Wednesday, June 30, 2021

माजी मंत्री आ. महादेव जानकर यांचा आरेवाडी दौरा बिरोबा दर्शनानंतर केली स्टडी सेंटरची पाहणी

माजी मंत्री आ. महादेव जानकर यांचा आरेवाडी दौरा
बिरोबा दर्शनानंतर केली स्टडी सेंटरची पाहणी



आरेवाडी :- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी आज दुपारी १२ वाजता आरेवाडी येथील बिरोबा देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर बिरोबा बनात आरेवाडी ग्रामस्थांच्या  वतीने सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी आरेवाडी गावाच्या वतीने प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक वाय. बी. कोळेकर यांच्या हस्ते आ. जानकर यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. 


महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री आ. महादेव जानकर हे मागील काही दिवसांपासून सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते आरेवाडी बिरोबाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पार्टीचे पदाधिकारी आणि काही जुने कार्यकर्ते देखील होते. 


श्री बिरोबा स्टडी सेंटरला मदत करण्याचे आश्वासन


मायभूमी आरेवाडी व्हाट्सअप ग्रुपच्या सुसंवादातून बिरोबा बनामध्ये उभारलेल्या श्री बिरोबा स्टडी सेंटरला माझ्याकडून आवश्यक ती मदत करण्याचा शब्द    यावेळी महादेव जानकर यांनी दिला. माझ्या सामाजिक व राजकीय प्रवासामध्ये आरेवाडी गावाने मला मोठी साथ दिली आहे. याच गावाने आज तरुणांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे, हि बाब दूर दृष्टीची आहे. कारण याच दुष्काळी आणि ग्रामीण भागातील पोरं प्रशासनामध्ये गेली पाहिजेत. म्हणून या अभ्यास केंद्राला मी माझ्यापरीने लागेल ती मदत करण्याचे असे आश्वासन यावेळी आ. जानकर यांनी दिले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...