ओबीसींना काँग्रेसचे सापनाथ तर भाजपचे नागनाथ उल्लू बनवत आहेत ; रासपचे कुमार सुशील यांचे टीकास्त्र
नवी मुंबई : ओबीसी समाजासाठी काँग्रेस, भाजप सारखे राजकीय पक्ष विषारी ठरले असून, काँग्रेसचे सापनाथ तर भाजपचे नागनाथ ओबीसी समाजाला उल्लू बनवत असल्याचे टीकास्त्र, रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी सोडले आहे. कुमार सुशील यशवंत नायक प्रतिनिधीशी बोलत होते. काल त्यांनी नवी मुंबई येथे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल. अक्कीसागर यांची ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आदीबाबत भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र रासपचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले उपस्थित होते.
सन- २०११ मध्ये काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारने जनगणना अधिनियम-१९४८ कायद्याची अंमलबजावणी न करता खासगी यंत्रणेमार्फत जनगणना करून ओबीसी समाजाला फसवले तर भाजपच्या मोदी सरकारने ओबीसी समाजाला हक्क आणि अधिकार डावलून सर्वोच्च न्यायालयात ओबीसींची आकडेवारीसह माहिती दिली नाही. परिणामी ओबिसिंचे आरक्षनास धोका निर्माण झाला. आज मात्र कॉग्रेस आणि भाजपमधील ओबिसी नेते ओबिसि समाजाला उल्लू बनवत आहेत. आम्हाला ओबीसी नेते उल्लू आहेत की ओबीसी समाज उल्लू आहे, हे कळेनासे झाले आहे. म्हणून आम्ही ओबिसीसाठी काम करणाऱ्या बिगर राजकीय लोकांना भेटणार आहोत व त्यांना आमचे समर्थन देणार आहोत.
माजी प्रधानमंत्री स्व. व्ही. पी. सिंग यांची आज जयंती आहे. क्षत्रिय ठाकूर असणाऱ्या व्ही. पी. सिंग यांनी ओबीसींना न्याय देण्याची भूमिका घेतली, परंतु एक ओबीसी असलेल्या मोदींनी या देशातील ओबीसींना संपवण्याचे काम केले, हे एक दुदैर्व आहे. सापनाथ आणि नागनाथ यांच्यापेक्षा मंडल आयोग लागू करून ओबीसींना न्याय देणाऱ्या स्व.व्हीं. पी. सिंग यांचे ओबीसींनी स्मरण केले पाहिजे.
उत्तर प्रदेशात भाजप सरकार मधील शिक्षण मंत्र्याचा भाऊ EWS आरक्षणातून प्राध्यापक झाला तर बंदायु विद्यापीठात १६ जगावर प्राध्यापक भरती निघाली होती, त्यात खुल्या गटाच्या ११ जागा भरून ५५ ओबीसी उमेदवारांना डावलले आहे, याला रासपने तीव्र विरोध दर्शवला आहे. चौकशीची मागणी करून न्यायाची मागणी केली आहे. लवकरच रासप राष्ट्रीय पातळीवर सत्ताधिश लोकविरुध्द जोरदार रान पेटवेल, असा इशारा कुमार सुशील यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment