Monday, June 21, 2021

ओबीसी राजकारण्यांनो! आंदोलनाची नवटंकी बंद करा व राजीनामे द्या! ....

ओबीसी राजकारण्यांनो! आंदोलनाची नवटंकी बंद करा व राजीनामे द्या! ....



ओबीसी महासभेचे अध्यक्ष गोरख आखाडेंचे आव्हान!

नाशिक :  ओबीसींचे राजकीय आरक्षण संपूष्टात आले, प्रमोशनमधील आरक्षण महाराष्ट्र शासनाने काढून घेतले, ओबीसींच्या महाज्योतीचे 125 कोटी रूपये परत गेलेत, असे असंख्य अन्याय ओबीसी समाजावर होत असतांना राजकीय नेते मात्र थातू-मातूर चार-चौघांचे आंदोलन करून आपले नेतृत्व व खूर्ची टिकवून ठेवण्यात मग्न आहेत. ओबीसींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व व्ही.पी. सिंग यांनी खूर्ची सोडली, तशी हिम्मत ओबीसी नेत्यांमध्ये का येत नाही? नवटंकी सोडा व राजीनामे द्या, असे आवाहन ओबीसी महासभेचे जिल्हाध्यक्ष गोरख आखाडे यांनी ओबीसी नेत्यांना केले आहे. ते ओबीसींच्या सभेत बोलत होते.

    ओबीसी महासभेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुर्यभान गोरे म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षाचे ओबीसी नेते हे व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्षांचे गुलाम झालेले आहेत. आंदोलने करणे हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे काम आहे, तुम्ही नेते आहात, मंत्री आहात तर पक्षाच्या बैठकीत बोललं पाहिजे, मंत्रीमंडळाच्या बैठकीत ओबीसींच्या हिताचे ठराव मंजूर करून घेतले पाहिजे. रस्त्यावर उतरून आंदोलनाची नाटके करून ओबीसींची दिशाभूल करू नका. मंत्रीमंडळात राहून ओबीसींचे भले करू शकत नसाल तर, मंत्रीपदाला का चिकटून राहता, भ्रष्टाचार करून करोडपती बनण्यासाठी?, असा संतप्त सवालही गोरे यांनी केला.

    त्यानंतर ओबीसी विचारवंत प्रा. श्रावण देवरे यांनी ओबीसी चळवळीचा इतिहास सांगीतला. आरक्षण मिळविण्यासाठी किती ओबीसींनी त्याग व बलीदान केले आहे, याची सविस्तर माहीती देवरे यांनी दिली. ओबीसींनी त्यागाने व कष्टाने मिळविलेले आरक्षण आजच्या नालायक ओबीसी नेत्यांमुळे नष्ट होत असल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली.

    संघटनेचे विभागीय अध्यक्ष गौरव सोनार यांनी ओबीसींच्या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शासनाला दिला. जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष *विद्याताई घायतड* यांनी ओबीसी महिलांसाठी वेगळ्या रक्षणाची मागणी केली. राजेंद्र वर्मा, ज्ञानेश्वर शिरसाठ, शशिकांत घुगे, भरत सुर्यवंशी, डॉ. संजय उन्हवणे, संगिता पोतदार, हेमंत शिंदे, बडगुजर व घायतड काका आदि मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. महासभेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर *धरणे आंदोलन* आयोजित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...