आरक्षणाला रा-सेफचा संपूर्ण पाठिंबा आहे : राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.एस.एल.अक्कीसागर
दि.20.06.2021 रोजी रा-सेफची online मिटिंग पार पडली.या मिटिंगमध्ये कोरोना काळातही राष्ट्रीय समाज नायक मा.श्री.महादेवजी जानकर साहेबांचे कार्य हे प्रेरणा व उर्जा देणारे आहे.त्यातून आपण प्रेरणा घेवून काम करायला पाहिजे असे मत अनेक रा-सेफ सदस्यांनी व्यक्त केले.
प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.एस.एल अक्कीसागर साहेब म्हणाले की,आरक्षणाला रा-सेफचा संपूर्ण पाठिंबा आहे.शासनाने आरक्षण प्रश्न तातडीने सोडवावा. राजर्षी शाहूमहाराजांनी आपल्या संस्थानात ५०% आरक्षण लागू केले होते.सर्वाना समान भागीदारी दिली होती.लोकांच्या कल्याणासाठी राज्य कारभार केला हे शासनाने लक्षात घ्यावे.तसेच डॉ.बाबासाहेबांनी दलितांसाठी ब्रिटिशाकडे आरक्षणाची मागणी केली.त्यांना सामाजिक न्याय व विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे असे त्यांनी ब्रिटिशांना सांगितले व स्वातंत्र्य नंतर संविधानामध्ये अनेक तरतूदी केल्या.मा.सागर साहेबानी यावेळी कालेलकर अवाहलावरही भाष्य केले.जागृतीचा सिध्दांत सांगत आसताना ते म्हणाले मागणी कोणती करावी.यांचे ज्ञान असायला पाहिजे.पेरियार रामास्वामी यांनी केलेल्या कार्यामुळे तामिळनाडूतील obc कसा जागृत आहे.याची त्यांनी जाणिव करुन दिली.तेथिल मुख्यमंत्र्यानी पंतप्रधान कडे केलेली मागणी कसी योग्य आहे हे सांगितले.जोपर्यंत आपण जागृत होवून आपल्या हक्क अधिकारासाठी विचार करणार नाहीत तोपर्यंत ते आपल्याला मिळणार नाहीत. राष्ट्रीय समाज आपला विकास आरक्षणामुळे होईल या आशेवर आहे पण येथील शासन योग्य ती जबाबदारी घेवून न्याय देण्याचे काम करत नाही.शेवटी लोकशाहीमध्ये लोकाचे कल्याण होणे हे महत्वाचे असते पण शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज राष्ट्रीय समाज हालअपेष्टा भोगत आहे आम्ही मात्र सामाजिक न्यायाची भूमिका घेवू सर्वाना न्याय देण्याचा,सर्वाचा विकास साधण्याचा प्रयत्न करू सर्वाना समान भागीदारी देवून हे राष्ट्र बलशाली बनवण्याठी प्रयत्न करु.आमची भूमिका सर्वाना आरक्षण मिळाले पाहिजे हिच आहे असे ते म्हणाले.
या प्रसंगी मा.श्री. नाजरकर सरांनी संघटनेच्या पुढील कार्याचे नियोजन कसे करायचे हे सांगितले लोकापर्यत पोहचण्यासाठी,प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.संघटनेचे सचिव मा.श्री राजगे सर यांनी ,दर महा निधी उभारण्यासाठी प्रत्येक सदस्यांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान केले.मोलाचे मार्गदर्शन करुन मिटिंग यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment