायची आणि तुम्ही केरसुणी शिवायच्या ही व्यवस्था बदलायची असेल तर एक मुलगी कलेक्टर करा, एक मुलगा मंत्री करा. एकाला उद्योगपती करा. आज मी जजचा सत्कार केलेला आहे, पुढच्या वेळी चार-पाच कलेक्टरचा सत्कार करायची संधी मिळावी. आपल्यातले हेवेदावे जाळून टाका. व्यसनापासून बाजूला राहून उच्च प्रतीचं शिक्षण घ्यावे लागेल.

करैरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जागरुकता रॅली

करैरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जागरुकता रॅली 

शिवपुरी (२०/७/२५) : सर्वसामान्यांना पिळवणूक करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांना विरोध करत मध्यप्रदेशातील करेरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाने जनजागृती रॅली काढली. सर्वांना एक शिक्षण, मोफत आरोग्य सेवा, शाळा बंद करू नये, शेतकऱ्यांना खते, बियाणे मोफत पुरवावीत, स्मार्ट मीटरची सक्ती करू नये आदी मागण्यावरून राष्ट्रीय समाज पक्षाने जनजागृती रॅली काढली. राम राजा गार्डन येथे रॅलीची सांगता सभा झाली.  यावेळी पक्ष वर्धापन दिन कार्यक्रमाची चर्चा, काँग्रेस भाजप पक्षात नाराज असलेल्या लोकांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला. ग्वाल्हेर येथे होणाऱ्या अधिवेशनसाठी प्रभारी म्हणून प्रदेश प्रधान महासचिव अशोक बघेल, सहप्रभारी कु. अर्चना राठोड, डी. एस. चौहान, मोहरसिंह केवट यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. काँग्रेसचे नगरसेवक सरवन आदिवासी, चंदेल खान, प्रजापती यांनी महादेव जानकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय समाज पक्ष प्रवेश केला. 

जनजागृती रॅलीत सरकारच्या धोरणांना कडाडून विरोध करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. करैरा येथील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या रॅलीत मध्यप्रदेश राज्य प्रदेश प्रभारी प्राण सिंह पाल, प्रदेशाध्यक्ष श्रीलाल बघेल, प्रदेश सचिव बादामसिंह, रणवीर चौहान, सोनू पुरोहित, शिवपुरी जिल्हाध्यक्ष मोहब्बतसिंह पाल, रामकृष्ण विश्वकर्मा, भूपेंद्र गुप्ता, रामगोपाल जाटव, के. पी परिहार, रामपाल, करेरा शहराध्यक्ष डॉक्टर मुकेश कोहली, कुसुम जोशी, अवंतीबाई लोधी, राजकुमारी वर्षा पाल, मीराबाई कोहली, सुनिता पाल, राणी साहू, कमलेश वाल्मीक, सत्यम आदिवासी, मानसिंह पाल, देवीलाल जाधव, मुकेश पाल, धर्मेंद्र कुशवाहा यांच्यासह शिवपुरी, अशोक नगर, ग्वालियर, दतिया, भिंड, मुरेना येथील पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोणाशीही युती होईल, मात्र भाजप बरोबर युती नाही : महादेव जानकर

कोणाशीही युती होईल, मात्र भाजप बरोबर युती नाही : महादेव जानकर 

मुंबईत राष्ट्रीय समाज पक्षाचा विभागीय मेळावा 

मुंबई (२४/७/२५) : कोणाशीही युती होईल, मात्र भाजप बरोबर युती होणार नाही. भाजप ही समाजात विष पेरणारी पार्टी आहे. संविधान संपवण्याचे काम करत असल्याने, मतधारक जनतेने सावध राहण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. श्री. जानकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ : ३० वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचा विभागीय मेळावा वैभवनगर शैक्षणिक सभागृह, चेंबूर मुंबई येथे पार पडला. या मेळाव्यात पक्ष शिस्त, मुंबई महानगरपालिका निवडणूक, देश व राज्यातील चालले राजकारण आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका याबद्दल  रासपा राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मार्गदर्शन केले. फुलेपीठावर राज्य सचिव जिवाजी लेंगरे, मुंबई प्रदेश सचिव इकबाल अन्सारी, मुंबई प्रदेश खजिनदार महावीर (आण्णा) वाघमोडे, मुंबई कामगार आघाडी नेते तुकाराम पाटील, महिला आघाडी मुंबई प्रदेश सचिव सौ. स्वाती जमदाडे, सौ. विद्याताई दुधाळ आदी विराजमान होते. मानखुर्द तालुका अध्यक्ष समीर खान, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिव महेश बोडके यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे अन्य पदाधिकारी, हितचिंतक, रासपप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात अनेक मान्यवरांनी महादेव जानकर यांची भेट घेतली.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची कामगिरी पाहून पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचे निर्देश दिले. अनेक पदाधिकारी पक्षात पदावर असूनही पक्षाचे सक्रीय सभासद नोंदणी, प्राथमिक सभासद नोंदणी केली नसल्याकडे लक्ष वेधले. पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता, इतर पक्षाशी सलगी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावर ठेवू नये, अशा कडक सूचना दिल्या. पद घेऊन काम शून्य, अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पद देऊ नयेत, कारण हे पदाधिकारी स्वतःची, पक्षाची, नेतृत्वाची फसवणूक करत असल्याची, ही गंभीर बाब स्वतः पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितली. प्रत्येक महिन्याला मीटिंग घेऊन, कोणते काम केले, किती संघटन वाढवले याचा आढावा घेऊन अहवाल  पक्ष कार्यालयाकडे पाठवून द्यावा. 

पक्षाचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण स्वतः ठामपणे उभे राहून ताकद देवू, असा विश्वास श्री. जानकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय समाज पक्षात सर्व भाषिक, सर्व प्रांतीय, सर्व जात धर्मियांना राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे मोकळे आहेत. पद मोठे आणि काम नाही, अशा पदाधिकाऱ्यांना श्री. जानकर यांनी सुनावले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकाऱ्यांनी करावी. कोणावरही अवलंबून न राहता वॉर्ड अध्यक्षपासून संघटन बांधणी करावी. महिला आघाडीचे संघटन मजबूत करावे.

राष्ट्रीय समाज पक्षाचा २२ वा वर्धापन दिन ग्वाल्हेर येथे आयोजित : अशोककुमार बघेल

राष्ट्रीय समाज पक्षाचा २२ वा वर्धापन दिन ग्वाल्हेर येथे आयोजित : अशोककुमार बघेल

पत्रकार परिषदेत बोलताना मध्य प्रदेश प्रधान सचिव अशोककुमार बघेल, बाजूस अर्चनासिंह राठोड, रणवीरसिंग चौहान.

राष्ट्रीय अधिवेशनास देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार 

भिंड (१३/८/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचा २२ वा वर्धापन दिन २९ ऑगस्ट २०२५ रोजी ग्वाल्हेर येथे मानस भवन फुलबाग येथे आयोजित केला आहे, देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी व राज्य कार्यकारणी, जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे मध्य प्रदेश महासचिव अशोककुमार बघेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. जगदीश मेरीज गार्डन येथे राष्ट्रीय समाज पक्षाने पत्रकार परिषदचे आयोजन केले होते. यावेळी ग्वाल्हेर लोकसभा रासप उमेदवार इंजी. अर्चनासिंह राठोड, लोकसभा प्रभारी रणवीर सिंह चौहान, कॅप्टन राजेश्वर यादव, प्रदीपसिंह बघेल, राकेश सिंह बघेल, पुरुषोत्तम बघेल, छोटू बघेल, बंटी बघेल उपस्थित होते.

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंड येथे राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे अभिवादन करण्यात आले. श्री. बघेल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन देखील पार पडणार आहे. देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/ कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आम्ही राष्ट्रीय समाज पक्षात सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे. हर हर महादेव - घर घर महादेव नारा देऊन कार्यकर्ता लोकांपर्यंत पक्षाचे विचार पोहचवत आहेत. महादेव जानकर यांच्या नेतृत्वात शेतकरी, कामगार, शोषित, युवक, सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे. ग्वाल्हेर क्रांतिकारकांची भूमी आहे. सर्व नागरिकांनी पक्ष वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कु. अर्चना सिंह राठोड म्हणाल्या, मत चोरी होणे ही लोकशाहीची हत्या आहे. उच्चस्तरीय चौकशी व्हावी. मत कार्डला आधार कार्ड लिंक करावे.

ज्यांना संघर्ष करायचा आहे त्यांनी माझ्यासोबत यावे : महादेव जानकर

ज्यांना संघर्ष करायचा आहे त्यांनी माझ्यासोबत यावे : महादेव जानकर 

 पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, मंचावर डावीकडून बाळासाहेब कोकरे, प्रा. मनोज निगडकर, काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, सुनीता किरवे.

पुणे (१/८/२५) : ज्यांना सत्तेच्या विरोधात संघर्ष करायचा आहे, त्यांनीच माझ्यासोबत यावे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुणे येथे केले. श्री. जानकर हे राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा आयोजित कमिन्स हॉल, पत्रकार भवन, नवी पेठ येथे पदाधिकारी व कार्यकर्ती संवाद बैठकीत बोलत होते. यावेळी महादेव जानकर यांनी लोकमान्य टिळक व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. श्री. जानकर यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसह रासपाचे नेते स्व. सुनील दादा बंडगर यांना श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रीय समाज पक्षाने भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मदत केली, मात्र सत्तेतवर आल्यानंतर त्याची जाणीव भाजपच्या नेत्यांनी ठेवली नाही. आता भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना केले.

श्री. जानकर पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाने संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष कोणासोबत युती करणार नाही. स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवायची आहे. पुणे शहर अध्यक्षांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत सर्व वॉर्ड अध्यक्षांची नियुक्ती करावी. पुणे जिल्ह्यात दौंड तालुका राष्ट्रीय समाज पक्षासाठी अनुकूल आहे, मात्र तिथेही म्हणावे तसे संघटन नाही. एखादा तालुका राहिला तरी चालेल, मात्र जिथे आपण राहतो तिथे तरी पक्षाचे संघटन उभे केले पाहिजे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केवळ समाजमाध्यमावर फोटो टाकण्याचे काम न करता आपला पक्ष आणि पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसे जातील, यासाठी प्रयत्न करावे. आगामी महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक बूथवर एक कार्यकर्ता असला पाहिजे, असे नियोजन करा. पक्षाचा जो पदाधिकारी काम करणार नाही त्याला पदमुक्त केले जाईल. पक्ष सोडून जाणाऱ्यांचा विचार करू नका, जे भाजपमध्ये गेले त्यांची अवस्था आज काय झाली आहे, हे तुम्ही पाहता. उठ म्हटले की उठ आणि बस म्हटले की बस असे त्यांचे झाले आहे. भाजपमध्ये अनेकजण प्रवेश करत असल्याने त्यांचे जुने कार्यकर्ते हे आपल्याकडे येऊ शकतात, याचा विचार करायला पाहिजे.

यावेळी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रा. मनोज निगडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, सरचिटणीस अजित पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्या श्रीमती सुनिताताई किरवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोफणे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक रुपनवर, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक लक्ष्मण ठोंबरे, पुणे जिल्हाध्यक्ष तानाजी शिंगाडे व राष्ट्रीय समाज पक्ष, पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...