Sunday, June 27, 2021

दक्षिण माणमध्ये पाऊसाच्या हलक्या सरी

दक्षिण माणमध्ये पाऊसाच्या हलक्या सरी

कुकुडवाड दि.२६ : प्रा. आबासो पुकळे

माण तालुक्याच्या दक्षिण भागात काल शनिवारी पाऊसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कुकुडवाड, पुकळेवाडी, वडजल, मरगळेवाडी, कारंडेवाडी, धनवडेवडी, मानेवाडी, नंदीनगर, भाकरेवाडी, शिवाजीनगर, गटेवाडी, वळई, विरळी, चीलारेवडी आदी गावात पाऊस पडला. कडक उन्हाळ्यात जमिनी तापवून मशागत करून पेरणीसाठी पाऊसाचा प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना  पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले. चाऱ्याच्या समस्येने ग्रासलेल्या पशुपालकांसाठी देखील चांगले झाले.डोंगर कपाऱ्यामधून गवताच्या काड्या जोर धरतील, अशी अपेक्षा पशुपालकांमध्ये आहे.



जमिनीत कमी ओल असताना देखील काही शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली होती, परंतु समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले होते. काल झालेल्या पाऊसामुळे पेरणी झालेल्या पिकांसाठी, राहिलेले शेत शिवार पेरण्यासाठी चांगले झाले, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटल्या. पाऊसाचा हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी, जिरायत शेतीवर अवलंबून असणारे शेतकरी मात्र मोठ्या पाऊसाचा प्रतीक्षेत कायम आहेत.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...